तुम्ही फेसबुक ॲडिक्ट आहात का?
फेसबूकला सोशल मीडियाचा राजा म्हटलं तर अजिबात वावगे ठरणार नाही. कारण एकूण इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी ६०% लोक फेसबुकशी जोडलेले आहेत. १.६२ बिलियन लोक रोज फेसबुक नियमित पाहतात. फेसबुक ॲडिक्शन हा विचार करण्यासारखा परंतु दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे.
तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?…
- आपण फेसबुकवरील बातम्या, पोस्ट्स याबद्दल अपडेटेड असण्यात काही गैर नाही पण फेसबुकची ही आवड व्यसनात परावर्तीत तर होत नाही ना याबद्दल सजग असणे अत्यावश्यक आहे.
- होय, व्यसनच! व्यसन फक्त दारू, सिगरेट किंवा ड्रग्स याचेच असते असे नाही तर ज्या गोष्टींमुळे, सवयींमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम दिसू लागतात, आपले नुकसान होऊ लागते ती प्रत्येक गोष्ट हे व्यसनच.
- ही गोष्ट खूप परस्परविरुद्ध आहे की जिथे इंटरनेटचा वापर करणारे अनेकजण वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबद्दल अस्वस्थ आहेत तिथेच अनेकजण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक क्षण स्वतःहून सोशल मीडिया वर शेअर करत आहेत.
- याचं अत्यंत महत्वाचं करणं म्हणजे आपल्या जीवनातील गोष्टींबद्दल आपल्याशी जोडलेल्या असलेल्या लोकांची लक्ष वेधून घेणे आणि त्यांच्याकडून आपल्याबद्दल स्तुती ऐकावीशी वाटणे. आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्सचा अगदी हाच मुख्य उद्देश असतो.
खालीलपैकी जास्तीत जास्त गोष्टींचा संदर्भ जर तुमच्याशी लागत असेल तर हीच वेळ आहे सावध होण्याची आणि यापासून स्वतःला सावरण्याची. तर पहा यातलं काय काय तुम्हाला लागू होतं ते ?
तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?…
१. ठरवल्यापेक्षा जास्त वेळ फेसबुकसाठी दिला जात आहे:
- फेसबुक पाहणे ही तुमची सकाळी उठल्यावर सर्वात पाहिली आणि रात्री झोपताना सर्वात शेवटची गोष्ट / सवय आहे का?
- तुम्ही दिवसभरात जेवढं काम करणं अपेक्षित आहे ते फेसबुकमध्ये वेळ गेल्यामुळे राहून जातंय का?
- दर थोड्या वेळाने तुम्हाला फेसबुक पाहण्याची, कंमेंट्स करण्याची, लाईक्स – शेअर्स तपासण्याची गरज वाटते का?
२. प्रत्यक्ष मित्र –
- मित्र -मैत्रिणींना भेटायचे टाळून तुम्ही फेसबुकवरील काल्पनिक जगातील मित्र – मैत्रिणींमध्ये जास्त व्यस्त राहता का?
- तुमचे खास मित्र तुम्ही सर्वांनी एकत्र चांगला वेळ घालवावा म्हणून वेळ काढत आहेत तर तुमचे फेसबुकवरचे मित्र त्यांच्या सोयीनुसार म्हणजे ते पण ऑनलाईन आहेत आणि तुम्ही पण, म्हणून ते तुमच्याशी बोलत आहेत.
कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?…
३. तुम्ही फेसबुक चा वापर नक्की कशासाठी करत आहेत –
- तुम्ही फेसबुकचा वापर नक्की कशासाठी करत आहेत? तुमचा मूड सुधरवण्यासाठी की एखाद्या समस्येपासून दूर जाण्यासाठी, ती टाळण्यासाठी?
- बऱ्याचदा एखाद्या नको वाटणाऱ्या भावनेतून, विचारांमधून बाहेर येण्यासाठी अनेकजण फेसबुकचा वापर करतात.
- अनेकदा एखाद्या कामाच्या ताणातून बाहेर पाडण्यासाठी किंवा सहकारी किंवा जोडीदारासोबत झालेल्या वादविवाद, भांडणापासून बाहेर पाडण्यासाठीही फेसबुकचा वापर केला जातो.
- या सर्वांमध्ये तुमच्या कामामध्ये जर तुमचा हा फेसबुकचा वापर अडथळा निर्माण करत असेल, याच्यामुळे तुमचे काम वेळेत पूर्ण होतं नसेल तर मात्र हे धोकादायक ठरू शकते.
“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स…
४. सतत फेसबुक वर काय सुरु आहे हे तपासावंसं वाटणे –
- कोणी काय कमेंट्स केल्यात, कोणत्या पोस्टला किती लाईक्स, शेअर्स मिळाले आहेत,
- कोणत्या घटनेवर, बातमीवर कोणी कशी प्रतिक्रिया दिली आहे,
- कोण आत्ता कुठे आहे, काय करत आहे, याबद्दल सतत ‘माहिती असायला हवं’ असं वाटणं ही लक्षणे फेसबुकचे ‘व्यसन’ लागण्याची सुरुवात आहे असच म्हणावं लागेल.
५. प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट –
- आपल्या खऱ्या आयुष्यातील स्वतःच्या प्रतिमेपेक्षा सोशल मीडियावरील आपल्या प्रतिमेबद्दल जास्त काळजी वाटणे.
- हो, हे देखील खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे करणं आपण इतके सतत या सोशल मीडियाने अक्षरशः घेरलेले असतो की आपल्याला ते आभासी जगचं सत्य आहे असं वाटू लागत आणि खऱ्या जगाचा अगदी विसर पडल्यासारखं होतं.
सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स…
६. वैयक्तिक आयुष्यावर परिणाम –
- फेसबुकवर घडणाऱ्या घटनांचा आपल्या नातेसंबंधांवर, आपल्या झोपेवर, मानसिक अवस्थेवर, भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम दिसून येतात.
- एखाद्या व्यक्तीने आपल्या एखाद्या पोस्टवर काही नकारात्मक कमेंट केली तर त्याचा राग येतो, ताण वाटू लागतो, मन अस्वस्थ होते, विनाकारण चिडचिड होऊ लागते.
- बऱ्याचदा इतरांच्या जीवनाची आपण आपल्या आयुष्याशी तुलना करू लागतो आणि त्यामुळे विनाकारण नैराश्य येऊ शकते.
७. बराच वेळ फेसबुकपासून दूर राहू शकत नाही –
- दर थोड्याथोड्या वेळाने फेसबुक चेक करायची तीव्र इच्छा होते आणि नाही चेक करता आलं, तर एकदम अस्वस्थ वाटू लागते, अधीर वाटू लागते.
- आपण एखाद्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ तर राहणार नाही ना अशी भीती वाटू लागते.
- सतत आपल्याला त्या आभासी जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायलाच पाहिजे याचादेखील तणाव मनावर जाणवू लागतो.
तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत…
८. सोशल शेअरिंग –
- सतत आपण करत असलेली, अनुभवत असलेली प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकून आपल्याशी जोडलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवावीशी वाटते.
- मग आपण काय काय शेअर करत आहोत अनेकदा याचेही भान राहत नाही.
- अनुभवत असलेल्या क्षणांचा आनंद घेण्यापेक्षा ती फेसबुकवर सांगण्याची जास्त उत्सुकता वाटू लागते आणि त्यावर तेथील लोकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मन उतावीळ होते.
९. फेसबुक फ्रेंड्स –
- आपले किती मित्र – मैत्रिणी आहेत याबद्दल जणू स्पर्धाच सुरु होते आणि ज्याचे मित्र – मैत्रिणी सर्वांत जास्त असतील तो इतरांच्या नजरेत उंचावतो.
- या अशा गोष्टी असतात ना ज्यांना खऱ्या दैनंदिन जीवनात काहीही महत्व नसते.
कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम…
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies