Reading Time: 3 minutes

कोव्हिड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत संपर्काने होते. याचे तीव्र व भयानक परिणाम जगातील सर्वच देश भोगत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी अनेक कंपन्यानी त्यांच्या कर्मचा-यांनी घरी बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे. घरी बसूनही तुमचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालील काही टिप्स लक्षात ठेवा. 

ऑफिसच्या वेळेप्रमाणेच कामाची वेळ ठरवा 

  • बरेच लोक बाहेर पडल्यावर जास्त प्रमाणात काम करतात पण घरून काम करायचं म्हटलं की ते एवढं काम करू शकत नाहीत. कारण घरी बसून काम करताना अनेक व्यत्यय येऊ शकतात, त्यामुळे ऑफीसच्या वेळेप्रमाणेच कामाच्या वे़ळेचं नियोजन करा.
  • दिवसभरात कामाचे तास ठरवून घ्या त्यानुसार त्या वेळेत काम पूर्ण करा, काम जास्त चांगले होण्यासाठी मूड फ्रेश व्हावा म्हणून मध्ये थोडा ब्रेक घ्या. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित वेळेत आराम करा, कुटुंबासोबत आनंद घ्या. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

कामाची सुरुवात शक्य होईल तितक्या लवकर करा 

  • सकाळी लवकर उठून कामाला लागणं कदाचित तितकंसं सोपे नाही . सकाळी थोडासा आळशीपणा येऊ शकतो. पण याचवेळी उठून कामाला सुरुवात केल्यास काम अधिक चांगल आणि अचूक होतं.
  • एक वेळ सकाळचा ब्रेकफास्ट थोडा उशीरा करा, पण कामाची सुरुवात लवकर करा. कारण सकाळच्या वेळी आपली कार्यक्षमता जास्त असते.

 कामासाठी ऑफीससारखी एखादी जागा निश्चित करा

  • तुम्ही ऑफिसला गेले नाही याचा अर्थ पलंगावर पडून हवं तसं काम करावं असा होत नाही. वर्कस्पेसला खूप महत्त्व असतं म्हणून अनेक आयटी कंपन्याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रशस्त असतं. 
  • तुम्हीही घरातून काम करताना आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी व स्वतःला प्रेरणा देण्यासाठी कामाची जागा ठरवा. जेथे तुमचं कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित राहील. 

कोरोना आणि कायदा

कामात व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी टाळा 

  • एखादं फेसबुकचं नोटिफिकेशन तुम्हाला फेसबुकवर घेऊन जातं, मग तिथे तुमचा तासही जाऊ शकतो. व्हॉट्स ॲपचही असंच आहे. सोशल मिडीया हे कामात व्यत्यय आणणारी मोठी गोष्ट आहे. म्हणून कामात लक्ष लागण्यासाठी फोन काही काळ दूर ठेवा, नोटिफिकेशन बंद ठेवा. 
  • महिलांसाठी घरी बसून काम करताना ब-़याच इतरही घरगुती गोष्टी कराव्या लागतात. अशावेळी यात जास्त गुंतून न राहता ही कामे पटकन संपवावीत व नंतर कामावर लक्ष द्यावे. 

ड्रेसकोड ठरवा 

  • जरी तुम्ही घरी बसून काम करत असाल, तुम्हाला पहायला किंवा चुका काढायला तुमचा बॉस जरी नसेल तर तुम्ही पायजमा किंवा कुठलेही कपडे घालून कामाला बसू नका. 
  • रोज ऑफिसला जाताना आंघोळ, नाष्टा, कपडे घालणे यामूळे कामासाठी आत्मविश्वास येतो. तसंच घरी बसूनही तोच ऑफिसचा ड्रेसकोड ठेवा. कदाचित काही ऑफिशियल व्हिडिओ कॉल्स देखील होऊ शकतात म्हणून स्वत:ला तयार ठेवा. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

कॉल्स घेण्यासाठी किंवा करण्यासाठी दुपारची वेळ ठेवा 

  • सकाळी आपण जास्त काम करू शकतो. 
  • दुपारच्या जेवणानंतर कदाचित सुस्तपणा येऊ शकतो. म्हणून रोजचं काम ठरवल्याप्रमाणे सकाळीच आटपून घ्या व काही फोन कॉल्स असतील, तर दुपारच्या वेळेत बोलून घ्या. 

आज जास्तीत जास्त काम करायचे असे ठरवा 

  • प्रोजेक्ट्स सुरूवातीला छोटे वाटतात, पण प्रत्यक्षात ते जास्त वेळ घेतात. 
  • स्वत:ला काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त काम पूर्ण करणार असं स्वत:शीच ठरवून घ्या. यामुळे काम करण्यासाठी उत्साह येतो व काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं. 

दिवसभरात किती व कोणते काम करू शकता याचं नियोजन करा. 

  • आज करायचं याची यादी सकाळीच केलेली चांगली. 
  • दिवसभराचं कामाचं नियोजन केलं की कामाचा गोंधळ होत नाही. आपला अजेंडा पूर्ण करण्यासाठी कामावर लक्ष देणे आवश्यक असते. म्हणून कामाची यादी किंवा अजेंडा ठरवून घ्या. 

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

वरिष्ठांशी संपर्कात राहा. 

  • घरी बसून काम करत असल्यास काही ऑफिशियल कामांचा आढावा घेण्यासाठी किंवा काही नवे बदल झाले असतील, तर ते समजणे आवश्यक असते. अशावेळी उच्च अधिकारी, सहकारी किंवा मॅनेजर यांच्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा इस्टंट मेसेजिंग हे पर्याय कामी येतात. 
  • गुगल हँगआऊट, व्हॉट्सॲप, मायक्रोसॉफ्ट टीम्स, स्लॅक यासारखे ॲप्लिकेशन्स वापरून तुम्ही मेसेजिंग, कॉलिंग आणि व्हिडिओ कॉल्स देखील करू शकता. 

थोडी विश्रांती घ्या 

  • कामाची यादी किंवा रोजचा अजेंडा तयार करताना विश्रांतीसाठी काही वेळ ठरवा. 
  • दुपारच्या वेळी ब्रेक घेऊन दुपारच्या गरमागरम जेवणाचा आनंद घ्या. टीव्ही पहा, गाणी ऐका, थोडीशी झोपही घेऊ शकता. 
  • घरी बसून काम करण्याचा हाच मोठा फायदा असतो की तुम्हाला ब्रेक घेता येतो. म्हणून थोडी विश्रांती घ्यायला विसरू नका. काम पुन्हा सुरू करण्यासाठी मूड छान होईल. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…