Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..

Reading Time: 2 minutesआयटीआर भरताना होणाऱ्या काही मूलभूत चुका (Common ITR Filing Mistakes) टाळायला हव्यात अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. ‘विविध कर’ नियमितपणे भरणे ही आपल्या सर्वांचं देशाप्रती असलेलं कर्तव्य आहे. भारत सरकारने नागरिकांची सोय व्हावी म्हणून या प्रक्रियेत मध्यंतरी बरेच बदल केले आहेत. पण, तरीही प्राप्तीकर भरणाऱ्या लोकांचा टक्का फारसा बदललेला नाही. प्राप्तीकर  भरण्याची प्रक्रिया माहीत नसण्याने अर्ध्यातून ही प्रक्रिया पूर्ण न करू शकणारे सुद्धा कित्येक लोक असू शकतात. ‘प्राप्तीकर’ भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने आम्ही अशा काही चुकांची यादी देत आहोत ज्या लोकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कर भरत असताना नेहमीच होत असतात. या चुका कोणत्या आहेत,  याबद्दल जाणून घेऊयात आणि शेवटच्या तारखेपर्यंत न वाट बघता आजच आपले आयटीआर भरा. 

फाल्गुनी नायर (Falguni Nayar): आयुष्याच्या उत्तरार्धात व्यवसाय सुरु करून यशाच्या शिखरावर पोचवणारी खरी नायिका 

Reading Time: 3 minutesफाल्गुनी नायर (Falguni Nayar) हे नाव आज श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये घेतले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची महत्वकांक्षा असते तेव्हा कोणतीही गोष्ट त्याला स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही, हे सिद्ध करून दाखविले आहे नायका ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी.

e-filing of ITR: ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?

Reading Time: 2 minutesइन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो (E-filing of ITR). आयटीआर भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यत मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरणे हे देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे  खूप अवघड  वाटते, परंतु इन्कम टॅक्स भरणे हे आता पूर्वीसारखे कठीण राहिले नाही यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची देखील गरज नाही. तुम्ही तुमच्या घरूनच ऑनलाइन पद्धतीने देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. 

Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

Reading Time: 3 minutesकर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutesविमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी.  काही दुर्दैवी घटना आपल्या हातात नसतात पण विमा काढल्यास पुढील परिणामांची  दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.

Work Management: कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

Reading Time: 2 minutesकामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा योग्य वापर होऊन उरलेला वेळ मनाप्रमाणे घालवता येतो. 

फसव्या योजना ओळखण्याची ६ लक्षणे

Reading Time: 2 minutesफसव्या योजना बनवून लोकांना ठगणारे अनेक बंटी आणि बबली समाजात उजळ माथ्याने फिरत असतात. या फसव्या योजनेचा कोणालातरी फटका बसतो आणि मग बाकीचे  सावध होतात. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका प्रत्येकजण करतो, पण ती चूक एकदा झाली की त्याच माणसाने तर ती पुन्हा करूच नये, परंतु इतरांनीही त्यातून योग्य धडे घेऊन ती चूक एकदाही करू नये. हीच गोष्ट पैशांबद्दलही लागू होते. 

[Podcast] Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: < 1 minuteLoan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे     Loan Rejection: कर्ज…

Financial Documents: तुमच्या या आर्थिक कागदपत्रांची माहिती तुमच्या जोडीदाराला नक्की द्या

Reading Time: 3 minutesआर्थिक कागदपत्रे (Financial Documents) हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे. आपण आपलं उत्पन्न, बचत व गुंतवणूक याबद्दलची सर्व माहिती या कागदपत्रांच्या रूपाने जतन करत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला या कागदपत्रांबद्दल माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित आर्थिक बाबींची इत्यंभूत माहिती असणारे सल्लागार यांच्याबद्दलही जोडीदाराला माहिती असणं आवश्यक आहे.

Travel Insurance: प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesकोरोना आता निघून गेल्यातच जमा आहे. २०२१ च्या मध्यभागी पोहोचेपर्यंतच त्याची भीती आपल्या समाजातून निघून गेली होती. १०० कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलेल्या भारतात आता लोक दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात फिरायला जाणं सुरू करत आहेत.यामुळे पर्यटनक्षेत्राचं अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी मदतहोत आहे. परंतु, प्रवाश्यांनी बाहेर पडताना आपला ‘प्रवास विमा’ सुद्धाजरूर काढावा. ‘प्रवास विमा’ घेण्याचा फायदा केवळ विमा कंपन्यांना होत नसून प्रवाश्यानासुद्धा त्याचा खूप फायदा होऊ शकतो.