कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

Reading Time: 2 minutes

कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा योग्य वापर होऊन उरलेला वेळ मनाप्रमाणे घालवता येतो. 

आजच्या धावपळीच्या जगात विस्मरण ही सवय झाली आहे आणि त्यातून नुकसान अटळ आहे. छोटंमोठं नुकसान टाळण्यासाठी आपला प्राधान्यक्रम ठरवा, कामे संपवा आणि निश्चिंत रहा.

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

तुम्ही नोकरदार असाल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, तर पुढील काही गोष्टी तुमचे आयुष्य सहज बनवतील. त्यासाठी प्राधान्यक्रम यादी ठरवून तुमच्या यादीत या गोष्टी अवश्य बघा.

१.ईमेल- 

 • आजकाल सर्व व्यावसायिक माहितीची देवाण घेवाण ईमेल वरूनच होते. आपले मेल खाते शेकडो मेल्सने भरून गेलेले असते. त्यात एखादा मेल गहाळ होतो, चुकून डिलिट होतो, पहायचा राहून जातो, त्यामुळे तुमचे मेल अकाउंट सुनियोजित ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे.  
 • सकाळचा किंवा तुम्हाला वाटेल तो एक वेळ खास या ईमेल्सना तपासण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी राखून ठेवा म्हणजे तुमच्याकडून काही पहायचे राहून जाणार नाही. 
 • काहीवेळा समोरून खूप लांबलचक मेल्स येतात आणि ते वाचण्याइतका वेळ आपल्याकडे नसतो. वेळही वाया जातो आणि मुद्दाही कळत नाही. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे सहज आणि थोडक्यात सांगण्याची विनंती करा म्हणजे तुमचा बराचसा वेळ वाचेल.

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

२. फोन कॉल्स– 

 • कामासंदर्भात जेव्हा सातत्याने कॉल्स करायची वेळ येते, तेव्हा हे काम कदाचित कंटाळवाणे आणि किचकट वाटू शकते. 
 • बोलताबोलता एखादी गोष्ट राहून जाते आणि परत परत फोन करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे तुमचे म्हणणे नक्की काय आहे हे मुद्द्यांमध्ये लिहून तो कागद समोर ठेवा आणि तेव्हढेच बोला. 
 • अशाने तुमच्या कमीत कमी वेळात महत्वाचे कॉल्स करून होतील. समारंभासाठी कॉल्स करणार असाल तेव्हाही ही युक्ती वापरा.

३. बैठक/सभा- 

 • कामानिमित्य तुम्ही सभांचे संचालन करत असाल, तर प्रत्येक बैठकीचा एक आराखडा तयार ठेवा. 
 • तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर बोलायचे आहे, कामाचे वाटप, सल्ले, तोडगा याचा लेखी आरखडा समोर ठेवा. शक्य असल्यास इतर सर्वानाही या मुद्द्यांची पूर्वकल्पना किंवा जाणीव करून द्या. म्हणजे भरकटलेल्या विषयावर बैठकींचा वेळ वाया जाणार नाही. 
 • शेवटी काय झाले आणि काय बाकी आहे, याचा हिशोब करता येईल.

४. अभ्यास- 

 • तुम्ही विद्यार्थी दशेत किंवा शिकण्याच्या भूमिकेत असाल, तर मात्र तुमच्या अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे.
 • बरेचसे हुशार आणि बुद्धिवान लोक नियोजनाच्या अभावी यशाच्या शिखरांना मुकतात. 
 • अतिवाचन किंवा वेळेचा अपव्यय दोन्ही टाळ्ण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोणत्या वेळी काय वाचायचं किती वाचायचा, तुमचा पाठ्यक्रम या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा.
 • प्रत्येक विषयाला तुम्ही न्याय देऊ शकाल असे वेळेचे नियोजन करा. 
 • अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाला, छंदाला किती वेळ आणि महत्व द्यायचं हे ठरवून घ्या. 
 • सबमिशन्सच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, विषयांचे वेळापत्रक भिंतीवर लाऊन ठेवा म्हणजे तुम्ही तारखा चुकणार नाहीत.

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

या सगळ्याची गरज काय?

 • या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला देऊ शकता. एकच विचार करा, यादी न केल्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट निसटून गेली, ती वेळ निघून गेली, तर हजारो, लाखोंचा किंवा पैशात न मोजता येणार नुकसान तुम्ही सहन करू शकणार आहात का? 
 • थोडक्यात परिणामांचा विचार करा, तुमचे हात आपोआप नियोजनाकडे वळतील. आणि त्याहून महत्वाचे, असे सूनियोजित काम केल्याने, तुम्ही एरवी मिळवू शकत नाही इतका फायदा तुम्हला मिळवता येतो.  

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 4]