आर्थिक साक्षरता शिबिर: जन निवेश अभियान

Reading Time: 3 minutesआर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते  २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास  दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात  १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर  दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल. 

अर्थसाक्षर कथा – संकट दुर्धर आजारांचे

Reading Time: 4 minutesआरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात. 

मिलियन, बिलियन म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesअनेकदा मिलियन, बिलिअन आणि ट्रीलिअन मधले आकडे गोंधळून टाकणारे असतात. १०० बिलिअन डॉलर्स म्हणजे नक्की किती रुपये? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि अनेकवेळा उत्तरे न मिळताच ते विरुनही जातात. या लेखात आपण मिलियन, बिलिअन म्हणजे काय? या शब्दांचे भारतीय मूल्य किती? अशा प्रशांची उत्तरे समजून घेणार आहोत.

Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutesआशियाई व युरोपियन बाजारपेठेत ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती. अपेक्षांची गणितं चुकली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. त्यावर पुनर्विचार केला. त्या बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून, संबंधित धोरणे बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.

Success Story Of Titan – टायटन कंपनीची यशोगाथा

Reading Time: 4 minutesतुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १ लाख टायटनच्या  शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. २१ लाख असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर बाजारमूल्यात आपण मोजलेले नाही. १ नोव्हेंबर २००१ रोजी रु.६२ मध्ये मिळणारा टायटनचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. १३०१ पर्यंत वाढलेला होता. टायटनने गेल्या १० वर्षांत जवळपास २०००% परतावा दिला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टाटा समूहाचा एक भाग असलेली  ‘टायटन कंपनी’ केवळ घड्याळेच बनवत नाही तर ज्वेलरी, अक्ससेसरीज, साड्या या इतर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विकते. संपूर्ण जगात टायटन पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

Reading Time: 4 minutesअर्थ म्हणजे पैसा पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक, किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.  इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी वगैरे नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती. जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल? आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे. 

Reading: वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात

Reading Time: 2 minutesअनेक संशोधनातून असे सिध्द झाले आहे की वाचनाने माणसाच्या बौद्धिक क्षमतामध्ये वाढ होते. अनेकदा वाचन ही एक उपचारपद्धती म्हणून सुद्धा वापरली जाते. अल्पस्वरूपाच्या ताणामध्ये असणाऱ्या किंवा नैराश्य अनुभवत असलेल्या व्यक्तींसाठी वाचन हा उत्तम उपाय असतो. उत्सही,आनंदी करणारं वाचन एक उर्जा देऊ शकते आणि अशी उर्जा माणसाचे आयुष्य घडवते. कित्येक थोर व्यक्ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना किंवा कामाची प्रेरणा म्हणून त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचे नाव सांगतात.

कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

Reading Time: 3 minutes“अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.

मतदानासंदर्भात काही महत्वाची प्रश्न उत्तरे

Reading Time: 2 minutesटिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते. सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच पक्ष आवडतात. कुठल्या पक्षाला मतदान करायचे आहे, का करायचे आहे ते तुम्ही ठरवा. कुणालाही मतदान करा पण या मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून पळून जाऊ नका.

मतदान करण्याची ४ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutesप्रत्येक मत योग्य उमेदवार निवडण्यासाठी आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असतेच. परंतु,एका दिवसाच्या मजेसाठी आपल्या हक्क आणि कर्तव्याला विसरु नका. मतदानाच्या दिवशी मत देऊन तुमच्या सुट्टीचा सदुपयोग करा. मत दिल्यानंरही उरलेल्या वेळेत तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता. NOTA चा अधिकार आहे हे मान्य. पण उठसूट प्रत्येक निवडणुकीला प्रत्येकानेच मतदान करायचं नाही, असं ठरवलं तर लोकशाही चालणार तरी कशी?