Reading: वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात

Reading Time: 2 minutes

Reading

अनेक संशोधनातून असे सिध्द झाले आहे की वाचनाने (Reading) माणसाच्या बौद्धिक क्षमतामध्ये वाढ होते. अनेकदा वाचन ही एक उपचारपद्धती म्हणून सुद्धा वापरली जाते. अल्पस्वरूपाच्या ताणामध्ये असणाऱ्या किंवा नैराश्य अनुभवत असलेल्या व्यक्तींसाठी वाचन हा उत्तम उपाय असतो. उत्सही,आनंदी करणारं वाचन एक उर्जा देऊ शकते आणि अशी उर्जा माणसाचे आयुष्य घडवते. तुम्हाला वाचनाचा कंटाळा येत असेल, आळस वाटत असेल आणि पुस्तकं न वाचण्याची शंभर करणे तुम्ही देत असाल तर, पुस्तक वाचण्याची प्रेरणा तुम्हाला हा लेख देईल.

Reading: कला, साधना आणि तपश्चर्या

  • वाचन ही कला आहे, वाचन साधना आणि तपश्चर्या देखील आहे, वाचन मेंदूसाठी कसरत आहे आणि मनासाठी आल्हाददायक अनुभव आहे. सर्वांगाने समृद्ध असणारा माणूस एक उत्तम वाचक असतो.
  • एक उत्तम वाचकच, उत्तम श्रोता, वक्ता, लेखक, संवादक असतो. म्हणूनच तुम्हीही स्वतःमध्ये वाचनाची सवय पेरा, जोपासा, तेव्हा तर आयुष्याला दिशा मिळेल.
  • कित्येक थोर व्यक्ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना किंवा कामाची प्रेरणा म्हणून त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचे नाव सांगतात.

इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

Reading: वाचन आणि सकारात्मक मानसिकता 

१. मानसिक आरोग्य- 

तुमच्या शारीरिक आरोग्याइतकेच तुमचे मानसीक आरोग्य महत्वाचे आहे. मनाला वळण लावायचे असेल तर, सोपा आणि बिनखर्चिक उपाय म्हणजे वाचन. वाचन नेहमीच प्रेरणादायी असते. तुमच्या क्षेत्रातील दिग्गजांचे आत्मचरित्र, किंवा विजयगाथा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कामासाठी प्रेरणा मिळते.

२. तार्किक विचार करण्याची क्षमता- 

वाचन माणसाच्या विचारणा दिशा देते. आपल्या काय म्हणायचे आहे त्याची मांडणी, विस्तार, त्यामागे योग्य तर्क लावण्याची सवय वाचनामुळे लागते.

३. माहिती- 

आपल्या आसपास काय घडत आहे याची जाणीव तत्कालीन वाचन साहित्यातून होते. एवढेच नाही तर, सामाजिक देवाणघेवाणीत आपला सहभाग ही वाचानामुळेच वाढतो.

४.शांत झोप- 

संशोधांतून असे सिध्द झाले आहे की वाचन करणाऱ्या व्यक्तींना वाचन न करणाऱ्या लोकांहून जास्त शांत आणि चांगली झोप लागते.

५. वाचनाचा प्रसार- 

फक्त एका व्यक्तीचे वाचन त्याचे स्वताचे आयुष्य घडवू शकते तर, संपूर्ण समज, देश, जग वाचन करत असेल तर, साऱ्याचीच प्रगती होईल. प्रत्येकजणच समृध्द होईल आणि असा समज प्रगतीच्या वाटेवर चालत जाईल. म्हणूनच वाचन ही चळवळ असावी. वाचन एकामेकांना वाचण्याची प्रेरणा देणारे असावे, आणि वाचन सर्वांसाठी असावे.

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

वाचनाची सवय कशी लावावी?

  • दररोज पुस्तकाचे निदान एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. एक  पान वाचण्याचा नियम तुम्हाला वाचनाची सवय लावेल. आणि मग वाचन सवयीचे होईल.
  • झोपण्याच्या जागेच्या शेजारी पुस्तक ठेवा. रोज जेव्हा झोपायला जाल तेव्हा ते पुस्तक वाचण्याची आठवण राहिल आणि वाचनानंतर शांत झोप ही लागेल.
  • कामाच्या ठिकाणी जाताना, प्रवास करताना विकत घेतलेले पुस्तक आपल्या बॅगमध्ये किंवा ब्रीफकेसमध्ये ठेवा. प्रवासात, जेवणाच्या किंवा इतर मध्यंतरामध्ये एखादे पान वाचा.
  • सकाळी किंवा संध्याकाळी वाचनासाठी एक वेळ निश्चित करा. घरी किंवा उद्यानात कोणत्याही शांत ठिकाणी जा आणि वाचा.
  • प्रत्येकजण दररोज खूप पाने वाचून संपवू शकालच असे नाही. वर्षातून एखाद दुसरे पण मन लावून वाचलेले पुस्तक तुमच्या आयुष्यभर स्मरणात राहील.
  • दररोज एकच पान वाचण्यास प्रारंभ करा. आपली सवयी आपला नित्यक्रम बनेल आणि तुमचे जीवन देखील बदलेल.

वाचन ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. यासवायीमुळे कोणतेच दुष्परिणाम किंवा हानी होत नाही. उलट तुमच्या ज्ञानामध्ये, बौद्धिक क्षमतांमध्ये भर पडते. शिवाय हा छंद अजिबात खर्चिक नाही. कोणाच्याही खिशाला परवडणारा आणि प्रत्येकाला तितकाच आनंद देणारी ही सवय तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल ही खात्री बाळगा. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!