पीएमएवाय-  क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेचे फक्त १८० दिवस बाकी

Reading Time: 2 minutesअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. परंतु अनेकदा दोन वेळची रोजीरोटी कमवून शिल्लक राहिलेली तुटपुंजी जमापुंजी घर घेण्यासाठी पुरेशी नसते. पण तरीही स्वतःचं घर हे स्वप्न माणसाला सतत साद घालत असतं. काही वेळा मात्र आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग गवसतो आणि अचानकपणे घराचे स्वप्न साकार होते. केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री आवास योजना” या सर्वांसाठी हक्काचे घर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या  योजनेने अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे. 

करोडपती भारतीयांची संख्या लाखापेक्षाही कमी?

Reading Time: < 1 minuteसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हणजेच सीबीडीटीने (CBDT)नुकतीच आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांची आकडेवारी  प्रसिद्ध केली. 

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

Reading Time: 4 minutesआज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. तसंच, आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. आजच्या लेखात जाणून घ्या रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या दहा सवयी, ज्यांचं दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

थोडक्यात: शेअर मार्केट

Reading Time: 2 minutesथोडक्यात महत्वाचे पीएमसी बँक न्यूज स्टेट बँक ऑफ इंडिया वि. बजाज फायनान्स आयआरसीटीसीच्या (IRCTC) प्राथमिक भाग विक्रीला प्रचंड प्रतिसाद:

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

Reading Time: 3 minutesसर्वसामान्यपणे कोणताही नियम अंगी बाणवायचा असेल, त्याला आपल्या सवयीचा भाग बनवायचा असेल, तर सलग २१ दिवस ती गोष्ट पाहिजे. एक संकल्प करा आणि त्याचे पालन सातत्य आणि शिस्तिने २१ दिवस करा. तुम्हाला त्या संकल्पाची सवय लागलेली असेल. यशाची शिखरे गाठणारे लोक त्यांच्या नियमित सवयीसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे तुम्हालाही आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी अंगी बाणवा आणि बघा तुमचे आयुष्य बदलेले असेल.  पुढील नियमांचे पालन करा. या सवयी तुमचे आयुष्य बदलतील –

‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesसध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला पसंती दिली जात आहे. पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत.  अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. 

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

Reading Time: 2 minutes“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी” म्हणजेच  आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७ कोटी नोंदणीकृत पॅन कार्ड धारकांपैकी केवळ ६.७७ कोटी धारकांनी पॅन क्रमांक आधारशी जोडला आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, यासाठीची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Work Life Balance : ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

Reading Time: 3 minutesआजच्या धकाधकीच्या आयुष्यात “काम आणि कुटुंब” याची सांगड घालताना म्हणजेच ‘वर्क लाईफ बॅलन्स” करताना जवळपास प्रत्येकाचीच तारेवरची कसरत होत असते. यामुळे अनेक आजार व त्यामुळे येणारे इतर तणाव वाढत चालले आहेत. यावर उपाय काय? कसा करायचा वर्क लाईफ बॅलन्स?  याचं उत्तर अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त खाली दिलेल्या मुद्द्यांचा नीट विचार करा आणि प्रोफेशनक आयुष्यासोबत कौटुंबिक जीवनही आनंददायी करा.