थोडक्यात: शेअर मार्केट

Reading Time: 2 minutes

स्टेट बँक ऑफ इंडिया वि. बजाज फायनान्स

 • भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या सरकारी मालकीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला बजाज फायनान्स या खाजगी कंपनीने मागे पाडले आहे.
 • शेअर बाजारात बजाज फायनान्सचे एकूण बाजार मूल्य स्टेट बँकेपेक्षा जास्त नोंदवले गेले.
 • कमवणाऱ्या तरुण पिढीला कर्ज वितरणाचे आकर्षक पर्याय देत बजाज फायनान्स दरवर्षी अक्षरशः लाखो ग्राहकांशी जोडली जात आहे.
 • स्टेट बँक मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या ‘एनपीए’मुळे अडचणीत येत आहे.

१. व्याजाचे उत्पन्न :

 • स्टेट बँक ऑफ इंडिया : ₹2,53,322 कोटी
 • बजाज फायनान्स : ₹ 18,485 कोटी

२. एकूण नफा  :

 • स्टेट बँक ऑफ इंडिया : ₹ 862 कोटी
 • बजाज फायनान्स : ₹ 3,995 कोटी

३. 10 वर्षांतील शेअर्सच्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा:

 • स्टेट बँक ऑफ इंडिया : 15.8%
 • बजाज फायनान्स : 14.362% (143 पट वाढ !)

४. आपण कुठला शेअर घ्यावा हे स्वतः अभ्यास करूनच ठरवायला हवे.


आयआरसीटीसीच्या (IRCTC) प्राथमिक भाग विक्रीला प्रचंड प्रतिसाद:

 • IRCTC = Indian Railway Catering and Tourism Corporation
 • आयआरसीटीसी सरकारी रेल्वे कंपनी आहे. 
 • भारत सरकार या ‘आयपीओ’द्वारे  (IPO) स्वतःकडील 645 कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे. 
 • आयआरसीटीसीच्या भविष्यातील प्रगतीवर विश्वास ठेवून कंपनीच्या शेअर्स साठी तब्बल 72,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची म्हणजे 112 पट मागणी नोंदवली गेली आहे. 
 • शेअर प्राप्त करणाऱ्या एका नशीबवान गुंतवणूकदाराच्या मागे चक्क 110 न शेअर मिळवणारे आवेदक असणार आहेत. 
 • प्रत्यक्षात शेअर बाजारात नोंद होतांना आता रु.340 ला विकत घेतलेला शेअर गुंतवणूकदारांना किती फायदा देऊन जातो, हे बघण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा:

 • रक्कम काढण्याची मर्यादा वाढून २५ हजारांवर
 • सहा महिन्यांत खात्यातून कमाल २५,००० रुपयांर्पयची रक्कम काढता येणार आहे.
 • पीएमसी बँकेच्या रोकड तरलतेचा विचार करत  ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा अजून शिथिल करण्यात येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केले.
 • कमाल २५ हजार रुपये रक्कम काढण्याचा लाभ बँकेच्या ७० टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना होईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

तंत्रज्ञानातील ५ क्रांती: 

 1. औद्योगिक क्रांती:- १७७०- १८३०
 2. वाफेवर चालणारी रेल्वे:- १८३०- १८७५
 3. स्टील, वीज आणि अवजड अभियांत्रिकी यंत्रे: १८७५ – १९२०
 4. तेल, वाहन आणि मोठया प्रमाणावर होणारे उत्पादन – १९२० – १९७५
 5. माहिती आणि दूरसंचार:- १९७५ पासून

पीएमसी (PMC) बँकेच्या खातेदारांना दिलासा-

 • पीएमसी (PMC) बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारी घोषणा आरबीआयने केली आहे.
 • पैसे काढण्यासाठी पूर्वी रु. १०००/- ची मर्यादा घालण्यात आली होती. परंतु आता ही मर्यादा रु.१००००/- पर्यंत वाढवली आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का?

 • भारतीय ‘ओयो’ चीन मधला आता सगळ्यात मोठा हॉटेल ब्रँड आहे. चीनमध्ये ओयो 337+ शहरे, 10,000+ हॉटेल्स आणि 5 लाख + रूम्स पोहोचला आहे.
 • भारतामध्ये ‘ओयो’ 260+ शहरे, 8,700+ हॉटेल्स आणि 1.7 लाख + रूम्स पोहोचला आहे.
 • सध्या ओयो जगभरात 80 देशांतील 800 पेक्षा जास्त शहरांत सेवा देत आहे.
error: Content is protected !!