कर्जाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक !

Reading Time: 3 minutes ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी ‘रक्कम’ देण्याची ‘किंमत’ तिघेही भरतात. चित्रपटात बघताना हे सगळं गंमतीदार, विनोदी वाटतं. कारण परदुःख शीतल आणि पर-घटना विनोदी वाटतात.चित्रपटातील ‘हेराफेरी’ ही कितीही विनोदी वाटो पण वास्तविक आयुष्यात त्यातील एक टक्का जरी घटना घडली वा प्रसंग उद्भवला तरीही होत्याचं नव्हतं होतं. वास्तविक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात. ज्याने विश्वास टाकला, ज्याची प्रत्यक्ष फसगत झाली त्याचं आयुष्य उध्वस्त होत. त्याच्या कुटुंबियांचं, जे प्रत्यक्ष निर्णयात सहभागी नसतात पण त्याच्याशी  संबंधित असतात त्यांनांही मोठी झळ पोचते. अशीच एक फसवेगिरीची घटना घडली महाराष्ट्रातच नेवासा, श्रीरामपूर आणि राहूरीमध्ये. येथील अनेक लोकांची फसगत झाली.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutes घरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!

करदात्यांच्या वर्तणुकीवर कर विभागाचे  बारीक लक्ष?

Reading Time: 2 minutes कोपरखळी म्हणजे काय तर कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली कृती. फेसबुकवर जसं ‘पोक’चा पर्याय असतो, ज्याचा उपयोग काय हे कित्येक जणांना माहिती नसतो. पोक करणे म्हणजेच कोपरखळी मारणे. लक्ष वेधून घेणे. भारतीय कर तसेच महसूल विभागानेही आता नवीन पद्धतीचा आणि उपाययोजनांचा वापर करून करदात्यांना विशेष करून बेजबाबदार करदात्यांना कोपरखळी मारली आहे.

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

Reading Time: < 1 minute सिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि कंपनीच्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते.  सिबिलकडे आपला आर्थिक लेखाजोखा असतो. आपले क्रेडिट कार्ड्स, कर्ज, कर्जाची वारंवारता, त्यांचे हप्ते, त्यांची झालेली परतफेड, परतफेड करण्याच्या वेळा, पद्धती, थकबाकी, इत्यादी सगळी माहिती जपली जाते. ही सगळी माहिती नोंदणीकृत बँका व इतर आर्थिक संस्था सिबिलकडे नियमितपणे (साधारणतः मासिक पद्धतीने) पोहोचवत असतात.  

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या भागात आपण दोन ‘जन्म दाखला’ आणि ‘आधारकार्ड’ अशा दोन महत्वाच्या  कागदपत्रांची माहिती घेतली. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही दोन्ही कागदपत्रे कायद्याने अनिवार्य आहेत. या भागात आपण लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या  इतर कागदपत्रांबद्दल माहिती घेऊया.

करबचतीचे सोपे मार्ग

Reading Time: 4 minutes आपले खरे उत्पन्न न दाखवता बनावट नोंदीतून करापासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असे कराच्या चोरीचे गुन्हे शिक्षेस पात्र असतात. मग करबचत म्हणजेही कराची चोरीच आहे का? तर नाही. करबचत ही कराची चोरी नसून सामान्य माणसाचा कर वाचावा, त्याला कमीतकमी कर भरावा लागावा यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे. व्यक्तीच्या वाढणाऱ्या गरजा आणि त्यांवर होणारा खर्च पाहता, सरकारकडे भरावा लागणारा कर सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनावर ताण निर्माण करतो. मोठ्या शहरांमध्ये वाढणाऱ्या गरजा आणि त्यावर होणारा खर्च, भविष्याच्या नियोजनासाठी पैशांची गुंतवणूक, शिक्षणासारख्या गरजांवर होणारा मोठा खर्च, हे सारे खर्च अपरिहार्य असतात. सर्व कर वगळून हातात खर्चासाठी येणारं उत्पन्न (Disposable Income) या सर्वांपुढे अपुरं वाटू लागतं. यातून लोकांनी कर चोरी किंवा इतर बेकायदेशीर मार्गांकडे जाऊ नये. कर वाचावा म्हणून विचारी आणि कायदेशीर मार्गाने करबचत करता येणे सहज शक्य आहे.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३

Reading Time: 2 minutes धोक्याची सूचना! इंटरनेट बँकिंग वापरताना कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येते. मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल तर इंटरनेट बँकिंग चा काळजीपूर्वक वापर करणं फार महत्वाचं आहे. इंटरनेट बँकिंग हे साधन जितकं सोईस्कर आहे तितकच धोक्याचाही आहे. इंटरनेट बँकिंग बद्दलची अपुरी माहिती फार महागात पडू शकते. ‘Half knowledge is always dangerous’  असं म्हणतात, ते इथेही खरं आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार हाताळताना, मग ते लहान रकमेचे असोत की करोडोंचे, पुढील काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकता, अथवा ऑनलाईन फ्रॉड, आणि तत्सम धोक्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असेल.

धनत्रयोदशी आणि भारतीय अर्थव्यवस्था

Reading Time: 2 minutes आज सोनियाचा दिनु…….!!! आज धनत्रयोदशी! सर्वांच्या आवडत्या सणाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आयुर्वेदामध्ये आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचं पूजन केले जाते. तर धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी सुवर्ण म्हणजेच सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. माणसाच्या आयुष्यात आरोग्याची किमंत सुवर्णमूल्यापेक्षा जास्त आहे. आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घेता, आजच्या दिवशी धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांचे सूर परस्परांशी जुळून आले आहेत . पण या सुवर्ण खरेदीचे सूर अर्थशास्त्राशी जुळतात का? हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आणि विचार करण्याजोगा आहे.

सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

Reading Time: 3 minutes “सोना कितना सोना है”.  डिजिटल भारतामध्ये सोने खरेदीनेही आधुनिक रूप धारण केले आहे. सोनं जवळ बाळगण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सोन्याची ‘डिजिटल’ खरेदी नेहमीच लाभदायक ठरते .या दिवाळीला कपडे, गॅजेट्स, इत्यादीच्या ‘ऑनलाईन शॉपिंग’ सोबत सोन्याची खरेदी ही  ‘डिजिटल’ करता येणं सहज शक्य आहे. या आधुनिक पद्धती नक्की कुठल्या आहेत? त्याचे फायदे/ तोटे काय आहेत?

सुवर्ण गुंतवणुकीची धनत्रयोदशी

Reading Time: 3 minutes आपल्या देशात सण समारंभांना फार महत्व आहे. सण म्हटले की खरेदी आलीच. एरवी गर्दीचा कंटाळा करणारे लोक सणाच्या खरेदीसाठी मात्र ‘शॉपिंगच्या’ पिशव्या सांभाळत, गर्दीतून अनेक दुकाने पालथी घालत, उन्हातून तासन् तास फिरत असतात. कपडे, गॅझेट्स, अप्लायन्सेस ही सारी खरेदी तर असतेच पण सर्वात महत्वाची असते ती सोने खरेदी. सणांना व लग्नकार्यात भेट देण्यासाठी अथवा शुभमुहूर्त म्हणून सोने खरेदी केली जाते. भारत देश हा जगातील सर्वात जास्त सोनं आयात करणारा देश आहे. एकूण जगभरातील सोनं आयातीच्या एक तृतीयांश सोनं एकटा भारत देश आयात करतो.  पर्यायाने भारतातील भारतीयांच्या सोनं खरेदीच्या या वेडाचा परिणाम नकळतपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यायाने देशाच्या GDP वर होत आहे.