Reading Time: 4 minutes

साधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. या कॅटेगरीचे त्यावेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

  • काही म्युच्युअल फंड ८-९ वार्षिक दराने, तर काही म्युच्युअल फंड तब्बल १२% वार्षिक दराने दरमहा नियमित लाभांश देत राहिले. नोव्हेंबर २०१६ च्या नोटा निश्चलीकरणानंतर इक्विटी हायब्रीड ह्या कॅटेगरीचा गुंतवणूक ओघ जास्त वाढला. 
  • २०१८ च्या बजेटमध्ये ह्या लाभांशावर कर लागू झाला, म्हणजेच म्युच्युअल फंडला लाभांश वितरणाच्या अगोदर सरकारला लाभांश कर वितरित करून मग गुंतवणूकदारांसाठी करमुक्त लाभांश वितरित करने चालू झाले. 
  • एप्रिल २०१८ पूर्वी लोकप्रिय असलेला लाभांश पर्याय गुंतवणूकदारांनी बदलून ग्रोथ पर्यायातील सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅनची (SWP) सुविधा घेण्यास सुरुवात केली. 
  • एसडब्लूपीच्या सुविधेमध्ये म्युच्युअल फंडाचे वितरक आपल्या गुंतवणूकदारांना त्यांचा गुंतवणुकीवर वार्षिक साधारण ८-९% दराने एसडब्लूपी सुविधेद्वारे मासिक उत्पन्न मिळवून देऊ लागले. उद्दिष्ट एकच होते की इक्विटी हायब्रीड कॅटेगरीमध्ये समभाग गुंतवणूक ही साधारण ६५% आणि कर्जरोखे गुंतवणूक ३५% आसपास असल्याने बाजारातून जर १०-११% चा वार्षिक परतावा गृहीत धरल्यास गुंतवणूकदाराला नियमित उत्पन्नही मिळेल व एसडब्लूपी परताव्यापेक्षा जास्तीची वाढ आपल्या मूळ गुंतवणुकीत वाढत जाईल. 
  • २०१८-१९ पासून जे गुंतवणूकदार एसडब्लूपी मधून नियमित उत्पन्न घेत आलेले आहेत, त्यांना अगदी जानेवारी २०२० पर्यंत नियमित उत्पन्न, तसेच आपल्या मूळ गुंतवणुकीत काही घट झालेली दिसली नाही. म्हणजेच सर्व कसे अपेक्षेप्रमाणे  सुरळीत सुरु होते. 
  • फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर वाढत गेला आणि ताबडतोब अगदी पुढच्या २० दिवसात जगभरातले शेअर बाजार तब्बल ४०% वर आपटले. इक्विटी हायब्रीड फंडामध्ये समभागांचे प्रमाण ६५% असल्याने ह्या कॅटेगरी मधील फंड साधारण २८-३०% खाली आले. म्हणजेच ज्यांची मूळ गुंतवणूक समजा रु १०,००,००० असेल तर ती २० दिवसात ७-७.२५ लाखापर्यंत खाली आली. 

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

अशावेळी “एसडब्लूपी”द्वारे दरमहा नियमित उत्पन्न घेणाऱ्या जेष्ठ नागरिक गुंतवणूकदारांनी काय करावे? 

  • बाजारातील अल्पकालीन चढ उतार ही बऱ्याच अंशी भावनिक असते. कोरोनाच्या भीतीने जागतिक शेअर बाजार खाली आले. मात्र आपण घाबरून न जाता आपली गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे. अन्यथा आपण आपले मोठे नुकसान करून घेऊ. 
  • चीन मध्ये जसा कोरोना काबूत आणला गेला तसा जागतिक पातळीवरही आटोक्यात आणला जाईल. मात्र त्याला काही कालावधी जाईल. 
  • वैद्यकीय विज्ञान आज खूप पुढे गेलेले आहे. ते नक्कीच काही औषधोपचार शोधून काढतील हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. जेष्ठ नागरिकांचे गुंतवणुकीतून उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला दरमहा नियमित उत्पन्न मिळत राहिले पाहिजे. आपण आपल्या उद्दिष्टापासून अजिबात न ढळता आपली एसडब्लूपी नियमित चालू ठेवली पाहिजे. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो. 

  • समजा आपण ०१/०४/२००८ ह्या दिवशी गुंतवणूक केली होती कारण हा असा काळ होता की बाजार वरच्या दिशेनेच चालला होता. मी ही तारीख ह्यासाठी घेतली की ह्या तारखेनंतर सलग मार्च २००९ पर्यंत बाजार खाली खाली जात राहिला.
  • मार्च २००९ मध्ये तो एप्रिल २००८ च्या उच्चांकापेक्षा ६१% खालच्या पातळीवर बंद झाला होता.
  • त्यानंतर पुढील एक वर्षात बाजाराने आपली २००८ ची उच्चान्कची पातळी पुन्हा पार केली होती. 

जर एखाद्या जेष्ठ नागरिक गुंतवणूकदाराने ०१/०४/२००८ ह्या तारखेला गुंतवणूक करून वार्षिक ९% दराने दरमहा नियमित उत्पन्न घेतले असते, तर त्याची आजची गुतंवणुकीची वाढ किंवा घट किती असती, हे आपण दोन योजनांच्या प्रत्यक्ष एनएव्ही (निव्वळ मालमत्ता मूल्य) ने तपासून घेऊ.

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

१. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड (ICICI Prudential Balanced Advantage Fund) –

  • दि. ०१/०४/२००८ ह्या दिवशी ह्या योजनेमध्ये आपण रु. १०,००,००० गुंतवून पुढील मे २००८ महिन्याच्या १० तारखेपासून आपली रु. ७,५०० एसडब्लूपी चालू केली होती. साधारण मार्च २००९ मध्ये बाजार ६१% खाली आल्यावर आपल्या मूळ गुंतवणुकीचे मूल्य फक्त रु. ६,६९,१०० उरले होते. अशावेळी खचून न जाता ज्यांनी आपली गुंतवणूक चालू ठेवली त्याच बरोबर आपली रु. ७,५०० ची एसडब्लूपी चालू ठेवली त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होऊन जानेवारी २०१० मध्ये मूळ गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा  रु. १० लाखापेक्षा जास्त झाले. 
  • मार्च २००९ मध्ये जे घाबरून बाहेर पडले त्यांचे खूप नुकसान झाले. असे गुंतवणूकदार पुन्हा म्युच्युअल फंडाकडे वळलेच नाहीत. ज्यांनी धैर्य दाखवले त्यांची मूळ गुंतवणूक ही २०२० च्या मार्च महिन्यातील शेअर बाजारातील ४०% पडझडीनंतर ही दि.२३/०३/२०२० रोजी मूल्य रु. १२,६१,५०९ आहे. त्याचबरोबर गेल्या १४३ महिन्यात मासिक रु. ७,५०० प्रमाणे एकंदर रु. १०,७२,५०० इतके उत्पन्नही मिळाले. 

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

२. एसबीआय इक्विटी हायब्रीड फंड (SBI Equity Hybrid Fund) –

  • ०१/०४/२००८ ह्या दिवशी ह्या योजनेमध्ये आपण रु. १०,००,००० गुंतवून पुढील मे २००८ महिन्याच्या १० तारखे पासून आपली रु. ७,५०० एसडब्लूपी चालू केली होती.  साधारण मार्च २००९ मध्ये बाजार ६१% खाली आल्यावर आपल्या मूळ गुंतवणुकीचे मूल्य फक्त रु. ५,७४,००० उरले होते. अशावेळी खचून न जाता ज्यांनी आपली गुंतवणूक चालू ठेवली त्याच बरोबर आपली रु. ७५०० ची एस डब्लू पी चालू ठेवली त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होऊन जानेवारी २०१० मध्ये मूळ गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा रु. १० लाखापेक्षा जास्त झाले. 
  • २०२०च्या मार्च महिन्यातील शेअर बाजारातील ४०% पडझडीनंतरही दि.२३/०३/२०२० रोजी मूल्य रु. ११,०६,७३२ आहे. त्याच बरोबर गेल्या १४३ महिन्यात मासिक रु. ७,५०० प्रमाणे एकंदर रु. १०,७२,५०० इतके उत्पन्न हि मिळाले. 

इथे कोणत्याही विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या योजनांची जाहिरात नाही, इक्विटी हायब्रीड कॅटेगरी मध्ये असे बरेच फंड आहेत ज्यांनी चांगला परतावा दिलेला आहे. आपला आर्थिक नियोजनकार आपल्याला फंड निवडीसाठी मदत करतील. 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत धैर्य आणि संयम ज्यांनी दाखवला त्यांचे कधीच नुकसान झाले नाही, हा इतिहास आहे. सध्या बाजार जरी ४०% खाली आला असला, तरी खचून न जात आपली गुंतवणूक कायम ठेवा. आपल्या आर्थिक उद्दिष्टाप्रमाणे आपली एसडब्लूपी चालू ठेवा. भारताच्या सुदृढ अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवा. दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपले निवृत्तिनियोजन सुखकारक करा.

धन्यवाद !

– निलेश तावडे 

९३२४५४३८३२

[email protected]

(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते, सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…