शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
Reading Time: 6 minutesशेअर बाजार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात झाल्यावर लोक त्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. यातून विविध प्रकारे गुंतवणूक करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जे पारंपरिक गुंतवणूकदार आहेत त्यांनी बाजारात त्यांची गुंतवणूक कोणत्या पद्धतीने करावी ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होईल? एका झूम मिटिंगद्वारे माझे युवामित्र ‘पंकज कोटलवार (पंको)’ यांनी आपला रोखेसंग्रह (Portfolio) कसा तयार करावा? हे समजावून सांगताना त्याच्या गुंतवणूक पद्धतीची माहिती दिली. यात त्यांनी जे मुद्दे अधोरेखित केले त्याच्याशी मी जवळपास सहमत आहे त्यामुळे सर्वानाच याची माहिती व्हावी यासाठी मी हा लेख लिहीत आहे.