अर्थसंकल्प २०२०-२०२१ – नवीन करप्रणाली

Reading Time: 3 minutes एकदम महत्वपूर्ण बदल केला तर लोकांच्या रोशात कदाचीत भर पडेल म्हणून बहुसंख्य लोक काय करतात याचा आढावा घेण्याचा हा प्रयोग आहे. तो किती यशस्वी होतो ते येणारा काळ ठरवेल. या तरतुदींमध्ये अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत किंवा झाल्यानंतरही महत्वाचे बदल होऊ शकतात. 

खाद्यान्न (अ)सत्य आणि तथ्य

Reading Time: 6 minutes मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने माझ्यासह शिक्षण विभागातील २५ च्या आसपास कार्यकर्ते व फूड टेक्नॉलॉजी, डाएटिंगचे शिक्षण घेणारे ७५ च्या आसपास महाविद्यालयीन विद्यार्थी अशा १०० अधिक लोकांनी नोंदणी करून, सदर कार्यशाळेत भाग घेतला. खरेदी करताना आपण चिकीत्सा करतो त्यासोबत येणाऱ्या कर्तव्याचे काय? तेव्हा आपल्याला पडलेल्या शंकांचे समाधान करून घ्यावे. 

अर्थसंकल्प २०२०-२०२१ एक दृष्टीक्षेप

Reading Time: 3 minutes अर्थसंकल्पातील महत्वाची तरतूद म्हणजे सध्या ऐच्छिक असलेली व पुरेशी स्पष्टता नसलेली त्यामुळेच किचकट झालेली, नवीन करप्रणाली, लाभांशावरील वितरण करकपात रद्द करून तो गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर कर भरण्याची टाकलेली जबाबदारी आणि ठेव विमा कवचात केलेली वाढ, यामुळे होणारे परिणाम यावरील २ ते ३ स्वतंत्र लेख यानंतरच्या लागोपाठ येणाऱ्या आठवड्यात वाचूयात.

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutes शेअरबाजार नवनवीन उच्चांकी विक्रम करीत असताना आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना अपेक्षित परतावा देत नाहीत, असं आढळून आल्याने आपण यातील गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करताय का? असं असेल, तर तडकाफडकी असा काही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा. फक्त म्युच्युअल फंड युनिट नव्हे, तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचे मूल्य अनेक कारणांनी कमी अधिक झाले आहे. तेव्हा प्रथम खालील चार प्रश्नांची उत्तरे मिळावा आणि मगच यासंबंधी विचार करा.

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन – २०१९/२०

Reading Time: 4 minutes चालू आर्थिक वर्ष (२०१९/२०) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही.  पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन, वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून, आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.

Kakeibo: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!

Reading Time: 3 minutes हिशोब करण्यासाठी कोणत्याही खास तंत्राचा वापर केला जात नसे शिल्लक असलेल्या पैशात आलेले पैसे मिळवून ते वहीच्या डाव्या बाजूला तारखानुसार जमा दाखवले जात, तर त्यातून काय खर्च केला त्याचा तपशील उजवीकडे लिहून त्याची बेरीज केली जाई. जमा रकमेतून खर्च वजा करून शिल्लक पुढील तारखेस ओढून त्या दिवसाचा खर्च लिहिला जात असे. पैसे येण्याचे प्रमाण अगदी कमी प्रामुख्याने पगार अथवा वसूल उधारी असे, तर खर्च करताना अत्यावश्यक खर्च करायलाच पाहीजे ही भावना असून त्यानुसार नियोजन केले जात असे. 

गुंतवणूक नियोजन: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनाच्या ५ स्टेप्स

Reading Time: 3 minutes काही वेळा व्यवसायामध्ये एवढी अनिश्चितता असते की यातून वार्षिक खर्चाची भरपाई होत असली, तरी ज्या किमान रकमेची गुंतवणूक व्हायला हवी ती त्यांच्याकडून होऊ शकत नाही किंवा असे काहीतरी करता येऊ शकेल का? या दृष्टिकोनातून ते विचारच करीत नाहीत. याची अनेक कारणे असली भविष्यकाळाचा विचार करून काही रक्कम वेगळी व बाजूला ठेवणे जरुरीचे असते.

ग्राहक पंचायत पेठ – सजग ग्राहक अभियान

Reading Time: 3 minutes ‘मुंबई ग्राहक पंचायत’ ही ग्राहकांनी ग्राहकांसाठी स्थापन केलेली आशिया खंडातील सर्वात मोठी अशी स्वयंसेवी ग्राहक संस्था असून ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. सार्वजनिक न्यास म्हणून तिची नोंदणी झाली असून, ‘Consumer International’ (CI) या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेची ती सदस्य आहे. वितरण हा संस्थेचा पाया असून त्याद्वारे दैनंदिन वापराच्या ९० ते ९५ वस्तू आणि साठवणीच्या किंवा विशेष अशा ५ ते १० वस्तू अशा एकूण १०० हून अधिक वस्तू संस्थेच्या सभासदांना दरमहा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. 

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

Reading Time: 3 minutes नवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन  क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे, याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutes कार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.