संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे

Reading Time: 3 minutes१ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

Reading Time: 2 minutes‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविराहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डसच्या माध्यमातून करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली.

भांडवल बाजार : समभाग आणि रोखे

Reading Time: 3 minutesभांडवलबाजार (capital market) म्हणजे काय? 

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutesभारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

Reading Time: 3 minutesया वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या योजनेनुसार यातील लाभार्थीना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000/- (रुपये तीन हजार) एवढे निश्चित निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या निवडक लाभार्थीना PM-SYM या पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

Mortgage Loan: तारण कर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

Reading Time: 3 minutesतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन , घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल व त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते.

पगारदारांनो आपली करदेयता कशी मोजाल ?

Reading Time: 3 minutesआयकर कायद्याच्या दृष्टीने एखादया व्यक्तीचे करपात्र उत्पन्न निश्चित करताना त्या व्यक्तीस मिळालेले वेतन, व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, अल्प /दीर्घ मुदतीच्या नफा, व्याजाचे उत्पन्न, घरापासून मिळालेले उत्पन्न, अन्य उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. यातील काही उत्पन्नावर मोजणी करतानाच सूट मिळत असल्याने ते विचारात घेताना ही सूट घेऊन मिळालेले उत्पन्न, हे एकूण उत्पन्न ठरवताना विचारात घेतले जाईल.

२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था

Reading Time: 3 minutes२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि संसदीय कामकाज नियमावलीनुसार यात महत्वपूर्ण तरतुदी करता येत नाहीत. लोकनियुक्त सरकारवर तसे कायदेशीर बंधन नसल्याने अनेक गट सक्रिय होऊन त्यांनी, त्यांना अपेक्षित बदलांची मागणी केली. अशा मागण्या सतत पुढे येत असताना, त्या मान्य करायच्या की संसदीय परंपरेचे जतन करायचे? हा सरकारपुढील प्रश्न होता. शेवटी परंपरांना छेद देऊन अनेक महत्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात सुचवण्यात आल्या आहेत, त्यातील काही महत्वाच्या तरतुदींचा आपण विचार करूयात.

बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलतींची आपणास माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesकोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचायला हवी, हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होतं की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी त्या दिल्या पाहिजेत त्यांना त्यात विशेष स्वारस्य अथवा जबाबदारीची जाणीव नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.