Highways: महामार्ग आणि मोटारी – अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी 

Reading Time: 3 minutes रस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक, हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?

Financial Resolutions: २०२१ च्या आर्थिक संकल्पांची अर्धवार्षिक आठवण 

Reading Time: 4 minutes जूनची अखेर आणि जुलैची सुरवात म्हणजे २०२१ हे अर्धे वर्ष संपले आहे, याची स्वत:लाच आठवण करून देण्याची वेळ. सध्याच्या बदलत्या आर्थिक स्थितीचा परिणाम झाला नाही, असा माणूस सापडणार नाही. पण आता व्यवहार सुरु झाले असताना आपणच नव्या वर्षात केलेल्या आर्थिक संकल्पांची (Financial Resolutions) आठवण करण्याची आणि त्यात जे करायचे राहिले आहे, ते करण्याची हीच वेळ आहे. 

Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutes कोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

Economic Changes: नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्वाची पाऊले

Reading Time: 3 minutes कोरोनाच्या साथीत जे अनेक बदल होत आहेत, त्यात आर्थिक बदलांचाही (Economic Reform) समावेश आहे. अशा बदलांत आरोग्य विमा काढणे, डीजीटलायशेनचा स्वीकार करणे आणि म्युच्युअल फंडासारखे गुंतवणुकीचे नवे मार्ग चोखाळणे, या तीन पावलांना अतिशय महत्व आहे. ही तीन पाऊले लवकरात लवकर उचलण्याची हीच वेळ आहे. 

NPS: एनपीएस – ज्येष्ठांसाठीची पेन्शन योजना आता अधिक आकर्षक 

Reading Time: 3 minutes बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा योजनांपैकी सर्वात चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस (NPS). तिच्यात काही चांगल्या बदलांचे सुतोवाच तिचे व्यवस्थापन करणाऱ्या न्यासाने केले आहेत. त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे. 

Capital Market Optimism: दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद !

Reading Time: 3 minutes कोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. 

Digitization: देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत? 

Reading Time: 4 minutes भारतातील डिजिटलायझेशनचा (Digitization) गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंकाकुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत, असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. 

शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?

Reading Time: 4 minutes उत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे.

Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

Reading Time: 4 minutes इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरु झाला आहे. पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार – असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे आपण कसे पाहणार आहोत? 

गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी… 

Reading Time: 4 minutes शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात गुंतवणूक करून प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छाअसते. पण बाजार इतका तापला होता, की तो खाली येणे क्रमप्राप्त होते. अशावेळी त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढते. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स ॲडव्हानटेजे फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.