Reading Time: < 1 minute
-
स्वातंत्र्यापूर्वी भारताचे बजेट ब्रिटीश राजघराण्यापुढे सादर केले जात असे.
- स्वातंत्र्यानंतर पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी, तर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी सादर केला होता.
- १९५६ पासून अर्थसंकल्प हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत सादर करायला सुरुवात झाली. पूर्वी तो फक्त इंग्रजीतून सादर केला जात असे.
- अर्थखात्याच्या बजेट डिपार्टमेंटकडून इतर मंत्रालयांशी चर्चा करून बजेट तयार केले जाते. अर्थमंत्री संसदेपुढे अर्थसंकल्प मंजुरीसाठी मांडतात.
- बजेट मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो –
- अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण,
- वार्षिक हिशोब पत्रक,
- वित्त विधेयक,
- मागणी अनुदान,
- देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी माहिती इ.
- “हलवा सेरेमनी” साजरी करून बजेट छपाई चे काम सुरु होते. अर्थसंकल्प अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापला जातो. याप्रसंगी अर्थमंत्री व अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. दरवर्षी हलवा सेरेमनीची सुरुवात अर्थमंत्री करत असतात. यानंतर जे कर्मचारी बजेट छपाईच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असतात त्यांना घरी न जाता अर्थमंत्रालयात राहूनच काम करावे लागते. बजेटमधली माहितीची गोपनीयता कायम राहण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना कोणाशीही संपर्क करण्यास बंदी असते.
- फेब्रुवारीच्या शेवटी बजेट सादर करण्याची परंपरा मोदी सरकारने मोडीत काढली आणि 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाऊ लागले.
- रेल्वे बजेट स्वातंत्रपणे सादर केले जाण्याची जवळपास 100 वर्षांपेक्षा जुनी परंपरा सरकारने बदलली. 2016 पासून एकच सोपे संयुक्त बजेट सादर केले जाऊ लागले.
- सर्वात जास्त म्हणजे तब्बल १० वेळा बजेट सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांनी मिळाला आहे.
- २०१९ मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :