Income Tax Portal : आयकर विभागाकडून नव्या पोर्टलची निर्मिती

Reading Time: 2 minutesआयकर विभागाकडून नवीन पोर्टल निर्मितीचे काम चालू असून, हे पोर्टल पुढील महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होईल. जुन्या पोर्टलवर असलेल्या सर्व माहितीची नोंद नवीन पोर्टलवर सुलभतेने व्हावी व पूर्ण क्षमतेने नवीन पोर्टलवर आपल्या माहितीचे स्थित्यंतरण व्हावे यासाठी 1 ते 6 जून 2021 पर्यत जुने पोर्टल सर्वसाधारण व्यक्ती आयकर विभागाचे अधिकारी यापैकी कुणालाही उपलब्ध नसेल. नवे पोर्टल हाताळावयास अधिक सुलभ असेल अशी खात्री आयकर खात्याकडून देण्यात आलेली आहे.

Blue Chip Mutual Fund: तुम्हाला ब्लू-चिप म्युच्युअल फंडाबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesआपला पैसा वाढवावा किंवा कुठे गुंतवणूक करावी याबद्दल कोणालाही विचारून बघा, वेगवेगळी उत्तरे मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे, बहुतेक भारतीयांना त्यांच्या कष्टाचा पैसा ‘इक्विटी किंवा स्टॉक मार्केटमध्ये’ ठेवण्याची भीती वाटते. याबद्दल काही दशकांपूर्वीची समस्या ‘माहितीचा अभाव’ ही होती पण आज जेव्हा भरभरून माहिती मिळविण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत तरीही निर्णय घेण्याची अक्षमता आहे.

Startup: मंदीतही स्टार्टअप्सनी शोधली संधी

Reading Time: 2 minutesकोरोना महामारीने वर्तमानातील स्टार्टअप्स (Startup) आणि फिनटेक (FinTech) क्षेत्राला कशा प्रकारे यशाचा मार्ग दाखवला. भर साथीच्या महामारीच्या लाटेतही स्टार्टअप्सनी नव-नवीन प्रयोग करणे थांबवले नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंगात एक संधी दडलेली असते. भारतातील स्टार्टअप्सनी या संधीचे सोने केले. त्यांनी या महामारीचे रुपांतर संधीत केले. 

FinTech: तुम्हाला फिनटेक बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesफिनटेक हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे निफ्टी= एनएससी +फिफ्टी, सेन्सेक्स= सेन्सेटिव्ह+ इंडेक्स. फिनटेक कंपन्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 

Salary Slip: सॅलरी स्लिप कशी समजून घ्यावी?

Reading Time: 3 minutes२१ व्या शतकाला स्पर्धेचं युग म्हणताना नोकरीचं क्षेत्र देखील मागे नाही. भरभक्कम पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न सगळेच पाहतात पण पगाराच्या मोठ्या आकड्याला हुरळून न जाता आपला पगार आणि कंपनीची धोरणं यांच्या कडे डोळे उघडून पाहायला हवं. फसवणूक आणि भ्रमनिरास टाळायचा असेल तर एकदा आपल्या सॅलरी स्लीपची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutesसध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्डधारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरात कमालीची वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

Financial Freedom: आर्थिक व्यवस्थापनाची चेकलिस्ट, तपासा हे १२ मुद्दे

Reading Time: 4 minutesआर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) म्हणजे पैशांची उधळपट्टी नव्हे, तर आयुष्यात केव्हाही पैशांची आवश्यकता असताना कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून केलेली उपाययोजना. थोडक्यात आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याकडे असणारी पैशांची उपलब्धता. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे कसे?

Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesआपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची सुविधा उपलब्ध असते. तसेच जवळपास सर्वच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. 

DigiLocker: तुम्हाला डिजीलॉकर बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 5 minutesडिजीलॉकर (DigiLocker) म्हणजे डिजिटल लॉकर. बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रमाणे आपण मौल्यवान वस्तू महत्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणें या आधुनिक तिजोरीत, सरकारी विभाग आणि सरकारने मान्यता दिलेले आपले अधिकृत महत्वाचे दस्तावेज तसेच आपल्याला महत्वाची वाटत असणारी अन्य कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतात. आवश्यकता पडल्यास यातील अधिकृत कागदपत्र मूळ कागदपत्रांसारखी वापरता येतात. अन्य व्यक्ती/ संस्था यांना संदर्भ म्हणून देता येतात. 

कोरोना महामारीच्या काळात मंदीमध्ये संधी मिळवणारे हे ७ व्यवसाय 

Reading Time: 3 minutesकोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.