Browsing Category
अर्थसाक्षरता
669 posts
माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ?
Reading Time: 4 minutesबचत आणि गुंतवणूक यांच्या अनेक योजना आहेत. आपल्याकडील पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, भविष्यकालीन गरज या सर्वांचा विचार करून कमी अधिक प्रमाणात पैशांची विभागणी करावी लागते. यात सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता यांचाही विचार करावा लागतो. या सर्वाचा विचार करून काहीतरी रक्कम आपल्याला बँकेत ठेवावी लागते. बँकेत ठेवलेले पैसे, जरी ते कोणत्याही योजनेत असले तरी आपल्याला मागणी केल्यास ताबडतोब मिळू शकतात. तेव्हा आपण कोणत्या बँकेत किती पैसे ठेवावे? कसे ठेवावेत? असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.
कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही?
Reading Time: 4 minutesकोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनांसच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा तोच एक मार्ग होता.
काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?
Reading Time: 3 minutesकाही महत्त्वाचा, अचानक आलेला खर्च करण्यासाठी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक च नसते. कारण महिना संपता संपता अनेक जणांचा पगार सुद्धा अस्सा संपलेला असतो की लक्षातच येत नाही. महिन्याची १ तारीख आणि शेवटची तारीख हसत हसत आनंदाने भेटल्या, असे फार कमी जणांचे होते. मग काही इमर्जन्सी खर्च उद्भवला तर इतरांकडे हात पसरायची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यासाठी काही ठोस पावले ही उचलायलाच लागतात.
आरबीआय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेस तिसरा बूस्टर डोस
Reading Time: 3 minutesअर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २२ मे २०२० रोजी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेचे चिंतन केले. २७ मार्च, १७ एप्रिल या नंतर दिलेला हा तिसरा बूस्टर डोस समजायला हरकत नाही.
कोरोना – संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा !
Reading Time: 4 minutesभारत नावाच्या आकाराने आणि लोकसंख्येने प्रचंड असलेल्या देशातील कोट्यवधी गरीबांना कोरोनाच्या संकटात सरकारी व्यवस्थेने मदतीला हात दिला. साधनसंपत्ती आणि माणसांच्या नोंदींमुळेच हे शक्य झाले. आधार कार्ड, जन -धनसारख्या नोंदी किती आवश्यक आहेत, हेच या संकटात सिद्ध झाले. त्यामुळे, या नोंदींविषयी गेल्या दशकात देशात संभ्रम निर्माण करणाऱ्या तथाकथित धुरीणानी भारतीय समाजाची माफी मागितली पाहिजे.
शेअर बाजार – रु. २० लाख कोटी ?? हा खेळ आकड्यांचा…
Reading Time: 5 minutesकोरोनामुळे येत असलेल्या आर्थिक अरिष्टांचा सामना करताना प्रत्येक देशाने मरगळलेल्या, मान टाकलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता उपाययोजना केल्या आहेत आणि आपला देश ही अर्थातच याला अपवाद नाही. मा. पंतप्रधानांनी त्यांच्या संबोधनांत रु. २० लाख कोटी रकमेच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करताच सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत करण्यात आले.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)
Reading Time: 3 minutesस्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.
Economic Package Day 2 : “आत्मनिर्भर भारत अभियान” विशेष घोषणा !
Reading Time: 2 minutesपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत अभियान” अंतर्गत २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. या पॅकेजची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मागील २ दिवसांपासून देत आहेत. त्यामधील काल केलेल्या महत्वपूर्ण घोषणांचा आढावा.