आर्थिक नियोजन आणि स्त्री – आर्थिक सल्लागाराच्या नजरेतून

Reading Time: 3 minutesगेली अनेक वर्षे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना लक्षात आले की सर्वसामान्यपणे स्त्रिया आपल्या आर्थिक नियोजनात काहीशा मागे असतात. अर्थार्जन आणि आर्थिक नियोजन ही कामे कौटुंबिक आयुष्यात पुरुषांची मक्तेदारी असल्याचा एक समज नकळतच आपल्या समाजमनात रुजलेला आढळतो आणि स्त्रियादेखील त्यांच्यावरील इतर सर्व जबाबदाऱ्यांची ओझी पेलता पेलता आर्थिक नियोजनाकडे काहीसे दुर्लक्ष करतात. त्यात देखील एकट्या स्त्रियांची अवस्था अजूनच बिकट असते. “महिलांचे आर्थिक नियोजन” या विषयावर थोडक्यात आढावा. 

नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना?

Reading Time: 4 minutesतंत्रज्ञानातील बदल, वाढत्या किमतीचा दबाव या सगळ्या गोष्टींमुळे बीएसएनएल सारख्या कंपनीवर वाईट दिवस आले व याचा परिणाम टेलिकॉम क्षेत्रावर झाला. तसेच आयटी क्षेत्रातही याचे पडसाद दिसून आले .’कॉग्निझेन्ट’ सारख्या मोठ्या कंपनी मधून तब्बल ५०० आयटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. नोकरी गमावणे यामागे केवळ आर्थिक मंदी किंवा त्या क्षेत्रातील घसरण अशी काही करणे नसतात, तर कित्येकदा आपली वैयक्तिक कामगिरी सुद्धा तेवढीच कारणीभूत असते. कर्मचाऱ्यांचे काम चांगले नसेल, तर कोणताही इशारा न देता कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. सतत पुढे जाण्यासाठी ‘जागरूकता’ ही गुरुकिल्ली आहे. म्हणून कंपनीमध्ये चालणाऱ्या घडामोडी,कंपनीचं वित्तीय धोरण, आर्थिक घसरण किंवा सुधारणा याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. 

महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Reading Time: 4 minutesनियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात.  फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा. लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.

जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”

Reading Time: 3 minutesजॅक वेल्श! कॉर्पोरेट जगतातील एक मोठं नाव. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट जगतात ज्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे अशा जॅक वेल्श यांचे मंगळवारी २ मार्च २०२० रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते.  वेल्श हे एक यशस्वी व्यवसाय व्यवस्थापक होते. जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीमध्ये सन १९८१ पासून सन २००१ पर्यंत वेल्श यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचून, दोन दशकांपर्यंत अधिराज्य गाजवणे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती. 

येस बँकेवर निर्बंध – खातेदारांनी काय करावे?

Reading Time: 3 minutesसप्टेंबर महिन्यात “आरबीआय” ने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याची बातमी आली आणि बँकेच्या खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काल उशिरा आलेल्या येस बँकेसंदर्भातील (yes bank) बातमीमुळे केवळ खातेदारच नाही, तर अनेक गुंतवणूकदारही भांबावून गेले आहेत. पीएमसी बँक सहकारी बँक असल्यामुळे तुलनेने छोटी बँक होती. परंतु “येस बँक” ही खाजगी  बँक असून, वैयक्तिक बचत खात्यांव्यतिरिक्त अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट अकाउंट्स बँकेमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांची “सॅलरी अकाउंट्स” देखील येस बँकेमध्ये आहेत. कालच्या निर्णयानंतर येस बँकेच्या एटीएम समोर पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीही खातेदारांनी गर्दी केली होती.

अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा – विजेता लेख क्र १

Reading Time: 4 minutesमित्रांनो आपल्या मराठी माणसांना आणि मुळातच सर्व भारतीयांमध्ये अर्थसाक्षरतेची कमी आहे. मुळात आपल्याला शाळा, कॉलेज, घरी आणि आपल्या समाजामध्ये अर्थसाक्षरतेबद्दल शिकवलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे पण तसं होत नाही. म्हणूनच आपल्याला माहिती नसतं की आपण एवढ्या मेहनतीने कमवलेले पैसे पुढे कसे वाढवत नेले पाहिजे, पैसे कुठे, किती आणि कसे गुंतवले म्हणजे आपली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो.

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutesदरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते. 

सरकारने सक्ती हटविली असली तरी पिक विमा हवाच !

Reading Time: 4 minutes२०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत भाग घेणे आता ऐच्छिक करण्यात आले असले तरी पिक विमा काढणे, आपल्या हिताचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पिक विमा योजनेतूनच शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थर्य मिळू शकते, त्यामुळे पिक विमा योजना अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सरकार करते आहे, हे स्वागतार्ह आहे. 

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

Reading Time: 2 minutesमुकेश धीरूभाई अंबानी! भारतीय उद्योग वर्तुळातलं एक मोठं नाव. अब्जाधीश उद्योगपती असणारे मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. चे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्वात मोठे भागधारक.  मुकेश अंबानी यांच्या पत्नीच्या म्हणजेच नीता अंबानी यांच्या कपडे व दागदागिन्यांची किंमत, डिझाइन्स हा सोशल मीडियावरचा एक चर्चेचा विषय आहे.  सलग १२ वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत लोकांच्या यादीतही अग्रक्रमावर आहेत.