हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …

Reading Time: 3 minutes एक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर! 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutes प्रत्येकाला आयुष्यात आता पुढे काय करायच? या प्रश्नाला सामोरे जावे लागतो. करिअर मार्गदर्शन या नावाखाली होणारे अनेक कार्यक्रम  संभ्रम अजुनच वाढतात. सध्या“पारंपरिक प्रसिद्ध” पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  या लेखमालेचा हा दुसरा व अंतिम भाग

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutes कार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर समस्या आणि त्यावरील उपाय

Reading Time: 4 minutes अनेकदा पालकांना स्वत:च्या मुलांवर पोलीस केस करण्याची सुद्धा वेळ येते. म्हातारपणी जवळ साठवलेली पुंजी पोटच्या पोरांनी हडप करून राहायला जागा सुद्धा न देणे हे पाहणे आणि सोसणे तितकेच वेदनादायक ठरते शिवाय मुलांविरुद्ध लढण्याचा स्टॅमिना आणि इच्छा दोन्हीही उरलेली नसते. अनेक असे दुर्दैवी पालक आपण हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगताना पाहतो. भारतीय राज्यघटनेची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या तत्वांतर्गत राज्याने वायोवृद्ध नागरिकांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे, त्यांचे सामाजिक अधिकार कसे सुरक्षित राखता येतील, यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले आहे. यासंदर्भात काही कायदे देखील केंद्र सरकारने पारित केलेले आहेत. आता ते कायदे पाहण्याच्या पूर्वी आपण काही मुलभूत गोष्टी पाहू.

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutes भारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? 

Economy: अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

Reading Time: 4 minutes अर्थक्रांती मांडण्यासाठी कोणत्याही व्यासपीठावर गेले की अर्थव्यवस्था (Economy) आणि नोटबंदीविषयीचे प्रश्न अजूनही हमखास येतात. अधिक मूल्यांच्या नोटांनी भारतात जो गोंधळ घातला होता, तो आपल्या देशाच्या हिताचा नव्हता, हे बहुतेक नागरिकांना समजले आहे. मात्र हा बदल एवढा मोठा आहे की देश त्यात गेले तीन वर्षे ढवळून निघाला आहे.

आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minute सध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे

Reading Time: 2 minutes कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) देशातल्या पगारदारांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ईपीएफचा लाभ २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळतो. दुर्दैवाने, मागील काही वर्षे व्याजदरात सातत्याने घट होत होती. परंतु,सध्या व्याजदर वाढून ८.६५% झाला आहे. पगारामधून ईपीएफ कपात केली जात असल्यामुळे, या लोकप्रिय गुंतवणूक योजनेचा अवलंब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. तसेच इथे कर्मचारी व नियोक्ता (Employer) दोघांचेही ५०-५०% योगदान असल्यामुळे, एकूण गुंतवणुकीच्या निम्मी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते व निम्मी रक्कम नियोक्ता भरत असतो.  

काय आहे कार्ड सुरक्षा योजना?

Reading Time: 3 minutes कार्ड सुरक्षा योजना हा एक सर्वसाधारण विम्याचा करार असून त्यामुळे आपले क्रेडिट /डेबिट कार्ड, योजना सदस्यत्वाचे कार्ड चोरीस जाणे, हरवणे, गैरव्यवहार होणे यापासून संरक्षण मिळते. यासाठी फी म्हणून दरवर्षी निश्चित रक्कम भरावी लागते. यामुळे ही योजना घेणाऱ्यास कार्ड व्यवहारापासून संरक्षण आणि तातडीची आर्थिक मदत असा दुहेरी फायदा होतो. आपल्या गरजेनुसार अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या उपलब्ध आहेत.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutes डिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.