मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutesव्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

To do list: कशी तयार कराल प्राधान्य यादी?

Reading Time: 3 minutesशाळा, महाविद्यालय, नोकरी, निवृत्ती अगदी घरात असणाऱ्या व्यक्तींनीही स्वतःच्या कामाची आखणी करायला हवी. आतापर्यंत सवय लागली नाही, काही हरकत नाही. आता तुम्ही हे करूच शकता. तुम्हाला करायचं एकच आहे, आपल्या कामाची यादी बनवायची आहे. कोणत्या कामाला किती वेळ लागू शकतो? किती वेळेच्या आत हे काम व्हायला हवं? कोणते काम अधिक महत्वाचे आहे?अशा प्रश्नाची उत्तरे शोधून आपल्या कामांचा अग्रक्रम ठरवा. आपली प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. 

One Person Company: सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी

Reading Time: 3 minutesखाजगी मर्यादित कंपनी स्थापन करण्यास किमान दोन व्यक्तींची गरज असते. यासाठी व्यवसायात आपल्या मनाप्रमाणे भागीदार मिळणे हे सुयोग्य जीवनसाथी मिळण्याएवढे कठीण आहे. एकल कंपनीचे स्वतंत्र आणि कायदेशीर अस्तित्व मान्य  केल्याने त्यानुसार उपलब्ध सोई सवलती यांचा लाभ घेता येतो. व्यवसायवृद्धीकरिता याचा फायदा होतो. कराचा बोजा कमी होतो.

आयफोन ११ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesस्मार्टफोनने आयुष्यात अनेक बदल घडवले. आजपर्यंत अनेक कंपन्या ‘मोस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या स्पर्धेत आल्या आणि गेल्या. पण या साऱ्या गदारोळात एक कंपनी आपले अव्वल स्थान टिकवून आहे. ती कुठली हे तुम्ही ओळखलंच असेल. बरोबर! ती कंपनी आहे “ॲपल आयफोन(Apple iPhone )”! भारतीय शेअर बाजारात नोंदल्या गेलेल्या सर्व कंपन्यांचे मिळून जे काही “मार्केट कॅपिटल” असेल त्याच्या जवळपास निम्मं व्हॅल्यूएशन म्हणजे तब्बल ७२ लाख कोटी रुपये म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर्स इतके एकट्या ॲपलचे आहे. सध्या चर्चा आहे ती ॲपल कंपनीने नव्याने लॉंच केलेल्या आयफोन ११ सीरिजची.

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

Reading Time: 2 minutesविना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. परंतु अनेक वेळा हे काय करायचं? असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांकडे दुर्लक्ष करतो. मॅक्डोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज यासारख्या फूड चेन किंवा मॉन्जिनीजसारख्या केक शॉपनी आज भारतातल्या छोट्या शहरातही आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. फिटनेस, न्यूट्रिशन या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठमोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात. ऋजुता दिवेकर यांनी याच क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवलं आहे. “कुठलंही काम सोपं नसतं आणि कमीपणाचंही नसतं.” जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु होईल. 

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutesएका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!

Reading Time: 6 minutesजीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे. पण मंदीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा हा बदल समजून घेण्यात आणि त्यानुसार आपल्यात बदल करण्यातच शहाणपणा आहे. कारण जगात होऊ घातलेला बदल कोणीच रोखू शकलेले नाही! 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutesअगदी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांपासून ते निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना छोटासा का होईना पण व्यवसाय करायची इच्छा असते. तसंच, काहींना पर्यायी उत्पन्न म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं वाटत असतं. पण करायचं काय? त्यासाठी  लागणारं भांडवल कुठून आणायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. म्हणूनच या लेखात आपण वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज लागणार नाही व तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही  हे व्यवसाय करू शकता व त्यात यश मिळाल्यानंतर ते वाढवून यशस्वी व्यावसायिकही बनू शकाल. 

शेअर बाजारातील दूरगामी निर्णय

Reading Time: 3 minutesनिर्देशांकाचा विचार करताना आजपर्यंत फक्त त्या बाजारात नोंदणी केलेल्या कंपनीचा विचार केला जात होता. ही प्रथा मोडीत काढून राष्ट्रीय शेअरबाजाराच्या NSE Indicies ltd  या उपकंपनीच्या इंडेक्स मेंटेनन्स सब कमिटीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत यावेळी प्रथमच बाजारात नोंदणी ऐवजी व्यवहारास परवानगी असलेल्या नेस्ले इंडिया लिमिटेड (Nestle India ltd) या कंपनीचा निर्देशांकात समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.