शेअर बाजाराची संथ वाटचाल…

Reading Time: 2 minutes बाजार हा ठराविक टप्पे पार करतच पुढे-मागे होत असतो. या शास्त्राचा शोध साधारण ११९ वर्षापुर्वी म्हणजे १९०० साली लागला. अमेरिकेतील चार्ल्स डॉव यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. आज ११९ वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बाजाराचे विश्लेषण करावे लागते. तसे केल्यास बऱ्यापैकी अचूक पद्धतीने बाजाराची किंवा शेअरची पुढील दिशा ठरविणे शक्य होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज काल गोष्टी खूपच सोप्या झाल आहेत. पूर्वी तांत्रिक विश्लेषणासाठी लागणारे आलेख (charts) हाताने काढावे लागत होते.

एटीएम मधून पैसे आलेच नाहीत, पण डेबिट झाल्याचा मेसेज आला तर काय कराल?

Reading Time: 2 minutes ‘एटीएम’मध्ये पैसे आहेत. परंतू आपण काढू शकलो नाही असा अनुभव आपल्याला कधी आलाय का? एटीएम मधून काढू या हेतूने आपण बँकेच्या एटीएम केंद्रात गेलो. पैसे काढण्याची सूचना दिली त्यावर प्रक्रिया होऊन पैसे वजा (debit) झाल्याचा संदेश आपल्याला आला, परंतू मशिनमधून पैसेच आले नाहीत.

टर्म इन्शुरन्सबद्दल सारे काही

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनात टर्म इन्शुरन्सला (शुद्ध विमा) खूप महत्त्व आहे. घरातील कमावत्या कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी हा सर्वात सोपा व प्रभावशाली उपाय आहे. सर्व कमावत्या  व्यक्तींचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. कारण कमावती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांची जीवनशैली सुरळीत राहण्यासाठी हा विमा महत्वपूर्ण ठरतो.

कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

Reading Time: 3 minutes भारतातील रस्ते हे योग्य प्रतीचे नाहीत. वाहतूक ही कधीही विस्कळित होत असते. अशावेळी पाऊस, पूर आला असता गाड्या पाण्यातून जात नाहीत. मग कित्येकदा आपली गाडी पाण्यात, रस्त्यात ठेऊन पायी जावं लागतं. मग गाडीची काळजी मनाला लागते. शेवटी ज्यांच्याकडे गाडी नाही तो रस्त्यावरून पायी चालत जातो आणि ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे तो ही रस्त्यावरून पायी चालत जातो. 

फॉर्म 15H/15G वेळीच भरण्याचे फायदे

Reading Time: 3 minutes आपणा सर्वांना वार्षिक उत्पन्नावर लागू असलेले कर माहिती आहेतच. याच वार्षिक उत्पन्नात मोडते FD वर कमावलेले व्याज आणि या व्याजावर कापला जाणारा टॅक्स वाचवण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे 15/H.या अंतर्गत तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला बँकेकडे एक ‘स्वयं घोषणा पत्र’ (Declaration) जमा करावं लागतं. त्यात असे नमूद केले जाते की, तुमचे वार्षिक उत्पन्न कर्मर्यादेच्या आत असून कर कपातीपासून सुट मिळावी. प्रत्येक बँकेचा आपला एक विशिष्ठ फॉर्म असून तो त्यांच्या शाखेत अथवा वेबसाईट वर सहज उपलब्ध होऊ शकतो.

श्रीमंतीची ‘वही’वाट

Reading Time: 3 minutes आता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

Reading Time: 3 minutes आयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.

कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes भारतामध्ये स्वतःची कार असणे हा प्रेस्टीज इशू असतो. घरात चार चाकीचा ऐरावत उभा असणे म्हणजे मोठेपणा मानला जातो.  भारतीय लोक स्वतःच्या गाडीबद्दल, चारचाकी बद्दल, कारबद्दल, खूप भावनिक असतात. शेजाऱ्याने कार घेतली किंवा नातेवाईकांमध्ये कुणी कार घेतली की आपणसुद्धा कार घ्यायलाच हवी असं वाटतं. पण कार म्हणजे नक्की काय भानगड आहे? खरंच ती घ्यायला हवी का? आपण ती खरंच घेण्याच्या परिस्थितीत आहोत का? कार घेण्याचे फायदे व तोटे याचा विचार खोलात जाऊन प्रत्येक जण करत नाही.

मी अर्थसाक्षर!!

Reading Time: < 1 minute तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांना अर्थसाक्षर करायचे असल्यास पुस्तक हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, अशी आमची खात्री पटली आणि आम्ही पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकच्या आखणीसाठी आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे. यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.