Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes शेअर मार्केट म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा” असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच. 

Saving & Investment Rules: बचत आणि गुंतवणुकीचे ५ मूलभूत नियम

Reading Time: 3 minutes “मी किती बचत करावी?” “मी किती गुंतवणूक करावी?” “मी इक्विटीमध्ये किती रक्कम ठेवावी?” या साऱ्या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असतात, असं मला वाटत. तरीही काही मुलभूत नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. यांना आपण थंब रुल्स (Thumb Rules ) म्हणू.

Trader’s Psychology: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात अनेक पद्धतीचे व्यवहार होत असतात. सध्या 20 हून अधिक पद्धतीचे व्यवहार बाजारात केले जातात.  यातील कोणताही व्यवहार मग तो खरेदीचा असो वा विक्रीचा त्यास ट्रेड असे संबोधले जाते आणि असा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे साहजिकच ट्रेडर.

Lump sum Investment vs SIP: एकरकमी गुंतवणूक की एसआयपी, उत्तम पर्याय कोणता?

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात एकरकमी गुंतवणूक की एसआयपी याबद्दल साशंकता असते. भारतीय युवा वर्ग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) पसंती देत आहे, तर नोकरीत बऱ्यापैकी  स्थिरस्थावर झालेले म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करत आहेत.

Capital Market Optimism: दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद !

Reading Time: 3 minutes कोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. 

Share Market: शेअर बाजार: वाव आहे, पण दिशा … ?

Reading Time: 4 minutes सेबीच्या आकडेवारीनुसार 2020 वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात 63 लाख नवे डिमॅट (अन् अर्थात ट्रेडिंगही) खाती उघडली गेली. पुढे जानेवारी 2021 पर्यंत ही संख्या 1 कोटींच्याही पलीकडे गेली.      

Investment Mistakes: गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

Reading Time: 2 minutes अर्थार्जन सुरु झाल्यावर प्रत्येकजण गुंतवणुकीचा विचार करत असतो. भविष्याची तरतूद म्हणून योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.  गुंतवणुकीचे लोकप्रिय आधुनिक पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी. या गुंतणुकींमध्ये सकारात्मक गोष्टींसोबत काही खाचखळगेसुद्धा तेवढेच पाहायला मिळतात. २०१८ साली मालमत्ता खरेदी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बऱ्याच नकारात्मक गोष्टी दिसून आल्या.यामुळे गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र फारसा फायद्याचं राहिले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी व काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात.

Investment Strategy: आपली गुंतवणूक योजना कशी तयार कराल? 

Reading Time: 3 minutes आपली गुंतवणूक योजना बनवता येणे अगदी सोपे आहे. आपल्या ज्ञानाचा वापर यश मिळण्यासाठी करता आला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. चुकांतून शिकून पुन्हा पुन्हा त्याच चुका न करणे आवश्यक आहे. यासाठी सदैव सावध वृत्ती असावी परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मुद्दलही कमी होता कामा नये. याच हेतूने आपली गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा विचार करूयात.

‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’ – भाग २ 

Reading Time: 3 minutes PPF चे व्याजदर ठरविताना 10 वर्षाचे सरकारी कर्जरोख्यांचा दर ( G-Sec ) आधारभूत मानून त्यापेक्षा 0.25% अधिक दराने व्याज द्यावे, असा निकष गेले अनेक वर्षे अस्तित्वात आहे. आणि काल जाहिर केलेला 6.4% दर हा या निकषांवर योग्यच होता.

Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक

Reading Time: 4 minutes आपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत.