खरंच का मी अर्थसाक्षर?

Reading Time: 3 minutes गुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutes इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी. 

संकल्पाचा ‘अर्थ’ आणि गुंतवणुकीचा १५×१५×१५ चा नियम

Reading Time: 3 minutes अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण पाहता बऱ्याच गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची चिंता भेडसावू लागली आहे. स्थिर सरकार आले म्हणून बाजार वर जाणार, या अपेक्षेने भरघोस परतावा मिळेल या आशेवर असलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. खरतरं शेअर बाजार म्हणजे चढ-उतार हे समीकरण निश्चित ठरलेल आहे. मग एकतर तुम्ही परताव्याचा दर किंवा गुंतवणूक कालावधी ठरवून संकल्प सोडला पाहिजे. परंतु गुंतवणूक म्हणजे रग्गड नफा हेच एक समीकरण आपल्या मनात ठरलेले असते. मग तो नाही मिळत असे दिसू लागले की तोटा सहन करणे किंवा केलेली गुंतवणूक कवटाळून धरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.

सेकंड होम की म्युच्युअल फंडचा ई-फ्लॅट?

Reading Time: 3 minutes ढोबळमानाने तुम्हाला तुमच्या रियल इस्टेट फ्लॅटमधून वार्षिक उत्पन्न जर ३% पेक्षा कमी येत असेल तर, ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर नाही. तसेच, समजा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या गुंतवणूकीमधील रक्कम ठराविक अथवा आंशिक हवी असेल तर ते मात्र शक्य नसते. म्युच्युअल फंडाच्या ‘ई- फ्लॅट’मधील रक्कम तुम्ही अंशतः देखील काढू शकता, हा फरक आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची…

Reading Time: 4 minutes बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच ‘गुंतवणूक कशी करावी’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही. सिंहगडाचा ट्रेक करणे आणि एव्हरेस्टचा ट्रेक करणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक त्या दोन्हीत आहे. हा फरक अत्यंत सोप्या पद्धतीने विषद करणारा एक लेख मध्यंतरी वाचनात आला, तो ‘अर्थसाक्षर’च्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

PMS – काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट योजना (Portfolio Management)

Reading Time: 4 minutes दलालांमधील स्पर्धा, त्यामुळे कमी कमी होत गेलेली दलाली, डिस्काउंट ब्रोकर्सचे आगमन आणि त्यांनी आकर्षित करून घेतलेले गुंतवणूकदार यामुळे नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या दलालांचे उत्पन्न घटले असून बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या त्यांना योजाव्या लागत आहेत. मग याला पूरक व्यवसाय म्हणून म्युच्युअल फंड एजन्सी, विमा एजंट, यूलीप योजना विक्री, पेन्शन योजना विक्री असा पूरक व्यवसाय त्यांनी चालू केला आहे. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित आहे. याहून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी प्रोट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम यांचा आधार घेतला जात आहे. यातून मिळू शकणारा फायदा हा अधिक असल्याने अनेकांना त्याचा आधार आहे. 

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutes जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

शेअर्स खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या समभागांचे विभाजन आणि एकत्रीकरण

Reading Time: 3 minutes शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो. ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १० कोटी रुपये असेल आणि ते रु. १०/- च्या एका भागात असेल, तर त्याच्या समभागांची संख्या १ कोटी होईल.

श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

Reading Time: 3 minutes आपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का? अजिबात नाही! यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयाच्या २५ व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीलासुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं? उत्तर आहे – तब्बल १२८ पट! यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).

गुंतवणूक – कला का शास्त्र?

Reading Time: 3 minutes खरंतर गेल्या १५ वर्षात आपल्याला माहितीचा प्रचंड स्त्रोत गवसला आहे. अगणित संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, कॅल्क्युलेटर्स, व्हिडीओज, दृक-श्राव्य जाहिराती, उरलेसुरले वर्तमानपत्रात येणारे लेख आणि या सगळ्यांमुळे आपल्या आजूबाजूस तयार झालेले मुक्त मोफत अर्थतज्ञ असा एवढा लवाजमा असतांना देखील समभाग निगडीत योजनांमधे गुंतवणूकदारांची संख्या वाढत नाहीये.