बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Reading Time: 2 minutesकर हा शासनाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरणे हे प्रत्येक करदात्याच्या कर्तव्य आहे. अर्थात कायदेशीर मार्गाने करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे हा गुन्हा नाही तर अधिकार आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने काहीतरी जुगाड करून करदायित्व टाळणाऱ्या तमाम ‘करबुडव्यांना’ चाप बसण्यासाठीच्याउपाययोजना करून, त्यांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने  या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या

Reading Time: 3 minutesआपल्या मालकाकडून आपणास फॉर्म नंबर १६ मिळाला असेल. यात आपणास मालकाकडून मिळालेले उत्पन्न यातून आपण जाहीर केलेल्या आणि कायद्यानुसार मिळत असलेल्या विविध वजावटींचा विचार करून आपले करपात्र उत्पन्न व कापलेला कर याची तपशीलवार माहिती असते. आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (gross income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती

Reading Time: 2 minutesआत्तापर्यंत आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यासाठी ITR-V हा फॉर्म म्हणजे ITR फाईल केल्यावर आयकर विभागाच्या साईटवर तयार होणारी पोचपावती (acknowledgement) डाऊनलोड करावी लागत असे. नंतर सदर पावती सही करून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणजे सी.पी.सी. बेंगलोरला पाठवावा लागत असे. नाही म्हटलं, तरी ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ होती. आता मात्र ही प्रकिया इलेक्ट्रॉनिकली त्वरित पूर्ण करण्याच्या ५ सोप्या आणि सहज पद्धती उपलब्ध आहेत. याबद्दल अनेकजणांना माहिती नसते.

आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?

Reading Time: 3 minutesआयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते. जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutesजून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutesजूनमध्ये एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर (ITR) फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते. आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल. 

जीसटी, बांधकाम व्यवसाय आणि घरांच्या किंमती

Reading Time: 6 minutesघरासारखं महाग उत्पादन खरेदी करताना व आपण जेव्हा परवडणाऱ्या घरांविषयी बोलतो तेव्हा प्रत्येक रुपया महत्वाचा असतो. अशावेळी जीएसटीचे लाखो रुपये वाचत असतील तर ग्राहक तयार घरच (बांधकाम पूर्ण झालेले) खरेदी करेल. असं करून आपण रिअल इस्टेट उद्योगाचा कणाच मोडत आहोत, कारण विकासकांना पैसा कुठून मिळेल? बँका जमीनी खरेदी करण्यासाठी कर्ज देणार नाहीत व ग्राहक जीएसटी वाचवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांकडे पाहणार नाहीत.

परदेशातील उत्पन्नावरील दुहेरी कर आकारणी कशी टाळाल?

Reading Time: 2 minutesएखाद्या देशातील रहिवासी व्यक्ती जर दुसऱ्या देशातून उत्पन्न मिळवत असेल तर त्या व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नावर दोन्ही देशातून कर आकारणी होऊ शकते. साहजिकच या दुहेरी कर आकारणीमुळे करदात्यावर अन्याय होऊन त्याचं नुकसान होतं. यालाच परकीय कर क्रेडिट (Foreign Tax Credit) असे म्हणतात. परकीय कर क्रेडिट हे जागतिक उत्पनाशी निगडित आहे.दोन्ही देशांच्या करप्रणालीनुसार दुहेरी कर भरायला लागून करदात्याचे नुकसान होऊ नये या कारणास्तव आयकर कायदा १९६१, कलम  ९० व कलम ९१ मध्ये परकीय कर क्रेडिटसाठी संदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

TDS: टीडीएस प्रणाली आणि बँक ठेवींवरील व्याजाचं गणित

Reading Time: 3 minutesबँक किंवा कोणतीही संस्था/ कंपनी/ कारखाना/ कार्यालय/ रुग्णालय/दुकान अशा उत्पन्न देणाऱ्या घटकाला TDS प्रणालीनुसार ठरलेल्या प्रकारे कर कापून घेणे आणि तो आयकर खात्यात जमा करणे पूर्णपणे बंधनकारक आहे. उत्पन्न किती दिले, त्या व्यक्ती/ संस्थेचा पॅन कार्ड वगैरे सर्व तपशील, कर किती कापून घेतला? अशा सर्व तपाशीलांची नोंद नियमितपणे ठेवावी लागते. ते सर्व तपशील देऊन तो नियमाप्रमाणे असलेला कर आयकर खात्याकडे जमा करायचा असतो. ते न केल्यास दंड आकाराला जातो.