कसे हटवले आर्टिकल ३७०?

Reading Time: 2 minutes३७० संपवता येणार नाही, हा प्रश्न फार किचकट आहे, यावर कायदेशीर उपाय नाही असं म्हणणाऱ्यांचा एक मुद्दा हा होता की ३७० रिपील करायचं किंवा त्यात बदल करायचे, तर काश्मिरच्या घटना समितीकडून तसं रेकमेंडेशन राष्ट्रपतींना मिळणं अत्यावश्यक आहे. पण काश्मिरची घटना समिती १९५६ साली बरखास्त झाल्याने त्या समितीकडून रेकमेंडेशन येऊ शकत नाही. त्यामुळे आता ३७० रिपील करता येणार नाही. 

रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutesरक्षाबंधन म्हणजे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. बहिणीला काय भेट देऊ? हा अनेक भावांसमोरचा यक्षप्रश्न “आर्थिक रक्षाबंधन”ने चुटकीसरशी सोडवला आहे. 

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutesपिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

Reading Time: 2 minutesघर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.

भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)

Reading Time: 3 minutesविशिष्ट मर्यादेबाहेर अनुत्पादक मालमत्ता वाढल्यास बँक आणि पर्यायाने बँकेचे ठेवीदार अडचणीत येतात. सर्व बँकांची शिखर बँक म्हणून  त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय रिझर्व बँकेने एखादी मालमत्ता अनुत्पादित कधी होते आणि त्यासाठी कोणत्या तरतुदी कराव्यात यासबंधीत निश्चित असे धोरण ठरवले असून त्याप्रमाणे बँकांना कार्यवाही करावी लागते.

वाहतूक नियम मोडणे आता महागात पडणार

Reading Time: 2 minutesदेशातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०१७ मध्ये रस्त्यावर एकूण ४,६४,९१० अपघात झाले होते त्यामध्ये एकूण १,४७,९१३ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमधील जवळपास ४५% अपघात हे हायवे सोडून इतरत्र झालेले आहेत. अपघातांना रोखण्यासाठी गेली काही वर्षे अनेक प्रकारची उपाययोजना चालू आहे. पण त्याला मिळणारं यश अत्यल्प आहे. सध्या अपघातांचे प्रमाण ३% नी कमी झालं आहे. अर्थात हे पुरेसं नाही. म्हणूनच शक्य तितके प्रयत्न सरकारकडून होत आहेत. या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे, रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी लोकसभेत सादर केलेले “मोटर वाहन दुरुस्ती विधेयक”

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

Reading Time: 2 minutes‘कर्ज’ हा एक शब्द अनेक भावनांना साद घालतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या शब्दाभोवती असणाऱ्या भावना बदलत जातात. लहानपणापासून घरात कर्जावरून ताणतणाव बघितलेल्यांना ‘कर्ज’ शब्द ऐकल्यावर एकप्रकारची शिसारी येते. “कर्ज घेणे चांगले की वाईट?” या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे तर आहेच त्याचबरोबर ते व्यक्तिसापेक्षही आहे. 

‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

Reading Time: 3 minutesदीर्घकालीन गुंतवणुकींसाठी आपण जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण नजीकच्या भविष्याचा आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेचा केला पाहिजे. ज्यासाठी नियोजन शक्य आहे अशा नवीन घर, गाडी, परदेशभ्रमण इत्यादी गोष्टींसाठी २-३ वर्षं किंवा त्याही आधीपासून तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर अनपेक्षित, आकस्मित खर्च काय उद्भवू शकतात त्यांच्या विचार करून त्यासाठी तजवीज करून ठेवणे गरजेचं आहे. अपघात, आजारपणं, सक्तीची सेवानिवृत्ती अशी संकटं कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या समोर दत्त म्हणून उभी ठाकू शकतात. त्यातल्या काहींसाठी आपण विमासंरक्षण घेतलेले असले तरीही एक वेगळा समर्पित निधी त्यासाठी तयार केलेला असला पाहिजे.