Advice Help Support And Tips Signpost Shows Information And Guidance
Reading Time: 4 minutes

मागील  गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी? हा लेख वाचून आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. काही वाचकांनी फोन करून त्यांचे अनुभव सांगितले. ज्याला उत्पन्न मिळते ती प्रत्येक व्यक्ती भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बचत अथवा गुंतवणूक नक्कीच करत असते.

अशी बचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

 • राजगुरुनगर येथील श्री.भोसले यांनी फोन केला होता. त्यांनी पैशांवर नियंत्रण अशी बिरुदावली मिरविणाऱ्या वेबसाईटवर रिलायन्स पावर या शेअरचा वार्षिक उच्चांक-निचांक पाहून १०,००० रुपयांचे शेअर्स १२ रुपये भावाने खरेदी केले आहेत. शेअरचा भाव २ रुपयांनी खाली आला आहे. मी काय केले पाहिजे? असा त्यांचा प्रश्न होता. आज आपण भारतात आर्थिक सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याचा प्रवास आज कुठवर पोहचला आहे? या विषयाची माहिती घेऊ.
 • पूर्वी बँकेतील अधिकारी हा विश्वासू सल्लागार असायचा. कारण मुदत ठेवी आणि जीवन विमा योजना या पलीकडे फारसे गुंतवणूक पर्याय उपलब्ध नव्हते. सध्या हेच अधिकारी गुंतवणूक योजना विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतात. नंतर दलाली पेढ्यांपासून वैयक्तिक सल्लागार ते आता स्वयंचलित(रोबो) सल्लागारापर्यंत आपण येऊन पोहचलो आहोत. पण आर्थिक गुंतवणूकीतून किती जणांनी मत्ता तयार केली? हा संशोधनाचा विषय आहे.
 • आपल्या शिक्षण पद्धतीत आर्थिक साक्षरता या विषयाचा मागमूस नसल्यामुळे विमा विक्रेते निवृत्त झालेल्या व्यक्तीस आजदेखील गुंतवणूक म्हणून विमा योजना विकू शकतात. परंतु, नियोजनाचा सल्ला देणारा आर्थिक सल्लागार अजूनही विश्वासार्ह वाटत नाही.

आर्थिक सल्ल्याची नक्की गरज कुणाला आहे?

 • आर्थिक सल्ल्याची मुलभूत गरज पुढील व्यक्तींना लागू शकते.
  1. जी व्यक्ती उत्पन्नापेक्षा खर्च कमी करते.
  2. एखादी व्यक्ती जी कर्जाच्या विळख्यातून बाहेर येऊ इच्छिते.
 • त्यापुढील सल्ल्याची गरज ज्यांनी पैसे साठवले आहेत आणि त्यांच्यावर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. जसे की मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची त्यांच्या उतार वयात काळजी घेणे आणि स्वतःचे निवृत्त जीवन व्यतीत करणे. या सगळ्यासाठी नियोजन करणे. कारण वाढते उत्पन्न आणि वाढती महागाई या दोहोंचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो.
 • मी २००० मधे प्रथम नोकरीस सुरुवात केली तेव्हा पुण्यासारख्या शहरात महिना ३,५०० रुपयात एकट्याच व्यवस्थित भागत होतं. सध्या पहिला पगारच ५ आकडी सुरु होतो. परंतु श्रीमंतीकडे वाटचाल करणाऱ्या ‘इंडियामध्ये’ उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसवणं महागाईमुळे  शक्य होत नाही.
 • ८० च्या दशकात ज्यांनी नोकरी – व्यवसायास सुरुवात केली त्यांनी त्यांच्या उत्पन्नात ५० ते १०० पट वाढ अनुभवली पण आताच्या पिढीस महागाई व राहणीमानाची बदलती पद्धत यामुळे ते शक्य होणार नाही. म्हणूनच आर्थिक नियोजन महत्वाची भूमिका बजावू शकेल.
 • तुमच्याकडे सर्व गरजा पूर्ण झाल्यावर देखील जर अतिरिक्त रक्कम शिल्लक राहत असेल, तर तुम्ही साठीऐवजी पन्नाशीतच निवृत्त होऊ शकता. मुलांसाठीची गुंतवणूक त्यांच्या वयाच्या १८ पर्यंत करण्याची गरज पडणार नाही. हे वाचून तुम्हाला स्वप्नवत वाटत असेल पण तुम्हाला अचानक अशी मोठी रक्कम स्टार्ट अपमधून बाहेर पडतांना किंवा वारसा हक्काने मिळू शकते. अशा वेळी तुम्हाला तुमची जोखीम क्षमता माहित नसेल तर आर्थिक सल्लागार तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करू शकतो. तो तुम्हाला विविध गुंतवणूक मार्गांची ओळख करून देईल जे तुम्हाला FIRE (Financial Independent Retirement Early) बनवितील.

सल्लागाराची भूमिका काय असली पाहिजे?

 • तुम्ही कुठलं वित्तीय प्रॉडक्ट विकत घेतलं पाहिजे? याच्यापासून सल्लागार कधीच सुरुवात करत नाही. अशी सुरुवात करणारा नक्कीच एजंट असतो. सध्या स्पर्धेमुळे असंख्य ग्राहकाभिमुख प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कर वाचविण्यासाठी योजना, मुदत बंद योजना, जास्त किंवा कमी जोखीम असणारे म्युच्युअल फंड वगैरे….
 • सल्लागाराने अगोदर तुमच्या मुलभूत गरजा, आपत्कालीन गरजा, न टाळता येणाऱ्या वित्तीय जबाबदाऱ्या, संपूर्ण सुरक्षा(विमा) कवच याची यादी बनविली पाहिजे. कदाचित तुम्ही जे सांगत असाल, ती तुमची गरज नसेल तर सल्लागाराने तशी स्पष्ट जाणीव करून दिली पाहिजे.
 • माझी जोखीम घेण्याची क्षमता जास्त आहे, असे गुंतवणूक सुरु करतांना प्रत्येक जण सांगत असतो. पण अशा आरंभशूरांना जास्तीच्या परताव्याचा लोभ असतो. कारण हे थोडा जरी तोटा दिसू लागल्यास गुंतवणूकीतून सर्वात अगोदर बाहेर पडतात. सल्लागाराने ग्राहकाच्या गरजा, वित्तीय ध्येय व गुंतवणूक शिस्त यावर लक्ष ठेवून वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे.
 • अति श्रीमंत ग्राहकांना कदाचित एकापेक्षा जास्त सल्लागारांची गरज भासू शकते. कारण त्यांच्या मालमत्ता विभाजनात शेअर्स, रोखे, स्थावर मालमत्ता, सौदे बाजारातील व्यवहार,कलावस्तूंमधील गुंतवणूक,खासगी व्यवसायांमधील गुंतवणूक,नियमित उत्पन्न देणारी गुंतवणूक असे विविध प्रकार असू शकतात.

आर्थिक सल्ला मिळविताना सध्या काय उणीवा आहेत?

 1. कधीतरी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस मिळणाऱ्या परताव्यापेक्षा किचकट कायदे समजून घेण्यात जास्त उत्सुकता असणे.
 2. त्याच्या आर्थिक फायदयाच परंतु समजण्यास अवघड असलेलं एखाद प्रॉडक्ट सल्लागाराने सुचविल्यास त्याची फी देण्याची तयारी नसणे.

ग्राहकांचा गुंतवणूक प्रवास दिर्घकाळ का टिकत नाही?

अगदीच परिस्थिती हातघाईवर आल्यास गुंतवणूक प्रवासात खंड पडू शकतो. परंतु अनेकदा पुढील कारणांपैकी काही नक्कीच लागू पडू शकतील.

 1. वारंवार होणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्यामुळे ग्राहकांकडून गरज नसलेल्या प्रॉडक्टमधे गुंतवणूक केली जाते. मग त्याच्या डाव्या – उजव्या बाजू उशिराने लक्षात आल्यावर गुंतवणुकीतील विश्वास कमी होतो.
 2. समांतर(फुकट) सल्ला घेणे.
 3. काही एजंट गुंतवणूकीवर मिळणाऱ्या परताव्याचे आकडे फुगवून सांगतात. परंतु गरजेच्या वेळी पैसे कसे उपलब्ध होतील? याबाबत काहीच बोलत नाहीत.
 4. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च या महिन्यात केलेली गुंतवणूक कर बचतीसाठी असते वृद्धीसाठी नव्हे.

यावर काय उपचार केले पाहिजेत?

 1. सर्व प्रथम अर्थव्यवस्थेत तुमची जागा शोधणे जसे की सामान्य – मध्यम – श्रीमंत – अतिश्रीमंत.
 2. तुम्हाला आर्थिक स्वांतत्र्य हवंय की दुसऱ्याचं  आर्थिक अनुकरण करायचं आहे? हे ठरवा.
 3. वर्षातून एकदा चांगल्या आर्थिक सल्लागाराकडून आर्थिक आरोग्य तपासणी करून घेणे.
 4. शेवटचा पण महत्वाचा मुद्दा – जोखीमांक चाचणी (Risk Profiling) केल्याशिवाय गुंतवणूकीस सुरुवात करूच नये.

हा लेख संपवत असतांना Whatsappवर टुंग वाजलं….. आठवडयातून २ तास काम करा व श्रीमंत व्हा!

– अतुल प्रकाश कोतकर

 9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी atulkotkar@yahoo.com वर संपर्क साधून आपले प्रश्न विचारू शकतात.)

आयुर्विम्याबाबतचे १२ गैरसमज,

काय आहे मुदतठेवींचे गणित?,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?,

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुले आणि अर्थसाक्षरता

Reading Time: 3 minutes माझ्या माहितीत असलेल्या एका व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा मुलगा एका नामवंत…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.