होम लोन टॉप-अप विरुद्ध वैयक्तिक कर्ज
अनेकदा आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आपल्यावर वैयक्तिक कर्ज घ्यायची वेळ येते. अशावेळी होम लोन टॉप-अप अर्थात वाढीव कर्जाचा जरूर विचार करावा.
आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते.
तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू.
टॉप अप कर्ज (वाढीव) आणि वैयक्तिक कर्ज
आता अशा परिस्थितीची कल्पना करा की, तुम्ही आधीच एक गृहकर्ज घेतलेले आहे आणि काही कारणांनी तुम्हाला अजून थोड्या पैशांची गरज आहे आणि कर्ज काढणे हा पर्याय तुम्हाला योग्य वाटतो. आता अशा वेळी तुमच्याकडे २ पर्याय उपलब्ध आहेत-
१. तुम्ही नेहमी प्रमाणे वैयक्तिक कर्ज काढू शकता.
२. तुम्ही तुमच्या गृहकर्जावर टॉप अप कर्ज काढू शकता.
हे नक्की वाचा: वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा हे ११ नियम
होम लोन टॉप-अप विरुद्ध वैयक्तिक कर्ज
वैयक्तिक कर्ज – फायदे
- बँकांनी कर्ज देण्यासाठी नेहमीप्रमाणे काही अटी आणि प्रक्रिया ठरवलेली असते, त्या पात्रता आणि निकषांची पूर्तता तुम्ही करू शकत असाल, तर कर्ज मिळण्यास कुठलाच विलंब होत नाही.
- हे कर्ज घेताना कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही.कर्ज प्रक्रिया अगदीच सोपी नाही किंवा अगदी कठीणही नाही.
- तुम्हाला जास्तीत जास्त ६० महिने म्हणजे साधारण ५ वर्ष कालावधीचे कर्ज मिळू शकते.
- हे कर्ज तुम्ही कशासाठी काढत आहात हे बँकेला सांगण्याची गरज नाही.
वैयक्तिक कर्ज – तोटे
- या कर्जांचा व्याजदर उच्च असतो.
- हे कर्ज मान्य होण्यासाठी पात्रता नियम फारसे कडक नसतात.
- तुमचा क्रेडिट स्कोअर ७०० पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- हे कर्ज अल्प कालावधीसाठी दिले जाते.
विशेष लेख: टॉप-अप कर्ज का घ्यावे?
टॉप अप होम लोन – फायदे:
- उत्पन्नाचे काही निकष पूर्ण केले तर बँका टॉप-अप होम लोन सहज मंजूर करतात.
- हे कर्ज वैयक्तिक कर्जाच्या कमाल मुदतीपेक्षाही जास्त कालावधीसाठी दिले जाऊ शकते. म्हणजे तुमच्या दीर्घ कालावधीच्या आणि उच्च रकमेच्या कर्जासाठी हा उत्तम पर्याय आहे.
- आपल्या मूळ गृहकर्जाइतके किंवा त्याहून जास्त रकमेची कर्जही घेऊ शकता.
- हे कर्ज तुम्ही कशासाठी घेत आहात हे सांगण्याची गरज नाही.
- वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर कमी आहे.
- तुम्ही बँकेचे आधीच एका कर्जासाठीचे कर्जदार असल्यामुळे बँक पुन्हा तुमचा संपूर्ण क्रेडीट इतिहास मागत नाही.
टॉप-अप होम लोन -तोटे:
- बँक किती कर्जाची रक्कम मान्य करते हे तुम्ही बँकेकडे ठेवलेल्या तारणाच्या मूल्यावर अवलंबून असते.
- या प्रक्रियेत मूल्यमापन, तारण आणि संबंधित प्रक्रिया, इत्यादीसारख्या प्रक्रियांमुळे थोडा वेळ लागू शकतो.
महत्वाचा लेख: कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे
उत्तम पर्याय कसा निवडावा?
तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे, हे तुम्हाला पुढील मुद्द्यांचा विचार करून ठरवावं लागेल. काही विशिष्ट प्रसंगी टॉप-अप कर्ज फायदेशीर ठरू शकतात.
१. अल्पकालीन गरजा:
- जेव्हा तुम्हाला कमी कालावधीसाठी कर्ज हवे असते, तेव्हा वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय असतो.
- पण जर लग्नासाठी, शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी इ. कर्जाची आवश्यकता असेल, तर होम लोन टॉप अप हा एक चांगला पर्याय आहे.
२. व्याजदरः
- व्याजदराचा विचार कराल, तर टॉप-अप होम लोन फायदेशीर आहे. कारण याचा व्याजदर तुलनेने कमी असतो.
- वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जास्त असतो.
३. ईएमआय:
- जर तुम्ही टॉप-अप कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हला परत फेडीसाठी जास्त कालावधी मिळतो.
- त्यामुळे ईएमआयचा विचार केला, तर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत टॉप-अप कर्ज फायदेशीर आहे.
४. पात्रता:
- तुम्ही बँकेचे गृहकर्ज ग्राहक असल्याने तुमचे कर्ज तत्काळ मान्य केले जाते. टॉप अप होम लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर किती असावा याची काही बंधन नाही. बँकेला आपला क्रेडिट इतिहास तपासावा लागत नसल्यामुळे ही प्रक्रिया जलद होते.
- वैयक्तिक कर्जदाराला मात्र ७०० च्या वर क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मंजूर केले जाते.
५. कागदपत्रे:
- वैयक्तिक कर्जासाठी फारशी कागदपत्रे लागत नाहीत.
- टॉप-अप कर्ज घेताना मात्र तुलनेने बऱ्याच कागदपत्रांची जमवाजमव करताना तुमची थोडी कसरत होऊ शकते.
६. हमीदार:
- वैयक्तिक कर्जासाठी हमीदाराची आवश्यकता असते.
- टॉप- अप कर्ज घेताना अशी काही आवश्यकता नाही.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Home loan Top up Marathi, home Loan Top up Marathi Mahiti, Home loan top-up in Marathi, Home Loan top up vs Personal Loan in Marathi, Home Loan top up vs Personal Loan Marathi mahiti, what is better Home Loan top up or Personal Loan