म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५
नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “लिक्विड फंडाचे फायदे”.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४
- लिक्विड फंड हे म्युच्युअल फंडच्या मनी मार्केट फंड कॅटेगरीमध्ये येतात. हे असे फंड असतात जिथे डेट फंड मॅनेजर अतिशय तरल किंवा अतिशय कमी मुदतीच्या कर्जरोखे किंवा त्या प्रकारच्या पेपर्स मध्ये गुंतवणूक करतात.
- यात बँकेचे कमर्शिअल डिपॉजिटस, कंपन्यांचे कमर्शिअल पेपर्स, सीबीएलओ (CBLO), ट्रेजरी बिल्स (Treasury Bills) या सारख्या मनी मार्केट पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात.
- सेबीच्या नियमानुसार ह्या सर्व गुंतवणुकीची मुदत ९० दिवसाच्या आतील असावी लागते.
- डेट फंडामध्ये जेवढ्या कमी मुदतीचे पेपर्स असतील तेवढ्या त्याची अस्थिरता कमी असते म्हणूनच लिक्विड फंड बऱ्यापैकी स्थिर असतात.
- लिक्विड फंडामध्ये अगदी एका दिवसासाठी ही गुंतवणूक करता येते. सामान्यतः ज्या मोठ्या कंपन्या असतात ज्यांची रक्कम खूप मोठी असते ते या फंडाचा जास्त लाभ घेतात. परंतु सामान्य गुंतवणूकदारांनी सुद्धा या फंडाचा लाभ घेतला पाहिजे.
- बँकेच्या बचत खात्यापेक्षा या फंडात साधारण जास्त परतावा मिळतो. गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढू शकतात. मोठी रक्कम काढताना आज दुपारी ३ वाजे पर्यंत पैसे काढण्याचा विनंती अर्ज दिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्या बँकेत पैसे जमा होतात. आता तर म्युच्युअल फंड रु.५०,००० पर्यंतची रक्कम तात्काळ काढण्याची मुभा देतात त्याला इन्स्टा रिडम्प्शन (Insta Redemption) सुविधा म्हणतात.
- ही सुविधा ऑनलाईन असते. आपण सुट्टीच्या दिवशी किंवा अगदी मध्यरात्री ही ह्या सेवेमार्फत रु.५०,००० पर्यंत रक्कम काढू शकतो, २ मिनिटाच्या आत ती आपल्या बँक खात्यात जमा होते.
अशा प्रकारे लिक्विड फंडाच्या साहाय्याने आपण आपले बचत खाते जास्त लाभदायक बनवू शकतो.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/