Reading Time: 2 minutes
नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “आर्थिक बाजार नियंत्रक ‘सेबी’ (SEBI)”
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २
-
सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे.
-
३० जानेवारी १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील.
-
१९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली.
-
त्यानंतर ही रोखे बाजारातील येणाऱ्या अनुभवातून सेबी नियमितपणे आपल्या नियमावलीत योग्य ते बदल किंवा नवे नियम आणत असते.
-
सेबीच्या वेबसाईटवर जर आपण म्युच्युअल फंडाचे एकत्रित परिपत्रक (Master Circular) पहिले, तर आपल्याला कळेल की सेबी किती बारकाईने म्युच्युअल फंडाच्या कामकाजावर लक्ष ठेवून, गुंतवणूकदारांचे हित कसे जपले जाईल त्याची काळजी घेत असते.
-
इतकेच नव्हे, तर प्रत्येक म्युच्युअल फंडाची दर दोन वर्षांनी तपासणी करून निधी व्यवस्थापक कंपनीचा व्यवहार सेबी नियमानुसार चालतो की नाही त्याची शहानिशा करतात.
-
फंड मॅनेजर्सनी बाजारातील गुंतवणूक करताना काय करावे व काय करू नये जेणेकरून गुंतवणूकदारांसाठी जोखीम उत्पन्न होणार नाही, याची लांबलचक नियमावली सेबीने बनवली आहे व त्यात ते नियमितपणे बदल करत असतात.
-
तसेच, निधी व्यवस्थापक कंपनीच्या विक्री विभागाकडून गुंतवणूकदारांची दिशाभूल होणार नाही यासाठी ही सेबीने नियमावली बनवली आहे.
-
गुंतवणूकदारांची अडकलेली कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास सेबी निधी व्यवस्थापक कंपनीला पेनल्टी सुध्दा लावू शकते.
-
निधी व्यवस्थापक कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन योजनांना सेबी पूर्ण अभ्यास करून परवानगी देते. प्रत्येकवेळी गुंतवणूकदारांचे हित जपले आहे की नाही यावरच सेबीचा जोर असतो.
-
बाजारात आज म्युच्युअल फंडाच्या असंख्य योजना असल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचा गोंधळ उडतो.परंतु, आता सेबीच्या नियमावलीनुसार म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना गुंतवणूकदारांना सोप्या रीतीने समजण्यासाठी सर्व म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकच योजना असेल, जेणेकरून गुंतवणूकदारांना योग्य योजनेची निवड करणं सोपे जाईल.
अशाप्रकारे म्युच्युअल फंड हे सेबीमार्फत पूर्णपणे नियंत्रित आहेत की गुंतवणूकदारांना निश्चिन्तपणे म्युच्युअल फंडचा लाभ घेता येईल.
चला तर, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून फसवणुकीच्या योजनापासून दूर राहूया.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
निलेश तावडे,
9324543832
[email protected]
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :