Reading Time: 2 minutes

नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, म्युच्युअल फंड क्षेत्राची वाटचाल”

भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्येयूटीआय’च्या (UTI) स्थापनेपासून झाली. त्यात भारत सरकार आरबीआयने (RBI) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण भागात विभागली जाते

  • १९६३ ते १९८७ ह्या काळात फक्त यूटीआय ही म्युच्युअल फंड बाजारात होती. युनिट ६४ ही योजना चांगलीच नावाजलेली होती. १९८७ च्या शेवटी साधारण रु.६,७०० करोडची मालमत्ता यूटीआय सांभाळत होती

  • त्यानंतरचा भाग हा १९८८ ते १९९३ चा काळ, ह्या काळात एसबीआय, एलआयसी इतर पब्लिक सेक्टर संस्थांनी आपले म्युच्युअल फंड चालू केले. १९९३ मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची मालमत्ता साधारण रु.४७,००० करोड होती

  • तिसरा भाग १९९३ तो २००३ चा काळ, ह्या काळात प्रायव्हेट सेक्टर म्युच्युअल फंडांनी आपले फंड चालू केले. त्या काळात लोकांमध्ये असलेल्या आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची वाढ धीम्या गतीनेच होत होती. २००३ मध्ये म्युच्युअल फंडाची मालमत्ता साधारण रु.,२२,००० करोड होती.

  • चौथा महत्वाचा भाग म्हणजे २००३ साला नंतरचा भाग. २००३ साली यूटीआयची दोन भागात विभागणी झाली, ज्या जुन्या योजना होत्या त्या एका भाग मध्ये प्रशासक नेमून बाजूला केल्या गेल्या आणि बाकीच्या योजना इतर म्युच्युअल फंडाप्रमाणे सेबी च्या नियंत्रणाखाली आणल्या. बरेच विदेशी म्युच्युअल फंड सुद्धा भारतात आले. त्यापैकी काहींनी आपला व्यवसाय वाढवला, तर काही विदेशी कंपन्या आपला म्युच्युअल फंड इतर म्युच्युअल फंडाकडे सोपवून निघून गेले.

  • म्युच्युअल फंडचा व्यवसाय जो २०१० साली साधारण रु.,५०,००० करोड होता, तो आता वाढून नोव्हेंबर २०१९ साली रु.२७,००,००० लाख करोड पार झाला आहे.

  • म्युच्युअल फंडाची जी असोशिएशन आहे ज्याला अँफी (AMFI) म्हणतात, त्यांनी सर्व म्युच्युअल फंडांसाठी वेळोवेळी सर्वोत्तम कार्य मार्गदर्शक तत्त्वे (Best Practices Guidelines) आणून म्युच्युअल फंडचा कारभार गुंतवणूकदारांसाठी सुखकर केला. तसेच, सर्व म्युच्युअल फंडाच्या मदतीने जास्तीत जास्त गुंतवणूक मागदर्शन मेळावे भरवून आर्थिक साक्षारतेसाठी खूप काम केले. त्याचा परिणाम हा आज म्युच्युअल फंड सर्व पसंतीचा गुंतवणूक पर्याय झालेला आहे

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l  

धन्यवाद!

निलेश तावडे, 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला  भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…