धीरुभाई अंबानी
धीरूभाई अंबानी म्हणजे भारतीय उद्योग जगतातील एक मोठं नाव. शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी यापैकी कशाचीही साथ नसेल तरी आयुष्यात यशस्वी होता येतं. यश मिळविण्यासाठी मिळविण्यासाठी जर कुठली गोष्ट आवश्यक असेल, तर तो म्हणजे मेहनत! आपण यशस्वी व्हायचं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मेहनतीने रिलायन्स साम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचं नाव आज केवळ भारतातच नाही, तर जागतिक उद्योग विश्वात सन्मानाने घेतले जाते.
18 वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक 6 जुलै 2002 साली उद्योगजगतातील धीरूभाई अंबानी नावाच्या या ताऱ्याने जगाचा निरोप घेतला. आजच्या लेखात धीरूभाई अंबानी यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य…
बालपण –
- धीरूभाई अंबानींचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव होते धीरजलाल हिराचंद अंबानी ! वडील प्राथमिक शिक्षक होते, तर आई गृहिणी होती
- शालेय जीवनात धीरूभाई अत्यंत सामान्य विद्यार्थी होते.
- दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी धीरूभाई येमेन देशातील प्रमुख शहर व बंदर असणाऱ्या एडन येथे गेले.
- एडनमध्ये ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. त्यावेळी त्यांचे मासिक वेतन होते मात्र 300 रुपये.
- नोकरी दरम्यानच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली.
राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…
व्यावसायिक आयुष्याची सुरुवात –
- स्वप्न तर सगळेच पाहतात पण धीरूभाई यांच्यामध्ये आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती.
- एडनमध्येच राहणाऱ्या मोठा भाऊ रमणिकलाल यांच्यासह त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले.
- एकीकडे व्यवसायात लोकप्रियता वाढत होती, तर दुसरीकडे हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर धीरूभाईंनी ए. बेस मध्ये प्रमोशन मिळवत कारकून, सेल्स मॅनेजर पदापर्यंत मजल मारली.
- कामासाठी आवश्यक म्हणून अरबी भाषा शिकून त्यावर प्रभुत्वही मिळविले.
इन्फोसिसची यशोगाथा – कोण बनला करोडपती…?…
मातृभूमीला परत –
- 1951 साली वडील हिराचंद अंबानी यांचे निधन झाले, त्यांनंतर 1954 मध्ये कोकिलाबेन पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला
- विवाहानंतर धीरूभाई यांनी एडनला संसार थाटला.
- धीरूभाईंनी नेहमीच व्यावसायिक होण्याचे स्वप्न बघितले. आपला स्वतंत्र व्यवसाय भारतातच उभा करावा हे ही धीरूभाईंनी पक्के केले होते.
- अखेर 1958 साली एडनला रामराम करून धीरूभाई आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)
रिलायन्स उद्योगाची स्थापना –
- भारतात परत आल्यावर सन 1959 साली धीरूभाई अंबानी यांनी 15,000रुपयांची गुंतवणूक करून त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासह भागीदारी करून मशीद बंदर मुंबई येथे रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- सुरुवातीला मसाले आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करणाऱ्या रिलायन्स साम्राज्याने आज अनेक क्षेत्रात आपला जम बसवला आहे.
रिलायन्स – पब्लिक लिमिटेड कंपनी –
- सन 1977 साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये केले.
- लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा मोठ्या प्रमाणात गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले.
- भारतातील छोट्या गुंतवणूकदारांना शेअरबाजारात आणण्याचे श्रेय धीरूभाई यांना दिले जाते.
- सन 1978 मध्ये धीरूभाईंनी कापड व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले.
- विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली आणि अवघ्या 2 वर्षांत देशभरात सगळीकडे विमलची शोरूम थाटली.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)
विरोधकांचा पाडाव –
- यशस्वी माणसाला आयुष्यात मित्रांपेक्षा शत्रू जास्त लाभतात.
- रिलायन्सच्या यशाची घोडदौड खास करून पब्लिश इश्यू बाजारात आल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून, अनेक शत्रूंनी डोके वर काढले.
- नस्ली वाडीया (बाँबे डाइंग), कपाल मेहेरा (ओर्के पॉलीस्टर) यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना धीरूभाईंनी नामोहरम केले.
- त्यानंतर रामनाथ गोयंका यांनी त्यांच्या इंडीयन एक्सप्रेसच्या माध्यमातून रीलायन्सला संपवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न केला.
- हे प्रकरण खूप गाजले होते. पार संसदेपर्यंत पोहचलेल्या या प्रकरणामध्ये विरोधक रिलायन्सवरील आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले. त्यांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही.
- कलकत्त्याच्या शेअर दलालांनीही रिलायन्सचा पाडाव करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. इतकंच नव्हे तर, कलकत्त्याचे दलाल कायम स्वरुपी बाजाराच्या बाहेर फेकले गेले.
- धीरूभाईंच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपट “गुरु” सुपरहिट झाला.
जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”
धीरूभाई यांची दोन्ही मुले मुकेश अंबानी व अनिल अंबानी आज उद्योगविश्वात यशस्वी आहेत. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर रिलायन्स समूह या दोघांमध्ये विभागण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळातही मुकेश अंबानी यांनी हुशारीने योग्य निर्णय घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त केले, तर अनिल अंबानी मात्र काही चुकीच्या निर्णयांमुळे काहीसे मागे पडले आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही मेहनत आणि हुशारीच्या जोरावर गर्भश्रीमंत होणाऱ्या धीरूभाईंचा आदर्श भारतातील प्रत्येकाने खास करून युवा पिढीने डोळ्यासमोर ठेवायला हवा.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search – Dhirubhai Ambani Marathi info, Biography of Dhirubhai Ambani in Marathi