Digital Transactions
Reading Time: 2 minutes

Digital Transactions

कोरोना महामारीमध्ये डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Razorpay report नुसार गेल्या वर्षभरात डिजिटल पेमेन्टमध्ये ७६% वाढ झाली आहे. पण ‘सोय तितकी गैरसोय’ या नियमाप्रमाणे त्यातील धोकेही वाढतच चालले आहेत, पर्यायाने सायबर गुन्हेगारीमध्येही लक्षणीय वाढ होत चालली आहे. हे गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या लढवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. त्यामुळे आपले पैसे व आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण आपले पैसे सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्याचे ३ मुख्य उपाय कोणते आहेत, याबद्दल माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान…

Digital Transactions: तुमचे पैसे सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या ३ गोष्टींची काळजी घ्या 

१. कार्ड सेव्ह करू नका: 

  • ऑनलाईन खरेदी करताना अनेकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचं मुख्य कारण म्हणजे संबंधित कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफर्स. 
  • खरेदी करताना Save card for future अथवा save card details अशा प्रकारच्या पर्यायावर असणारी टिकमार्क काढून टाकायची विसरतात अथवा पुढे कार्ड डिटेल्स भरायचा त्रास वाचण्यासाठी जतन करतात. परंतु, हे टाळले पाहिजे. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. 
  • याचबरोबर  ब्राउझरमध्ये असणारी ऑटोफिल सुविधा देखील बंद करायला हवी. यामुळे कदाचित सर्व माहिती भरण्याचे कष्ट करावे लागतील परंतु ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

२. फसव्या लिंकवर क्लिक न करणे 

  • अनेकदा बँक, क्रेडिट कार्ड किंवा इंश्युरन्स कंपनीकडून एखादे महत्वाचे मेल येते. त्यामध्ये एखादी ऑफर किंवा केवायसी संबंधित माहिती विचारली जाते. संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी अथवा ऑफर मिळविण्यासाठी त्यामध्ये एक लिंक दिली जाते.
  • सवलत देणाऱ्या जाहिरातींकडे आपण लगेच आकर्षित होतो पण लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान! हा फिशिंगचा प्रकार असू शकतो.
  • ही मेल फसवी असू शकतात. त्यामुळे कोणत्याही मेलमध्ये आलेली लिंक क्लिक करण्यापूर्वी संबंधित मेल अधिकृत बँक अथवा कंपनीकडून आल्याची खात्री करून घ्या.  सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंकवर क्लिक करण्याऐवजी ती कॉपी करून ब्राउझर मध्ये पेस्ट करून बघा. जर लिंक अधिकृत नसेल तर ती ओपन होणार नाही. 
  • सर्वात उत्तम पर्याय म्हणजे संबंधित ऑफर अथवा अन्य माहितीसंदर्भात आपल्या बँकेकडे चौकशी करा.

विशेष लेख: सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

३. ओटीपी आणि क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्या: 

  • वन-टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी कोणालाही सांगू नका. बँक अथवा कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला कधीही ओटीपी विचारत नाही. 
  • त्याचप्रमाणे क्यूआर कोड स्कॅन करतानाही आवश्यक ती काळजी घ्या. खात्रीशीर दुकानांमध्येच  क्यूआर कोड स्कॅन करा. 
  • इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलताना बहुतांश बँका अथवा वित्तीय संस्था ‘ओटीपी’ची सुविधा देतात, म्हणजेच केवळ ओटीपीच्या आधारे नेटबँकिंगचा पासवर्ड बदलता येतो. त्यामुळे ओटीपी मिळताच हॅकर तुमचा पासवर्ड बदलून तुमचे बँक खाते ताब्यात घेऊ शकतो.
  • याचबरोबर काही क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या बँक खात्याचा तपशील हॅकरच्या ताब्यात जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व संशयित वाटणारा क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका. 

ऑनलाईन बँकिंग ही सुविधा आहे आणि तिचा वापर जर योग्यप्रक्रारे केला तर यामुळे तुमचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाचू शकतात. परंतु, तुमची एक चूक तुमची आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा सुरक्षित राहा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Digital Transactions Marathi Mahiti, Digital Transactions in Marathi, Digital Transactions & cyber security in Marathi, Digital Transactions & cyber security Marathi Mahiti, Digital Transactions & cyber security Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.