Arthasakshar Video Channels Marathi info
Reading Time: 3 minutes

डिस्ने+ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ की झी ५?

कोविड-१९ मुळे झालेल्या लोकडाऊनमुळे आजपर्यंत कधीही पाहिले गेले नव्हते इतके ऑनलाईन शोज पाहिले जात आहेत आणि त्यासाठी नानाविध पर्याय उपलब्ध आहेत. 

यामधून योग्य पर्याय निवडण्यासाठी २ प्राधान्यक्रमांचा विचार करावा लागेल, एक म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आणि तुम्हाला कशा प्रकारचे कंटेन्ट पाहण्यामध्ये जास्त रस आहे. 

आपण क्रमाने या विविध पर्यायांबद्दल आज माहिती घेऊया.

Arthasakshar Video Channels Marathi info
https://bit.ly/3cccYUl

डिस्ने+ हॉटस्टार (Disney+Hotstar): 

  • हा भारतीयांचा सर्वांत लोकप्रिय पर्याय आहे. डिस्ने आणि हॉटस्टार यांचे टाय-अप झाल्यावर हॉटस्टारच्या प्लॅन्सच्या किमतींमध्ये अर्थातच वाढ झाली आहे. 
  • यांचा व्हीआयपी प्लॅन आहे, दर महिना ३९९ रुपये इतका. यामध्ये हॉटस्टार व्हीआयपी कन्टेन्ट सोबतच यामध्ये अनेक सिनेमे, टेलिव्हिजनवरील मालिका, अनेक सुपरहिरो सिनेमे आणि डिस्नेचे सिनेमे पाहता येतात.
  • यांचा यापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध करून देणारा प्लॅन म्हणजे प्रीमियम plan ज्याची मासिक किंमत आहे १४९९ ज्यामध्ये डिस्ने+ च्या ओरिजिनलचे सर्व कार्यक्रम, नवीन सिनेमे आणि शोटाईम, HBO आणि फॉक्सचे  सिनिमे देखील पाहता येतात. 

नेटफ्लिक्स (Netflix): 

  • दुसरा क्रमांक लागतो नेटफ्लिक्सचा जे जगात सर्वांत लोकप्रिय आहे.
  •  हा इतर पर्यायांपैकी सर्वांत महागडा असा पर्याय आहे. परंतु यांच्याकडे आपल्या आवडीनुसार विविध प्लॅन्स आहेत. 
  • महिन्याला १९९ रुपयांच्या मोबाईल प्लॅनमध्ये आपण अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिका पाहू शकता. हे सर्व पर्याय SD क्वालिटी मध्ये उपलब्ध आहेत. हा पर्याय फक्त स्मार्टफोन आणि टॅब्लेट्ससाठीच आहे.
  • मासिक बेसिक प्लॅन म्हणजे ४९९ रुपयांत हेच कार्यक्रम तुम्हाला स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर या पडद्यांवर  पाहण्यासाठी उपलब्ध होतात. 
  • स्टॅंडर्ड प्लॅन मध्ये ६४९ रुपये महिन्याला देऊन तुम्ही एकाच वेळी २ पडद्यांवर तुम्ही HD दर्जाचे कार्यक्रम आणि सिनेमे पाहू शकता, तर ७९९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये अल्ट्रा HD कन्टेन्ट तुमच्यासाठी ४ वेगवेगळ्या पडद्यांवर एकाच वेळी पाहता येऊ शकतो.

अमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video ): 

  • यामध्ये सर्वांत परवडणाऱ्या किमतीमध्ये अनेकविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. 
  • अमेझॉन प्राईमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावर हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, मल्याळम आणि गुजराथी या ७ भारतीय भाषांमधील कार्यक्रम आणि सिनेमे पाहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. 
  • याचे आणखीही काही फायदे म्हणजे यामध्ये व्हिडीओज सोबतच फक्त गाणी ऐकायचा देखील पर्याय आहे आणि शिवाय या ग्राहकांना अमेझॉनवर ऑर्डर केलेली उत्पादने अत्यंत कमी वेळात घरपोच मिळतात. 
  • यामध्ये २ पर्याय उपलब्ध आहेत महिन्याला १२९ रुपये आणि वर्षाला ९९९ रुपये. यामध्ये ऍमेझॉन चे स्वनिर्मित कार्यक्रम देखील पाहता येतात. 

झी ५ (Zee 5) : 

  • हे अर्थात झी कॉर्पोरेशन कंपनीचे आहे आणि यावर झीचे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय यांचे स्वतःचे असे काही कार्यक्रमदेखील यावर पाहता येऊ शकतात. 
  • महिन्याला ९९ रुपये आणि वर्षाला ९९९ रुपयांमध्ये याचे सदस्यत्व मिळू शकते. 
  • झी ५ मध्ये १ कॉम्बो पाकदेखील आहे ज्यामध्ये महिन्याला १९८ रुपये भरून झी ५ आणि गाना+ या दोन्हींचे सदस्यत्व मिळते.

युट्युब प्रीमियम (YouTube Premium): 

  • युट्युबदेखील या स्पर्धेमध्ये आहे आणि याच्या सदस्यत्वाचा फायदा म्हणजे जाहिरातींशिवाय तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. 
  • यांच्याकडे पूर्ण कुटुंबासाठी देखील प्लॅन आहे ज्यामध्ये फक्त १८९ रुपये भरून कुटुंबातील ५ व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. 
  • याशिवाय विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीमध्ये म्हणजे फक्त ७९ मासिक शुल्काचा  पर्यायदेखील उपलब्ध आहे .

व्हूट (Voot): 

  • हा आणखी एक खूप रंजक पर्याय आहे. Viacom18 चा हा प्रोग्रॅम आहे त्यामुळे साहजिकच त्यांचे सर्व कार्यक्रम इथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. 
  • यांच्या सदस्यत्वासाठी महिना ९९ आणि वार्षिक ९९९ शुल्कांचे पर्याय उपलब्ध आहेत. 
  • यांच्याकडील अनेक व्हिडिओस आपण फ्री देखील पाहू शकता जे जाहिरातदारांकडून येणाऱ्या कमाईवर चालतात. त्यामुळे या फ्री कन्टेन्टमध्ये अधेमधे बऱ्याच जाहिरात असतात. 

अशा अनेकविध पर्यायांमधून तुम्हाला नक्की काय पाहण्यात रस आहे आणि त्यासाठी तुम्ही किती खर्च करू इच्छिता यानुसार तुम्ही तुमच्यासाठी योग्य त्या पर्यायाची निवड करू शकता.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –