DIY गुंतवणूक
https://bit.ly/31BV6zM
Reading Time: 3 minutes

गुंतवणूक: DIY की DAY?…..

DIY गुंतवणूक या अलीकडेच सुरु झालेल्या प्रकाराचा काहींनी प्रयोग सुरु केला असेल. हा प्रकार कितपत योग्य आहे?  करून घेणे आवश्यक आहे. 

मार्च महिन्यात माझ्या डॉक्टरांनी पुढील संदेश वजा वैयक्तिक काळजी घेण्यासाठीचे मोफत प्रिस्क्रीप्शन पाठविले होते. याचे पालन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, असे त्यांना अभिप्रेत असावे.

 1. प्रत्येक १ तासाला साबणाने हात स्वच्छ धुवा.
 2. दिवसातून २ वेळा श्वसनाचे व्यायाम करा व गरम पाण्याची वाफ घ्या.
 3. दिवसातून ३ वेळा कोमट पाण्यात मिठ आणि हळद घालून गुळण्या करा.
 4. प्रत्येक ४ तासाला पाण्यात जंतूनाशक घालून घर पुसून काढा.
 5. पोटभर पण सात्विक व समतोल आहार घ्या.
 6. भिमसेन कापूराचा वापर करून घराचे निर्जंतुकीकरण करा.
 7. घरातून बाहेर पडतांना मुखपट्टीचा वापर करा.
 8. जर काही औषधे सुरु असतील तर ती नियमित घ्या.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

तुम्हाला सुद्धा असे मेसेजेस आले असतील किंवा अजूनही येत असतील. या गोष्टींचे पालन करणे म्हणजे Do-It-Yourself (DIY) असेच होईल ना? काही मंडळी तर घरात देखील मुखपट्टीचा वापर करताना मी पाहिली आहेत. माझ्या एका मित्राने यापेक्षाही कठोरपणे सर्व नियमांचे पालन केले होते. तरीसुद्धा त्याचे कुटुंब कोरोना बाधित झाले. नंतर त्यांनी तज्ञ डॉक्टरांचे उपचार घेऊन कोरोनावर मात केली.

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

DIY गुंतवणूक

 • भारतात गुंतवणूक करणाऱ्यांची DIY अशी एक जमात निर्माण होत आहे. 
 • हे DIY आलं कुठून? तर नेहमीप्रमाणेच याचं उत्तर आहे पाश्चिमात्य देशांतून. 
 • ती लोकं करतात मग आपण का नाही करू शकत? हा स्पर्धात्मक तौलनिक विचार कायमच असतो. पण DIY करण्यापूर्वी त्यांच्याकडे पात्रतेचे काही निकष पूर्ण करावे लागतात. 
 • विकसित देशांत गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाला स्वतःची जोखीमांक चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. 
 • जसा आपल्याला सिबिल परिचित आहे तसाच त्यांच्याकडे गुंतवणूकीस पात्र असलेल्या प्रत्येकाच्या जोखीमांकाची नोंद केला जाते. त्यानुसारच त्यांना गुंतवणूक सल्लागार किंवा आस्थापना गुंतवणूक साधन सुचवू अथवा विक्री करू शकतात.

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह…..” 

भारतामधली DIY ची संकल्पना:

 • आपल्याकडे DIY म्हणजे ‘कमिशन वाचवणे’ एवढाच उद्देश जाहिरातींमधून सांगितला जातो.
 • त्यांच्याकडे जोखीमांकाच्या पलिकडे कोणी गुंतवणूक विक्री अथवा खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास नियामकांच्या कारवाईस सामोरे जावे लागते. 
 • आपल्याकडे गेल्या महिन्यात सेबीने जाहीर केल्यानुसार म्युच्युअल फंडांच्या योजनांना ‘रिस्को मीटर’ जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच DIY गुंतवणूकदाराने त्याची जोखीम ओळखून गुंतवणूक करायची आहे. 
 • माझ्या पाहण्यात असेही काही DIY वाले आहेत की जे फंडांच्या निधी व्यवस्थापकाने कुठले शेअर्स घेतले आहेत? हे पाहून शेअर्स खरेदी करतात. म्युच्युअल फंडांमधे कायम निधीचा ओघ सुरु असतो. तेव्हा निधी व्यवस्थापक कधी नफा वसुली करून दुसऱ्या शेअर्सची खरेदी करेल, हे कोणी सांगू शकत नाही.
 • मार्च २०२० मधे बाजार कोसळले आणि DIY वाल्यांचे धाबे दणाणले. केलेल्या गुंतवणूका निर्देशांकांपेक्षा अधिकचा उणे परतावा दाखवू लागल्या आणि मग चांगल्या सल्लागाराची शोधाशोध सुरु झाली.
 • व्यवसायाच्या मुलभूत नियमानुसार सल्लागाराला शुल्क द्यावे लागणार या धास्तीपोटी सेवा घ्यावी की नाही हा संभ्रम वाढू लागला आणि अजूनच नुकसान सोसावे लागले.

नवरात्र विशेष लेख क्र. ४: मी श्रीमंत कसा होऊ? 

DIY गुंतवणूक- काही उदाहरणे 

उदाहरण १ –

 • गुंदेचा नावाचे एक ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यांनी ३ वर्षांपूर्वी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम कुठे गुंतवावी? म्हणून राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. कारण आपला पहिला विश्वासू सल्लागार बँक अधिकारी असतो. त्यांचे फंड घराणे असल्यामुळे त्याला गुंदेचांना प्रॉडक्ट विकणे सोपे गेले.
 • गुंदेचांचा जोखीमांक काय आणि त्यांच्या निवृत्तीपश्चात आर्थिक गरजांची माहिती नसलेल्या बँक अधिकाऱ्याने थिमॅटीक फंडात सगळी रक्कम गुंतविली.
 • गुंदेचांच्या मुद्दलात तब्बल ३०% घट झाली आहे. आता तो अधिकारी बदलून गेल्यामुळे कोणाला विचारावे? असा प्रश्न गुंदेचांना पडलाय. याला DAY (Die At Yourself) न म्हणावे तर काय म्हणावे?
 • DIY होतांना स्व-अभ्यास महत्वाचा असतो. पुढील ३ मुद्दे लक्षात घेऊन कृती केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.
  1. तुम्हाला उपलब्ध असलेल्या माहितीचे संशोधन करण्याची तुमची क्षमता.
  2. मी कधी चुकणारच नाही याचा (अति) आत्मविश्वास.
  3. तुमच्या आर्थिक ध्येयांनुसार मत्ता विभाजन.

नवरात्र विशेष लेख क्र. ५: पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ 

उदाहरण २ 

 • संगणक अभियंता असलेल्या सचिनला आपल्या संगणकीय कौशल्यांमुळे आर्थिक नियोजनाचे कौशल्य गुगलच्या मदतीने सहज आत्मसात करता येईल हा आत्मविश्वास होता.
 • त्यामुळे फक्त चांगला परतावा मिळवायचा हेच ध्येय ठरवून सुरु केलेली गुंतवणूक एककेंद्री झाल्याने ६ महिन्यांपासून आर्थिक अस्वस्थतेचा सामना करतांना सचिनची दमछाक होतेय. पण अजूनही त्याचा आत्मविश्वास मी चुकलोय, हे मान्य करायला तयार नाही.
 • पोर्टफोलिओ बांधणी करतांना मूल्यात वाढ आणि मुद्दलात स्थिरता असणे खूप महत्वाचे असते.
 • शिक्षण घेत असतांना चांगले गुण मिळालेच पाहिजेत या उद्देशाने आपल्याला अभ्यास करायला शिकविले जाते. पण त्या विषयाचे ज्ञान कसे उपयोगात आणायचे? हे शिकविले जात नाही.

नवरात्र विशेष लेख क्र. ६:  Guaranteed Return: खात्रीशीर परताव्याचा अट्टाहास…

गुंतवणूक करतांना कुठपर्यंत पोहोचायचे हे ठरविणे म्हणजे ध्येय आणि तिथवर पोहोचण्यासाठी केलेली तयारी म्हणजे उपलब्ध स्त्रोतांचे नियोजन करणे होय. पैसे कशासाठी मिळवायचे? याचे उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकेल. पण मिळविलेल्या पैशातून सुरक्षितता, संसार चालविण्यासाठी, सुखसाधने विकत घेण्यासाठी यापेक्षा वेगळे काही असू शकतील असे वाटत नाही. तेव्हा DIY की DAY याचा निर्णय जबाबदारीने घ्या.

– अतुल प्रकाश कोतकर

atulkotkar@yahoo.com

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…