Reading Time: 2 minutes

एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी ०२% वाढते, आणि पुढल्या वर्षी ती ०२% कमी होते. पुढील १० वर्षे हा क्रम सतत चालु राहिला तर १० वर्षांनंतर त्या गावाची लोकसंख्या..

(a) वाढली असेल (b) कमी झाली असेल (c) तेवढीच राहील (d) सांगता येत नाही

असा प्रश्न मी शालेय जीवनांतील एका स्पर्धा परिक्षेकरिता अभ्यासला होता.

या प्रश्नांतील खोच लक्षांत येवुन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहे अशांचे अभिनंदन..

मात्र केवळ घाईगडबडीमुळे वा ‘silly mistake’ केल्याने ज्यांनी  ‘(c) तेवढीच राहील’ हा पर्याय निवडला..

अशा गडबडराव /गोंधळेकर ताईंना हा पोस्ट समर्पित करतो.

‘Attack is the best Defence’ या बहुतेकांना माहित विधानाचा व्यत्यास (metathesis) ‘Defence is the best Attack’ असा दृष्टिकोन मांडणारा सदर पोस्ट आहे.  झालेले नुकसान भरुन येणे ही एक नैसर्गिक बाब आहे..मात्र असे नुकसान भरुन येण्याकरिता अतिरिक्त शक्ती खर्च करावी लागते. हे सत्य बाजारालाही लागु होते.

असे म्हटले जाते की..

  • A stock first losing 50% of its value…
  • & then going up by 50%..
  • Is still down by 25%.. पडताळा.. आणि विचार करा.

 हेच ’गणित’ पुढे मांडल्यास

  • आपले १०% नुकसान भरुन काढण्याकरिता ११%,
  • नुकसान २०% असल्यास भरपाईसाठी २५%,
  • पुढे ३०% करिता ४३%,
  • आणि फटका ४०%चा बसल्यास ६७%

नफा मिळविण्याची गरज असते.

सबब संभाव्य नुकसानीच्या बंदोबस्ताचे महत्व सकृतदर्शनी दिसते त्यापेक्षा अधिक असते..

एखाद्या चॅलेंजिंग स्कोरचा पाठलाग करताना टीमने सुरवातीला ‘हीट विकेट’ वा ‘रन-आउट’ होवुनच विकेट घालवल्या… तर पीच उत्तम, फलंदाजीला आणि फटकेबाजीला पोषक असुनही शेवटी रनरेटचे दडपण येणारच ना??

आपल्या बाजाराचे दीर्घकालीन भवितव्य जरुर उज्वल आहे…

  • मात्र आधी केवळ दुर्लक्ष वा बेफिकिरीने नुकसानीच्या खाईत जायचे…आणि मग  ते भरुन काढण्यासाठी दीडपट दुप्पट शक्ती लावायची…. हा अव्यारेषुव्यापार शक्यतो टाळला तर बरे.
  • बाजारांत धडाक्याने विकल्या जाणाऱ्या, विमा सल्लागार वर्गाच्या आवडत्या ‘ULIP’ पॉलिसीज बहुतेकदा बाजाराने दिलेल्या परताव्यापेक्षा कमी परतावा देतात, याचे कारणही हेच आहे..सुरवातीलाच कापलेले गलेलठ्ठ कमिशनादी खर्च !!! (अस्मादिक एक विमा सल्लागारही आहेत..)
  • रविवारी सकाळी सकाळी ‘गुणोत्तर व प्रमाण’ या विषयावर ‘शाळा’ घेण्याची अक्षम्य चुक करतो आहे. याची जाणिव असुनही माझ्या गणितप्रेमाचे द्योतक म्हणुन आठवलेले आणखी एक विषयबाह्य परंतु विचारप्रवर्तक उदाहरण देऊन थांबतो..

कोणीतरी म्हटले आहे..

When a stock falls 95%… (आठवा, गीतांजली, आशापुरा, वकरंगी ई.)  

First, it fells by 90%…

..

& then..

Further By 50%!!!

असो ..तर ‘मित्रों’ एवढा ‘पीळ’ मारण्याचे कारण म्हणजे….

‘Rather they Caste their votes,  they vote their Casts’ असे जिच्याबद्दल ( दुर्दैवाने यथार्थपणे ) बोलले जाते, ती भारतांतील निवडणुक आता सुरु झाली आहे..

देशाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणारा, असा हा ‘महोत्सव’ असल्याने अर्थातच त्याचे परिणाम बाजारावरही दिसणार आहेत.

आणि बाजार त्याच्या नेहमीच्या अधीरपणाने प्रत्यक्ष निकालांची वाट न पाहाता, ‘Exit Polls’ नंतर लगेचच आपले रंग बदलायला सुरवात करेल…

गेल्या काही दिवसांत बाजाराची चाल ही तेजीचीच राहीली आहे, निर्देशांक सर्वकालीन उच्चांकी पातळीजवळ आहे.

अगदी पी/ई गुणोत्तरासारखे बाजाराची स्थिती सांगणारे प्राथमिक घट्कही बाजार खुप स्वस्त नाही  किंवा ‘Fully Valued’ आहे असेच सुचवत आहेत..

गुंतवणुकदारांनी सावध रहावे..

आपण पुण्याहुन मुंबईला जाण्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’ वरुन वेगाने मार्गक्रमणा करतो आहोत, आपले गतव्य स्थान आलेले नाही, गाडी तशीच भन्नाट वेगाने आणखी काळ चालवणे शक्य ही आहे,

तरीही मध्येच दत्त वा अन्य ठिकाणी गाडीं जरा बाजुला घेवुन मिसळ/चहाचा आस्वाद घ्यावा, टायरची हवा तपासावी….

आणि ताजेतवाने होवुन पुढे मार्गस्थ व्हावे.

अशाने आपला प्रवास अधिक सुखकर होवु शकेल. नाही का?? 

– प्रसाद भागवत

9850503503

( महत्वाची सुचना-  ही पोस्ट केवळ माहिती म्हणुनच दिली आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणुन नाही )

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?,  फसव्या विमा पॉलिसींचा सापळा,

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…