भारतातील आघाडीची खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी खास शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यासाठी उपयुक्त असे पहिले ‘फार्मित्रा’ (Farmitra )हे मोबाइल ॲप्लिकेशन सादर केले आहे.
Farmitra app – फार्मित्रा ॲपची खास वैशिष्ट्य म्हणजे-
१. शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी एकच पर्याय
२. प्रादेशिक भाषांमधून वैयक्तिक सल्ले
३. ‘पीएमएफबीवाय’ पोर्टलद्वारे पीक विमा खरेदी तसेच आरोग्य व वाहन विम्याची खरेदी शक्य
- या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यांना विमा योजनांबरोबरच शेतकामाच्या दैनंदिन गरजांसाठी पूरक माहिती आणि सल्लादेखील उपलब्ध होईल.
- या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधीच्या समस्यांवर उपाय मिळावेत आणि त्यांना त्यांच्या शेतीसाठी पूरक माहिती मिळावी असा कंपनीचा उद्देश आहे.
- हे ॲप शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य असल्याने या माध्यमातून कंपनीचे शेतकऱ्यांशी असलेले नाते अधिक दृढ होईल.
- हे ॲप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाविषयीचा अंदाज वेळोवेळी दिला जाईल. शेतकऱ्यांनी निवडलेल्या पिकाविषयीचे तज्ञांचे सल्लेदेखील त्यांना उपलब्ध होतील.
- कृषीक्षेत्राशी संबंधित ताज्या घडामोडी, बातम्याही त्यांना पाहता येतील. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील बियाणे व मृदाचाचणी प्रयोगशाळा, खत –औषध विक्रेत्यांची माहिती, शीतगृहांची माहितीही त्यांना उपलब्ध असेल.
- शेतकरी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत (पीएमएफबीवाय) पीक विमा खरेदी करू शकतील. त्यांच्या अर्जाची स्थिती पडताळू शकतील, विम्याचा दावा करू शकतील तसेच त्यांच्या समन्वयकांशी संपर्कही साधू शकतील. त्याचबरोबर कंपनीच्या वाहन तसेच आरोग्य विम्याची योजनाही त्यांना खरेदी करता येणार आहे.
- या ॲपचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. वापरकर्त्यांना फक्त त्यांचे राज्य, तालुका, शेतीचे ठिकाण, पीक आणि अन्य संबंधित माहिती व वैयक्तिक तपशील एकदाच भरायचा आहे. या माहितीच्या आधारे त्यांचे भौगोलिक स्थान, पीक, भाषा आदीनुसार वर्गीकरण केले जाईल.
- फार्मित्रा या ॲपच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्यांच्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सच्या सर्व योजनांची माहिती आणि दाव्यासाठी मदतही मिळेल.
- बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने यासाठी कृषी सल्ला व माहिती पुरविणाऱ्या संस्थांशी सहकार्य केले आहे. त्यामुळे या अपच्या वापरकर्त्यांना हा सल्ला मोफत उपलब्ध असेल. हे ॲप्लिकेशन सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र व हरियाणा या सहा राज्यात सध्या उपलब्ध आहे. लवकरच यामध्ये आणखी राज्यांचा तसेच अन्य सुविधांचाही समावेश करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
फार्मित्रा ॲप सादर करताना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघेल म्हणाले, “कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ‘पीएमएफबीवाय’च्या माध्यमातून प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई होत असल्याने कृषी क्षेत्राचा विकास होत आहे. विमा हे नागरिकांना सन्मानाने जगण्याची संधी देणारे आणि त्यांच्या चिंता दूर करणारे माध्यम आहे, असे मी मानतो. फार्मित्राच्या माध्यमातून स्थानिक हवामानाच्या अंदाजापासून ते आवश्यक विमा योजना सुचविण्यापर्यंत सर्वच गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना आधार व सहकार्य देऊन त्यांना शिक्षित, सक्षम करून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी हे अप नक्कीच उपयुक्त ठरेल.”
फार्मित्रा ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा, आणि सर्व वैशिष्ट्यांचा अनुभव घ्या. किंवा खालील क्यूआर कोड स्कॅन करा
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
– बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/