तिशीनंतरचे आर्थिक नियोजन
तिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते.
आर्थिक नियोजन: आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…
आपले आर्थिक नियोजन हे येणाऱ्या नजीकच्या भविष्यात असेच नाही तर इथून पुढच्या आपल्या अखंड आयुष्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी निर्णायक असते. त्यामुळे तिशीच्या टप्प्यावर आल्यावर इथून पुढचे आर्थिक नियोजन हे कसे असावे आणि त्यासाठी कोणत्या घटकांचा विचार केला जावा या संदर्भामध्ये आपण या लेखमालिकेचे मध्ये चर्चा करणार आहोत.
आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब…
तिशीनंतरचे आर्थिक नियोजन –
आपल्या खर्चाचा अधिक्रम ठरवून घ्यावा
- तिशीमध्ये येता येता आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायची इच्छा आहे याची आपल्याला अनुभूती आलेले असते.
- या अनुभवातून आलेले शहाणपण आतून आणि वैचारिक प्रगल्भ त्यातून आपण आयुष्यामध्ये आपल्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या आणि चैनीच्या गोष्टी कोणत्या त्याच्यामध्ये फरक करू शकतो.
- आर्थिक नियोजनामध्ये या घटकाचा विचार करताना सुरुवातीला आयुष्यातले आपले ध्येय निश्चित करणे फार गरजेचे आहे.
- एकदा काही ध्येयनिश्चिती झाली की त्या हिशोबाने आपल्याला आपल्या खर्चामधला अत्यावश्यक गोष्टी आणि चैनीच्या गोष्टी यातील फरक अधिक स्पष्टपणे करता येतो.
नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,
आपला आजवरचा आर्थिक प्रवास तपासा
- कुठून सुरुवात करून आपण कुठवर आलोय याचं सतत भान असू द्या.
- या प्रवासाचं आकलन फार महत्वाचं आहे.
- यातून केवळ वेगवेगळे टप्पेच नाही तर त्या प्रवासात आपल्या हातून झालेल्या चुका आणि शिकलेल्या धड्यांचाही अभ्यास करता येतो आणि पुढील आर्थिक नियोजन अधिक सक्षम होण्यास मदत होते.
आपले बजेट नियोजित करा
- पस्तिशीत येतानाची सर्वात महत्त्वाची आर्थिक पायरी म्हणजे आपल्या बजेटचे नियोजन करावे.
- बजेटचे नियोजन करण्यातून आपल्याला आपले मासिक उत्पन्न आणि प्रत्येक महिन्यात होणाऱ्या खर्चाचा व्यवस्थित ताळेबंद आखता येतो.
- अशाप्रकारच्या बजेटचे नियोजन करताना आपला आपल्या कुटुंबाचा आणि घरगुती इतर खर्च यांचा विचार करणे फार आवश्यक असते. जेणेकरून भविष्यात मध्येही सद्यस्थितीतील जीवनाचा स्तर खालावू न देता आपल्याला आपल्या खर्चाचे व्यवस्थित नियोजन करता येते.
- या अशा प्रकारच्या बजेटचे नियोजन करतानाचा एक चांगला नियम म्हणजे ५०-३०-२० नियम.
- आपल्या सर्वसाधारण उत्पन्नाचा विचार करता त्यातील पन्नास टक्के भाग हा आपल्या रोजच्या सर्वसाधारण करत जा आणि त्याचे बिल चुकते करण्यात जात ३० टक्के भाग हा सहलीचा खर्च नवीन कार किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या खरेदीसाठी जावा उरलेले २० टक्के हे बचत रिटायरमेंट फंड आणि इतर गोष्टींसाठी बाजूला काढता यायला हवेत.
चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन
अनावश्यक खर्च टाळा
- महिन्याचा पगार हातात पडल्यानंतर आपल्याला तो खर्च लवकरात लवकर खर्च करण्याची सवय लागलेली असते.
- खरतर शॉपिंग आणि इतर आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये पैसे खर्च करण्यात काहीही चूक नाही पण नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या खिशावर अतिरिक्त ताण पडतो.
- जर आपण स्वतःला थोडीशी आर्थिक शिस्त लावून घेतली आणि हातात आलेल्या पैशाचे योग्य नियोजन केलं, तर भविष्यात आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे वाटचाल करता येणे शक्य आहे
आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)…
आपला इमर्जन्सी फंड वाढवा
- माणसाचं आयुष्य किती बेभरवश्याचं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे.
- आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होईल याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शक्य असेल तेव्हा आयुष्यातल्या वेगवेगळ्या संकटांसाठी पैसे बाजूला करून ठेवणे कधीही शहाणपणाचे ठरते.
क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा…
आपला क्रेडिट कार्डचा वापर आटोक्यात ठेवा
- आजकाल प्रत्येक ठिकाणी जाताना आपल्या सोबत आपल्या क्रेडिट कार्ड असते याचे होते असे की जेव्हा कधी आपल्याकडचं रोख रक्कम संपते, तेव्हा आपण आपले क्रेडिट कार्ड वापरतो.
- क्रेडिट कार्डाच्या अतोनात वापरामुळे पैशाचा अवाजवी खर्च होऊ शकतो त्यामुळे एक ठराविक प्रमाणात मध्येच खर्च करण्यासाठीच क्रेडिट कार्ड वापरण्याची शिस्त स्वतःला लावून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- क्रेडिट कार्ड जर समायोजित पद्धतीने वापरले, तर आपल्यासाठी ते एक प्रकारचे वरदानच ठरू शकते.
- कित्येकदा वेगवेगळ्या प्रकारातल्या खरेदीमध्ये आपल्याला आपल्या क्रेडिट कार्डवर वेगळ्या प्रकारचे पॉईंट्स मिळतात आणि हॅपन्स एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची सूट देखील प्राप्त करता येते.
कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३…
जास्त व्याजदराचे कर्ज चुकते करायला सुरुवात करा
- तिशीमध्ये येईपर्यंत वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसहाय्य म्हणजेच कर्ज आपण घेतलेले असते.
- कालांतराने त्याच्या व्याजाचा आणि पर्यायाने त्या कर्जाचा बोजा वाढतच जातो.
- तिशीनंतरचे आर्थिक नियोजन करताना शक्यतो पस्तिशी गाठेपर्यंत असे अधिकतम व्याजदराचे कर्ज चुकते करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून आपल्यावरील आर्थिक बोजा कमी होऊन पुढील आर्थिक नियोजनाचा मार्ग सुकर होतो.
चांगला परतावा मिळवण्याच्या संधी शोधा
- तुम्ही तुमच्या पैशासाठी खूप कष्ट केलेले असतात. त्या पैशाचा आपल्याला योग्य मोबदला मिळतोय का हे बघणे फार गरजेचं आहे.
- एखाद्या गोष्टीचा चांगला मोबदला म्हणजे ती गोष्ट फुकटात मिळाली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. तर कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगली सेवा किंवा वस्तू कशी मिळवता येते याकडे कल असावा.
संकटकाळातील आर्थिक नियोजन…
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies