आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब
तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल? या भागामध्ये आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करायचे याबद्दल माहिती घेतली. या भागात आपण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणाची माहिती व आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.
आर्थिक नियोजनाचे महत्व –
- तरुण वयातच आर्थिक नियोजनाचे महत्व ओळखणे आवश्यक आहे.
- तुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे.
- गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.
- काम इथेच संपत नाही. तुमचे आर्थिक नियोजन फक्त तुमच्या एकट्याचेच असता कामा नये. ते तुमच्या कुटुंबाचे देखील आहे हे विसरू नका.
- तुम्ही कसे नियोजन करत आहात त्यावर तुमच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून आहे त्यामुळे कोणताही नियोजन करताना कुटुंबियांना विश्वासात घ्या आणि त्यांना सर्व गोष्टीची माहिती द्या.
- यामुळे त्याना परिवाराच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव राहील आणि त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यानुसार चलतीत यामुळे कुटुंबाच्या निधीवर कोणताही ताण येणार नाही.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबियांनाही आर्थिक नियोजनाचे महत्व पटणे आवश्यक आहे. ती जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे.
आर्थिक नियोजन: आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स
तरुण वयातील उत्पन्न :
- आयुष्यात असा एक काळ असेल जेव्हा तुमची जास्तीत जास्त कमावण्यासाठीप्रयत्न करू शकता.
- साधारण वयाचे ३० ते ४० वर्ष तुम्ही जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, याकडे लक्ष दिले की पुढील काही काळ तुम्हाला नियोजनात घालता येईल. तसेच, पुढचा काळ तो कमावलेला पैसा योग्य प्रकारे विनिमय करून आपल्या कुटुंबाला आनंद देतं येईल.
- पुढील काळात कुटुंबाच्या गरजा आणि हौस-मौज पुरावण्यासाठी तुम्ही तारुण्यात जमेल तितका जास्त पैसा कमवू शकलात, तर त्याचे अनेक फायदे आहे. त्यासाठी तुम्ही जास्त वेळ कामाचा पर्याय निवडावा की एखादा जोडधंदा करावा की शेअर्समध्ये गुंतवणूक करावी हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.
नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग
कर्जाची परतफेड-
- तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आर्थिक नियोजन धोक्यात आणणारी गोष्ट म्हणजे ‘कर्ज’! .
- कर्जाचे डोंगर जमेल तितक्या लवकर जमीनदोस्त केलेले बरे.
- पुढील काळात आपल्यासमोर कोणती नवीन आर्थिक आव्हान येईल सांगता येत नाही म्हणूनच आपल्या डोक्यावरचा कर्जाचा भर जमेल तितक्या लवकर हलका केलेला बरा. नाहीतर आपलं उर्वरित आयुष्य कर्ज फेडण्यात जातं आणि या धकाधकीत आपले निवृत्ती नंतरची सगळी स्वप्न धुळीत मिसळतात.
- एवढंच नाही तर आपण ही कर्ज फेडू न शकल्यास त्याचे ओझे आपल्या पुढच्या पिढीवर ढकलले जाते आणि त्यांच्याही आयुष्याची तशीच व्यथा होते.
- आपल्या नंतर आपल्या मुलांना आणि परिवाराला अशा कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी तुम्ही तुमचे सर्व कर्ज वेळेत फेडा आणि आपल्या परिवाराच्या चेहऱ्यावर एक आनंदी हास्य पाहत आयुष्याचा उत्तरार्ध घालवा.
- कर्ज कोणत्याही प्रकारचं असो शैक्षणिक, घर, गाडी किंवा उद्योगातील कर्ज असो, इतकंच नाही तर कोणत्याही किमतीचं कर्ज असो, किरकोळ हजार रुपये किंवा लाख / कोटींमध्ये असो वेळच्या वेळी खरंतर वेळेच्या आधी कर्जाची परतफेड आपल्या परिवाराला आर्थिक स्थैर्य देतं.
चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन
- तुम्हाला असं वाटेल की आपल्या सेवानिवृत्ती योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास ती आपल्या निवृत्तीपश्चात आयुष्याची सोय आपण करत असतो. मग त्यात आपण आपल्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवतो?
- लक्षात घ्या, सेवानिवृत्ती योजना ही स्वार्थीपणाची गुंतवणूक नाही. उलट आपल्या पुढच्या पिढीवर आपल्या पालन पोषणाची वाढीव जबाबदारी येऊ नये आणि त्यांना त्याचं आयुष्य त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि आनंदाने घालवता यावे यासाठी आपण आपल्या वृद्धापकाळाची सोय करून ठेवणे आवश्यक आहे.
- आपल्या परिवाराचा आणि आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे आपला जोडीदार, अर्थात पत्नी किंवा पती. बऱ्याच सेवानिवृत्ती योजना दोघांसाठी असतात. धारकाच्या मृत्यूनंतर या सेवानिवृत्ती निधीवर त्याच्या जोडीदाराचा हक्क असतो.
- आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी प्रेमाहे सारे आपण करत असतो. म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या स्वतःचा सेवानिवृत्ती निधी दार महिन्याला बाजूला टाकणे गरजेचे आहे.
मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप
मृत्युपत्र-
- प्रत्येकालाच मृत्यूची भीती असते. पण ते एक वास्तव म्हणून आपण स्वीकारायला हवे. एक दिवस आपला शेवट होणार आणि तो गोड व्हावा यासाठी आपण आर्थिक नियोजन केले पाहिजे.
- आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या परिवाराचा काळ सुखाचा जावो यासाठी वेळीच मृत्युपत्र बनवून घेणे गरजेचे आहे.
- अनेकदा असं होतं की हसत्या-खेळत्या घरांमध्ये संपत्तीच्या वाटपावरून भांडण होतात आणि नात्यांमध्ये कलह निर्माण होतो. पैसा आणि संपत्ती यामुळे आपल्या घरातील लोकांमध्ये फूट निर्माण होऊ नये म्हणून मृत्युपत्र ही गरजेची गोष्ट आहे.
- संपत्ती जास्त रकमेची असेल आणि तुम्ही त्याचं योग्य नियोजन करण्यास असमर्थ आहात असे लक्षात आल्यास योग्य वेळीच वकील किंवा आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे.
आर्थिक नियोजनाचे महत्व ओळखून तरुण वयात अगदी मृत्यूपश्चात आर्थिक नियोजन केल्यास आपल्या कुटुंबीनाही आर्थिक विवंचना सहन करावी लागणार नाही.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies