अर्थसाक्षर ई पॅन मराठी माहिती
https://bit.ly/3j7BkDl
Reading Time: 2 minutes

ई-पॅन कार्ड 

ई -पॅन कार्ड पद्धत सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पूर्वी पॅन कार्ड काढायचं म्हटल्यावर २ पानांचा अर्ज भरायचा, विविध कागदपत्रे द्यायची आणि मग काही दिवस वाट पाहिल्यावर पॅन कार्ड मिळणार. ही एवढी डोकेदुखी आता करत बसावी लागणार नाही कारण आहे ई पॅन कार्ड !

 • या वर्षीच्या सुरुवातीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेनुसार तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर फक्त १० मिनिटात आणि काहीही कागदपत्रांशिवाय तुम्हाला पॅन कार्ड  मिळणार आहे.
 • ही सोय आयकर विभागाने आपल्या सर्वांसाठी केली आहे.
 • या पॅन कार्ड साठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. हे पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ (PDF) फॉरमॅट मध्ये उपलब्ध होते.
 • याला प्रत्यक्षातील पॅन कार्ड इतकेच महत्व आहे पण तरीही तुम्हाला जर याची हार्ड कॉपी हवी असेल, तर फक्त ५० रुपये देऊन ती तुम्हाला मिळू शकते.

अर्थसाक्षर ई पॅन कार्ड

हे पॅन कार्ड मिळवण्याची पद्धत:

 1. आयकर विभागाच्या वेबसाईट वरील ई-फायलिंग पोर्टलवर जा.  मध्ये “Quick links”  मध्ये जाऊन “instant PAN through Aadhar” वर क्लिक करा.
 2. नवीन पानावरील “Get New PAN” वर क्लिक करा.
 3. नवीन पॅन कार्डसाठी तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका आणि तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येण्यासाठी कॅप्चा कोड (Captcha Code) टाका.
 4. ओटीपी (OTP) प्रमाणित करा.
 5. आधाराची सर्व माहिती प्रमाणित करा.
 6. यानंतर 15 अंकी पावती क्रमांक मिळेल.
 7. तुमच्या पॅन कार्डच्या अर्जासाठी तुमच्या ई-मेल ऍड्रेस प्रमाणित करण्याचा पर्यायही तिथे उपलब्ध असेल
 8. या आधार क्रमांकानुसार तुमच्या माहितीचे सर्व डिटेल्स Unique Identification Authority of India (UIDAI) शी पडताळून पाहिले जातात. या सगळ्या तपासणीला जास्तीत जास्त १० मिनिटे लागतात.
 9. “Check Status/ Download PAN” वर क्लिक करून तुमच्या आधाराची माहिती दिल्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड PDF फॉर्म मध्ये डाउनलोड करता येईल. शिवाय तुमच्या या आधार कार्डशी लिंक असलेल्या ई-मेल ऍड्रेस वर देखील या हे इ-पॅन कार्ड मिळेल.

ही नवीन पॅन कार्ड मिळवण्याची पद्धत आता झटपट, कोणत्याही कागदपत्राशिवाय आणि विनामूल्य केलेली आहे. पण ही सुविधा फक्त नवीन पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठीच आणि सज्ञानांसाठीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ज्या आधार कार्डने पॅन कार्ड काढायचं आहे त्याला मोबाईल लिंक केलेला असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्डवर असलेली जन्मतारीख DD-MM-YYYY म्हणजे तारिख-महिना-वर्ष याप्रमाणेच असली पाहिजे. अज्ञानांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली नाहीये.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: E-PAN kase kadhayche Marathi Mahiti, E-PAN Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…