Reading Time: 3 minutes

माझ्या एका युवा मित्राने त्याच्या एम बी ए फायनान्सच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून विविध कॉलेजमध्ये जाऊन शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका प्रश्नाचे उत्तर मागवले होते. त्याचा प्रश्न फार मजेदार आणि अगदीच साधा होता –  “जर कोणी परतफेड न करण्याच्या अटीवर ₹ २००००/- दिले तर त्याचे काय कराल?” 

याची अनेक मजेदार उत्तरे होती. कुणाला नवीनच आलेला मोबाईल घ्यायचा होता, कुणाला पंचतारांकित हॉटेलात भोजन करायचे होते, कुणाला ब्रॅण्डेड कपडे घ्यायचे होते, कुणाला या पैशात विमान प्रवास करायचा होता. जवळपास १००० विध्यार्थ्यांचा उत्तरांचा प्रतिसाद पाहून त्यातून निघालेला धक्कादायक निष्कर्ष हा होता की सर्वाना कोणत्या न कोणत्या मार्गाने पैसे खर्च करायचे होते. परंतू या पैशातून मी बचत किंवा गुंतवणूक करावी, असे एकाही व्यक्तीस वाटले नाही. याचा अर्थ पैसे खर्च कसे करायचे याचे ज्ञान सर्वाना प्राप्त झाले आहे, परंतू त्याची बचत / गुंतवणूक करायची हे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. 

अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

पालकांच्या उबेखाली असलेली हीच मुले भविष्यात जेव्हा नोकरी उद्योग करायला लागतात तेव्हा मिळालेले पैसे अनिर्बंध खर्च करतात आणि काही आर्थिक संकट आले की गडबडून जातात.

सर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

आर्थिक शिस्त लावून घ्यावी. त्यांना मदत व्हावी या हेतूने काही जुन्याच सूचनांची नव्याने उजळणी-

  • आवड असो अथवा नसो आर्थिक विषयाची प्राथमिक माहिती करून घ्या, जी तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. या पुढील काळात परंपरागत गुंतवणूक मागे पडणार आहे, या दृष्टीने मुंबई आणि राष्ट्रीय  शेअरबाजाराचा ‘Certification in online finance for non finance Executives’ हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम उपयोगी पडू शकतो. NISM चे या संदर्भातील ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स सुद्धा उपयुक्त आहेत. वेळेचे महत्त्व वेळीच ओळखून सुरुवात करा. आजपर्यंत यशस्वी झालेल्या लोकांना याची जाणीव सर्वात आधी झाली होती हे लक्षात घ्या.
  • आपल्या वार्षिक उत्पन्नच्या २० पट टर्म इन्शुरन्स घ्या. वेळोवेळी त्यात वाढ करा.
  • आपल्या गरजेनुसार वार्षिक उत्पन्नच्या २ ते ३ पट रकमेचा मेडिक्लेम घ्या. यात उपलब्ध रायडर्सचा वापर करा.
  • आवश्यकतेनुसार व ऐपतीप्रमाणे अपघात संरक्षण आणि गंभीर आजारापासून उपलब्ध संरक्षक घ्या.
  • पॉलिसी घेताना त्याचा फॉर्म स्वतः भरा त्यातील अटी वाचा. आलेली पॉलिसी तपासून पहा यातील नॉमिनेशन स्पेलींगसह तपासा. पॉलिसी सुरक्षित ठिकाणी ठेवा. शेअर्सप्रमाणे ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एका वेगळ्या खात्यावर ती आपल्याला घेता येते. जर ती आपल्या गरजेनुसार नसल्यास किरकोळ वजावट होऊन भरलेली रक्कम ३० दिवसात परत मिळवता येते.
  • हिशोब लिहिण्याची सवय सुरुवातीपासून ठेवा आणि ठराविक अंतराने त्याचा आढावा घ्या.
  • कोणतीही जबाबदारी नसल्यास, आपल्या उत्पन्नच्या ४०% रकमेची बचत, गुंतवणूक करा. यातील उत्पन्नच्या १०% रक्कम फक्त निवृत्ती नियोजनासाठी वेगळी ठेवा. आपण करीत असलेली बचत व गुंतवणूक याची नीट माहिती करून घ्या त्यातील जोखीम माहिती असणे गरजेचे आहे. बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टीची आपल्याला गरज आहे बचतीतून निश्चित परतावा मिळतो त्यात जोखीम अत्यल्प असते, तर गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळू शकतो परंतू त्यात जोखीम जास्त असते. 
  • आपल्या गरजा आणि आवश्यकता ओळखा, त्याप्रमाणे जीवनशैलीत बदल करा. शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करा. आपल्यामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याची काळजी घ्या. यावर्षी Consumers International (CI) ही आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनांची संस्था यावर प्राधान्य देऊन जगभरात काम करीत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीची स्थापना याच हेतूने ४५ वर्षांपूर्वी झाली. तेव्हा आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरावा. आपल्या कमाईतून काही शिल्लक न राहणे किंवा त्याहून जास्त खर्च होणे हे खूप महाग पडू शकते आपले उत्पन्न पुरत नसेल तर ते कसे वाढवता येईल याचा विचार करा. थोडासा अभ्यास केल्यास अनेक किरकोळ खर्चात खूप मोठी बचत होऊ शकते.
  • घर जरूर असल्यासच घ्या नाहीतर सध्या त्याचा विचार नको. गुंतवणूक म्हणून घर घेणे खूप महागडे होऊ शकते गृहकर्ज घेतांना ते  दीर्घ मुदतीचे घ्या त्याचबरोबर आपणास परवडणाऱ्या रकमेची एक एसआयपी मल्टिकॅप फंडात सुरू करा. 

आर्थिक नियोजनासाठी ‘काकेइबो’- पारंपरिक जपानी पद्धत

  • योग्य वस्तू योग्य मूल्य’ याचा कायम शोध घेत राहा महाग ब्रॅण्डेड म्हणजे चांगले हा भ्रम डोक्यातून काढून टाका. ब्रँडेड वस्तू महागच असतात, त्याच दर्जाच्या परंतू किंमत कमी असणाऱ्या वस्तूंचा शोध घ्या. सजग व्हा.
  • कर्जाच्या सापळ्यात अडकू नका. एक किंवा दोनच्या वर क्रेडिट कार्ड घेऊ नका. त्याचे बिल वेळच्यावेळी पूर्ण भरा. यावर मिळणारे कर्ज हे महाग असते. ऑफर्स मिळण्याच्या हेतूने खर्च करू नका, आपण जेवढा खर्च सहज करू शकतो तेवढाच खर्च करण्यासाठी त्याचा वापर करा. आपला स्वतःचा पतदर्जा त्यामुळे आपोआपच वाढेल.
  • सध्याच्या नोकऱ्या अनिश्चित स्वरूपाच्या असल्याने किमान ६ महिन्याच्या खर्चाची रक्कम सहज काढता येईल अशा योजनांत गुंतवा. 
  • कोणत्याही गोष्टींच्यावरील आपल्या तीव्र प्रतिक्रिया टाळा याचा अधिकाधिक त्रास आपल्यालाच होतो. दिवसातील किमान दहा मिनिटे स्वतः साठी राखून ठेवा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी थोड्या प्रमाणात करत रहा, त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल. ‘कसली आहेत दुःख, आयुष्यातील क्षुल्लक तक्रारी त्या’  अशी भावना कायम ठेवा.
  • आपल्या घरातील चिंता नोकरी व्यवसायात व तेथील चिंता घरात यांची सरमिसळ करू नका जरूर पडल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्या.
  • सर्वांवरच विश्वास दाखवा, पण कोणावरही विश्वास ठेवू नका.

महिला दिन विशेष – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

ही यादी परिपूर्ण नाही यात भर टाकता येईल परंतू ताबडतोब सुरुवात तर करा, येत्या गुढीपाडव्याच्या आणि १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…