मी श्रीमंत कसा होऊ?
https://bit.ly/3lVjpR0
Reading Time: 3 minutes

कृती करा आणि श्रीमंत व्हा…..

मी श्रीमंत कसा होऊ?

“विचार करा आणि श्रीमंत व्हा” हे नेपोलियन हिल यांच सुप्रसिद्ध पुस्तक आहे. ज्याने वाचलं नसेल त्याला सुद्धा हे पुस्तक नक्कीच माहिती असेल. कालच्या लेखातील हिशेबाची पद्धत अनुकरण करण्यास अवघड आहे, असे जेव्हा माझ्याच घरातून मला सहा महिन्यांपूर्वी सांगण्यात आले तेव्हा मनात या पुस्तकाचा विचार येऊन गेला. हे शिर्षक वाचून कोणालाही वाटेल की, असेही आपण विचार करतच असतो मग विचार करून श्रीमंत होणार असू तर काय हरकत आहे? आपल्या प्रत्येकाच्या मनात “श्रीमंत” हा शब्द अगदी ठासून भरलाय. ज्याच्याकडे भरपूर पैसा तो श्रीमंत, ही ढोबळ व्याख्या आपल्याला शिकविली आहे.

गुंतवणूक करणे सहज शक्य असते परंतु सुलभ नसते. गुंतवणूक करतांना खालच्या भावात विकत घेणे आणि वरच्या भावात विकणे वरकरणी सोपे वाटत असले तरी बहुतांश गुंतवणूकदार याच्या बरोबर उलट करत असतात. याचं मुख्य कारण पैशांबाद्दलची भावना आणि गुंतवणूक साधनाबद्दल असलेला पूर्वग्रह निर्णय घेण्यात अडचणी निर्माण करत असतात. हे समजून घेण्यासाठी या वर्षातील ३ टप्प्यांचा अभ्यास करता येईल.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

वर्षातील तीन महत्वाचे टप्पे 

१. फेब्रुवारी २०२०-

  • पहिला टप्पा होता फेब्रुवारी २०२०चा. ज्यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात पसरण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. 
  • त्यावेळी काही गुंतवणूकदारांच्या मनावर भितीचा आणि चिंतेचा पगडा होता. तर सक्षम गुंतवणूकदारांना ती संधी वाटत होती. 

२.  मार्च २०२०-

  • दुसरा टप्पा होता मार्च २०२०चा. त्या महिन्यात शेअर बाजाराने तळ गाठला आणि गुंतवणूकदारांची मानसिकता पूर्णपणे बदलली. 
  • धरणीकंप झाल्यावर जीव वाचविण्याच्या आशेने माणूस सगळं सोडून पळतो. त्यापेक्षाही अधिक वेगाने गुंतवणूकदार गुंतवणूकीचे व मालमत्ता विभाजनाचे मुलभूत नियम विसरून मिळेल त्या भावात विक्री करत सुटले होते. 

३. जुलै-ऑगस्ट २०२०-

  • तिसरा टप्पा होता जुलै-ऑगस्ट २०२०चा. त्या महिन्यात बाजाराने नवीन उच्चांक गाठला होता. पण त्यावेळी खरी चिंता होती नव गुंतवणूकदारांची. कारण ऐकीव मानसिकता (हर्ड मेंटॅलीटी) ही नेहमीच घातक असते.
  • सुरुवातीला मिळालेला परतावा पाहून हे आरंभशूर मोठया जोखीमा घेण्यास कचरत नव्हते. तिसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांनी बरोबर उलट कृती केली. वरच्या भावात घेणे व खालच्या भावात विकणे.

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

स्वयंशिस्तीचे महत्व:

  • मी श्रीमंत कसा होऊ? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतो. श्रीमंती तुम्हाला समृद्धीकडे नेत असते. ज्याच्याकडे खूप पैसा, स्थावर मालमत्ता व सर्व प्रकारची विपुलता असते तो श्रीमंत नक्कीच असतो, परंतु समृद्ध किंवा समाधानी असेलच असे नाही. 
  • श्रीमंती कमविता येते पण समृद्धी मिळविण्यासाठी सजगपणे कृती करावी लागते. श्रीमंती डोळ्यांना दिसू शकते आणि समृद्धी वर्तनातून झळकत असते. 
  • तुम्हाला स्वयंशिस्त लावायची असल्यास पुढील गोष्टी मनापासून वाचा कदाचित तुमचे पूर्वग्रह बदलण्यास मदत होईल.

मी श्रीमंत कसा होऊ? 

१. संयम ठेवणे आणि संधीच्या फांदीचा शोध घेणे.

  • राहुल द्रविड आपल्या सर्वांनाच माहित आहे. क्रिकेट जगातात कसोटी प्रकारात सर्वात जास्त चेंडूंचा सामना केलेला फलंदाज म्हणून त्याच्या नावावर विश्वविक्रम आहे.
  • किती? ३१,००० चेंडू राहुल द्रविडने खेळून काढले आहेत. त्यापैकी २३,००० निर्धाव गेले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुलने तरीदेखील १०,००० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.
  • राहुल द्रविडकडून शिकण्यासारखे म्हणजे जास्तकाळ संयम ठेवणे आणि संधीच्या फांदीचा शोध घेणे.

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह…..” 

. तैयारी तो करनी पडेगी… 

  • तुम्ही बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंदचे आत्मचरित्र वाचा. त्यात विश्वनाथन आनंद प्रत्येक सामना खेळण्यापूर्वी किती समर्पण भावनेने तयारी करतो याचं वर्णन दिलं आहे.
  • तो इतर महान खेळाडूंचे सामने बघतो. त्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे विश्लेषण करून स्वतःची निर्णय क्षमता विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
  • विश्वनाथन आनंद कडून शिकण्यासारखे म्हणजे तैयारी तो करनी पडेगी… 

३. नोंद ठेवा :

  • माझे मित्र अजीत गुंजाळ यांना सायकलिंगचं वेडं आहे. गेल्या ६९६ दिवसांपासून अखंडपणे दररोज सायकल चालवितात.
  • त्याचा सर्व डेटा त्यांनी मोबाईल मधल्या उपयोजनात साठवून ठेवला आहे. त्यांचं हे वेड कदाचित त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड पर्यंत नेईल.
  • अजीत गुंजाळ काय शिकवितात? तुम्ही दररोज जे करताय त्याची नोंद ठेवा. कदाचित ठरवलेल्या ध्येयापेक्षा जास्त प्राप्ती होईल.

आपण जे काही करतो ते का करत आहोत? असा प्रश्न स्वतःला विचारा. या प्रश्नाचे जे काही उत्तर येईल ते तुमचे ‘मूल्य’.

अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.