Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फ़ंडात पैशांची गुंतवणूक करताना त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे गरजेचे असते. यामधील गुंतवणुकीसाठी आर्थिक ज्ञानासोबतच शेअर बाजारासंदर्भात जागरूकता असणे गरजेचे असते. म्युच्यअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.

म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक करताना आर्थिक उद्दिष्टये ठरवून घ्यायला हवीत कारण फंडातील गुंतवणुकीचा पाया हा आर्थिक उद्दिष्टये असतात. आपण ज्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणार आहेत त्याची माहिती असणे गरजेचे असते.

म्युच्युअल फंडाच्या जाहिराती टीव्हीवर वेळोवेळी दाखवल्या जातात. यामधील गुंतवणुकीसाठी आर्थिक ज्ञान आणि शेअर बाजाराविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे. फंडात गुंतवणूक करायची असेल तर सर्वसाधारणपणे तुम्ही २ पद्धतींनी गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये निधी व्यवस्थापकाकडून म्युच्युअल फंडाची नियमितपणे खरेदी करू शकता किंवा तुम्ही स्वतः म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

म्युच्युअल फंडातील कामगिरीचे मूल्यांकन कसे करावे ते आपण खालील माहितीच्या आधारे समजून घेऊया-

१. गुंतवणुकीची उद्दिष्टये ठरवून घ्या

गुंतवणूक करत असताना आपली नेमकी उद्दिष्टये कोणती आहेत याचा विचार करा. मुलांच्या शिक्षणाची सोय किंवा निवृत्ती नियोजन असे उद्दिष्ट्य तुमच्या म्युच्युअल फ़ंड गुंतवणुकीचा मूळ पाया ठरत असतो. आधी तुम्ही तुमची उद्दिष्टये ठरवलीत आणि नंतर त्यानुसार गुंतवणुकीला सुरुवात केली तर ते सोपे होते. आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत असताना आपली उद्दिष्टये व गुंतवणुकीतून मिळालेला परतावा तुम्ही तपासायला हवा.

२. जोखमीच्या तुलनेत परतावा –

प्रत्येक इक्विटी आधारित म्युच्युअल फ़ंडाला बाजार आणि उद्योगाशी निगडित जोखमींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या फंडांमधून जोखमीच्या काळात पण चांगला परतावा दिला जातो. त्यालाच जोखीम समायोजित परतावा असेही म्हटले जाते.

३. फंडातील निधीची रचना –

म्युच्युअल फंड कंपनी सेवा देत असताना त्याबदल्यात शुल्क आकारत असते. फंड निवडण्यापूर्वी त्याची यापूर्वी झालेल्या कामगिरीचा आढावा घ्यायला हवा. जास्त शुल्क असलेला म्युच्युअल फंड चांगला आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी. पण फंडाची निवड करताना इतर गोष्टींचा तपास करणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणुकीतून तोटा उदभवण्याची शक्यता कमी होते.

४. म्युच्युअल फंडाचा पूर्वेतिहास तपासूनच गुंतवणूक करा –

म्युच्युअल फंडाची भूतकाळात झालेली कामगिरी भविष्यात होईलच असे नाही. फंडाच्या कामगिरीची आकडेवारी तपासा म्हणजे त्या म्युच्युअल फ़ंडातून भविष्यात किती परतावा मिळू शकतो याबद्दल तुम्ही  शकता. तुम्हाला स्वतःला ते शक्य होत नसेल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. कमी जोखीम असलेला पण चांगला परतावा देणारा फंड शोधायला हवा.

नक्की वाचा : नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का?

५. शेअर निर्देशांकाच्या तुलनेत उत्तम कामगिरी हवी –

निर्देशांकातील निफ्टी, सेन्सेक्स आणि  बीएसई २०० यांनी बेंचमार्क ठरवून दिलेले असतात. फंडांच्या सर्व कामगिरीचे मूल्यमापन याच बेंचमार्कच्या आधारावर केले जाते. चांगला फंड हा मार्केट खाली गेल्यावर पण तोट्यात जात नाही. कारण त्याचे व्यवस्थापन त्याप्रकारे निधी व्यवस्थापकाने केलेले असते.

६. फ़ंडाच्या कामगिरीचा मागोवा घेणे –

म्युच्युअल फंडाची भूतकाळात झालेली कामगिरी भविष्यात पुनरावृत्ती होईलच असे नाही. तुम्हाला म्युच्यअल फ़ंडातून खात्रीशीर परतावा मिळत नसतो. दीर्घकाळ म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून ठेवले तर त्यामधून चांगला परतावा मिळतो.
मागील वर्षी किती परतावा मिळाला होता याच्या पलीकडे तुम्ही विचार करायाला हवा. यासाठी गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे वेळोवेळी निरीक्षण केले तर त्यातून तुम्हाला निर्णय घेणे सोपे पडते. शेअर बाजारात चढ उतार चालूच असतात. त्यामुळे गुंतवणुकीवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

फंडाच्या कामगिरीचे किती वेळा मूल्यमापन करावे?

शेअर बाजारात चढ उतार चालू असतात. त्यामुळे फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीत करावे. कमी कालावधीत फंडाची कामगिरी पहिली तर त्यातून मिळणारा परतावा आणि त्याच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करता येत नाही. तुम्ही आर्थिक सल्लागारामार्फत म्युच्यअल फंडात गुंतवणूक केली तर तुमची  आर्थिक उद्दिष्टये विचारूनच व तुमची जोखीम क्षमता विचारात घेऊन गुंतवणूक करण्याचा ते सल्ला देतात.

१. पोर्टफोलिओ होल्डिंग्ज

म्युच्युअल फंड कंपनीच्या शेअर पोर्टफोलीओ मधील शेअर्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही निवडलेल्या फंडामध्ये चांगले शेअर्स असतील तर दीर्घकाळाने का होईना ते चांगला परतावा देतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या आधी तुमची आर्थिक उद्दिष्टये भविष्यात मिळणाऱ्या परताव्यातून पूर्ण होतील का नाही यावर लक्ष ठेवायला हवे.

२. बेंचमार्क

फंडाच्या कामगिरीची बेंचमार्कशी म्हणजे सेन्सेक्स किंवा निफ्टीशी तुलना करणे गरजेचे असते कारण एखाद्याने ठरवलेल्या बेंचमार्कपेक्षा फंड चांगली कामगिरी केली तर आर्थिक उद्दिष्टये लवकर पूर्ण होतात. बेंचमार्क आणि म्युच्युअल फंड यांचा ताळमेळ जुळून येणे गरजेचे असते.

नक्की वाचा : म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

३. शार्प रेशो

फंडाची गुंतवणूक करत असताना तुम्ही जास्त जोखीम घेतली असेल तर तुम्हाला मिळणार परतावा हा जास्त असावा. शार्प रेशो हा तुम्ही घेतलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भात तुमचा परतावा मोजतो. उच्च शार्प रेशो मध्ये तुम्ही जास्त जोखीम न घेता जास्त परतावा मिळवून देतो. तुम्हाला किती जास्त परतावा मिळाला हे शार्प रेशोंतून समजते.

४. खर्चाचे प्रमाण

फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर खर्चाचे प्रमाण माहित असणे गरजेचे असते. फंड व्यवस्थापक आणि आणि फंड व्यवस्थापन शुल्क किती आहे याबद्दल गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती ठेवावी.

५. आर्थिक गुणोत्तर आणि निधी कामगिरी

फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या संदर्भातील माहिती मिळवून तिचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्ही फंडात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या कामगिरीचा मागोवा घेणे गरजेचे असते. त्यासाठी फंड फॅक्ट शीट वापरणे गरजेचे आहे. याच्या मदतीने फंड हाऊसकडून व्यवस्थापित केलेल्या योजनांची कामगिरी दाखवली जाते.

लक्षात ठेवा – सातत्यपूर्ण पद्धतीने म्युच्यअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत गेलात तर त्यामधून मिळणारा परतावा नेहेमीच जास्त असतो.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.