Reading Time: 3 minutes

जगप्रवास! ज्याला आपण ‘वर्ल्ड टूर’ म्हणतो, ती करणं जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. कारण एखाद्या काल्पनिक कथेप्रमाणे जादू होईल आणि आपण अवकाशात उडत जाऊ किंवा त्या जाहिरातीप्रमाणे ‘बॅग भरो और निकल पडो ‘असं  हे निश्चित होणार नाही. ‘वर्ल्ड टूर’ ला जायचं तर, उत्तम नियोजन करावे लागणारच. 

ट्रिपला जाताना काही गोष्टींची पूर्व तयारी असणे केव्हाही चांगले, मग जर परदेशात फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसं टुरिस्ट कंपनीसोबत जाणार असाल तर, फार काही तयारी करावी लागत नाही. पण स्वतः नियोजन करून जाणार असाल तर, अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अर्थात स्वतः नियोजन करून ठरवलेली सहल खूपच स्वस्त पडते. तुम्हाला या कामात मदत करण्यासाठी व तुमची विदेश सहल जास्त आनंदायी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

१. ट्रीपसाठी एखादे ठिकाण निवडा व त्याची माहिती काढा –

  • ट्रिपचे ठिकाण निवडणं हे तसं कठीण काम! सोशल मीडिया, इंटरनेट किंवा मित्रमंडळींच्या ट्रिपचे फोटो बघून प्रत्येक ठिकाण सुंदर वाटतं. परंतु, आपल्याला नक्की कसली आवड आहे विचार करून ठिकाण ठरवावं. 
  • उदा. आपल्याला साहसी ठिकाणं (Adventures), समुद्रकिनारा, हिल स्टेशन, ऐतिहासिक ठिकाणं, इत्यादी यापैकी कसली आवड आहे, आपलं बजेट, हातातला वेळ, हवामान या साऱ्याचा विचार करून ठिकाण निवडा.
  • गोंधळून न जाता ठिकाण निवडावे व त्यादृष्टीने तयारी करावी. ठिकाण कुठे व कोणते आहे यावर तुमचं नियोजन करता येते. कारण नुसतेच साऊथ अमेरिकेत कुठेतरी चाललो आहे असं सांगून भागत नाही तर  ‘कार्टेजेना’ मधील ‘कोलंबिया’ला जायचं आहे, असं ठरवलं की नियोजन करायला सोपं होतं.
  • निश्चित केलेल्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घ्या. जिथे जात आहोत त्या देशातील चालू घडामोडी मग त्या नैसर्गिक असो किंवा सामाजिक अथवा राजकीय परिस्थिती साऱ्याचा संपूर्ण आढावा घ्या. 

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

२. ट्रीपचा कालावधी आणि प्रवास कसा करणार आहेत ते निश्चित करा – 

  • आपली ट्रीप किती दिवसांची आहे, त्यावरून तिथे लागणारे पैसे ,बॅगपॅकिंग, आपलं बजेट, प्रवासाचा खर्च या सगळ्या गोष्टी ठरवता येतात. म्हणून ट्रीप किती दिवस आहे हे निश्चित करा. 
  •  ट्रीपसाठी कुठे आणि किती दिवस जायचं हे ठरवणं चांगल्या ट्रिपसाठी महत्वाचं आहे . 

३.आपलं बजेट निश्चित करा –

  • ट्रिपचे ठिकाण आणि कालावधी ठरला कि त्या ठिकाणी एकूण पैसे किती लागू शकतात याचे नियोजन करा. 
  • परदेशी सहलींसाठी कर्ज देखील मिळते पण जर तुमचे आधीपासूनच आर्थिक नियोजन असेल, तर अधिक उत्तम. 
  • प्रवासाची पद्धत आणि आपलं बजेट यानुसार पैसे सोबत ठेवा. उदाहरणार्थ तुमचं एका महिन्याचं बजेट ३०,०००/- रुपये  एवढं आहे, तर तुमचं रोजचं १,००० रुपये बजेट असेल. 
  • ट्रीपला जाण्याचं पक्क केलं की प्रवासासाठी असणारे ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड ‘ मिळवता येते ज्याद्वारे तुम्ही कॅशलेस व्यवहारही करू शकता. पण जर तुम्हाला लागणारे खर्चाचे पैसे रोख स्वरूपात जवळ ठेवले, तर काही बँकांच्या क्रेडिट कार्ड वापरावर आकारली जाणारी फी तुम्ही वाचवू शकता.  

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

४. विमानाची तिकिटे व हॉटेल्सचे बुकिंग मिळवा –

  • विमान तिकीट हा आपल्या परदेशी सहलीचा अतिशय महत्वाचा विषय आहे. हल्ली वेळेअगोदरच विमानाचं बुकिंग केल्यास बरीच सवलत मिळते. 
  • क्रेडिट कार्ड वरून तसेच ,काही वेबसाइट्स ,वेगवेगळे डिजिटल वॉलेट्स वापरून बुकिंग केल्यास काही आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेऊन बरीच बचत करता येते. ‘
  • गूगल फ्लाईट्स’, ‘एअरट्रेक्स’ ,’द फ्लाईट डील’ ,’स्काय-स्कॅनर’ ,’हॉलिडे-पायरेट्स’ यासारख्या साईट्स वरून बुकिंग करता येते. तसेच हॉटेल्सचे बुकिंग करताना स्वस्त पर्यायांसाठी ट्रीव्हायगो सारख्या साईट्स वापराता येतील.   

५. ट्रीपसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता –

  • परदेशात सहलीसाठी जाताय, तर बरोबर महत्वाची कागदपत्रे असायलाच हवीत. तुमच्याकडे पासपोर्ट नसेल, तर त्वरित बनवून घ्या आणि जर पासपोर्ट असेल, तर त्याची वैधता तपासून पहा.  पूर्वी पासपोर्ट तयार करण्यासाठी एक महिन्याचा काळ लागत होता मात्र आता अर्जेन्ट पासपोर्ट देखील मिळतो.  
  • परदेश ट्रीपसाठी पासपोर्टनंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे ‘व्हिसा’. या ट्रीपसाठी तुमच्याकडे व्हिसा असणे बंधनकारक आहे. प्रत्येक देशातील व्हिसाच्या अटी वेगळ्या आहेत. तुम्ही ज्या देशातून व्हिसा काढला आहे त्यावर ते अवलंबून असते. 
  • यांनतर प्रवासाची व विमानाची सर्व तिकिटे जवळ ठेवा . तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असेल, तर सोबत ठेवा. आजारपणाची काही कागदपत्रे किंवा प्रवास विमा कागदपत्रे असल्यास जवळ ठेवा. आपली सर्व कागदपत्रे व ओळखपत्रे जवळ ठेवा.  
  • खरेदी किंवा इतर सेवांचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड’ असल्यास जवळ बाळगा.  

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

६. मोबाइल मध्ये गरजेचे ‘ट्रॅव्हल अँप्स’ डाउनलोड करून घ्या –

  • हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलद्वारे करता येत नाही अशी कुठलीही गोष्ट नाही.
  •  तुमच्या मोबाईल मध्ये काही अँप्लिकेशन्स डाउनलोड करून ठेवा ज्याद्वारे प्रवासाचे नियोजन ,दिशा, तेथील नकाशे, वातावरणीय बदल या सगळ्यांची माहिती मिळू शकते व तुमचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल.

७. सोपी विदेशी वाक्ये लक्षात घ्या –

  • ज्या देशात जायचं त्या देशातील भाषेतील भाषेतील वाक्य बोलण्यासाठी व समजण्यासाठी फारशी कठीण नसतात. ‘हॅलो’,’हाऊ आर यू’, ‘थँक यू’ सारखे सामान्य शिष्टाचार पाळण्यासाठी अशी काही वाक्य कमी येतात. 
  • तसेच यामुळे तेथील स्थानिक लोकांशी काही अडचण आल्यास किंवा एखादे ठिकाण शोधण्यासाठी मदत घेण्यासाठी संभाषण होण्यासाठी मदत मिळते.   

८ प्रवासात लागणाऱ्या इतर महत्वाच्या गोष्टी –

  • मोबाइल चार्जर्स, आपल्या आठवणी जपून ठेवण्यासाठी कॅमेरा किंवा आयपॅड, ट्रेकिंगसाठी जात असाल, तर लागणारे साहित्य, हेडफोन्स, सनग्लासेस, छत्री, पुस्तके आणि मासिके अशा गोष्टी सोबत ठेवा. पण प्रवासाची बॅग भरताना ती अधिक जड होणार नाही याचीही काळजी घ्या. 

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

वर दिलेल्या सर्व गोष्टींनुसार आपल्या परदेशी सहलीचे नियोजन करा व प्रवास अधिक सुखकर करा .

शुभ यात्रा !! 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…