Reading Time: 2 minutes

आजकाल बँकेत कर्ज घेण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. कर्जदाराच्या बाबतीत अनेक गोष्टी तपासल्या जातात. यात सिबिल स्कोअर हा शब्द अनेकांना भीतीदायक वाटणारा तर काहीजणांना तो आशादायी वाटतं असतो. भीतीदायक यासाठी की जर सिबिल स्कोअर हा कमी असेल तर त्याचा गंभीर परिणाम कर्ज घेताना होतो. सोबतच आपले कर्ज देखील नामंजूर होण्याचा धोका असतो. त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. सिबिल स्कोअर हा क्रेडिट ब्युरोकडून मोजला जातो. 

सिबिल स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी अविभाज्य घटक असतो. त्यामुळे तो चांगलाच असायला हवा. अशावेळी जर आपण काही चुकीची माहिती क्रेडिट ब्युरोला दिल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होतो. सिबिल स्कोअरच्या बाबतीत जे काही वाद-विवाद असतील ते आपण काही फॉर्म भरून मिटवू शकतो. मात्र अनेक ग्राहकांना याबाबतीत माहितीच नसल्याने त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होत राहतो. क्रेडिट स्कोअर बाबत कोणते वेगवेगळे वाद विवाद आहेत आणि ते कसे दूर करायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

क्रेडिट स्कोअर बाबतीत खालील काही त्रुटी असू शकतात –

१. व्यक्तिगत माहिती चुकीची भरणे –

  • क्रेडिट ब्युरोकडे जर आपल्याबद्दल काही चुकीची माहिती असेल तर कर्जदाराला कर्ज घेताना अडचण येते. 
  • वैयक्तिक माहितीत चुकीचा पत्ता, आपले नाव बरोबर नसणे आणि इतरही गोष्टींचा समावेश होतो. 
  • काही वेळा एकाच कर्ज खाते अहवालात आपला सिबिल स्कोअर दोनदा दाखवला जातो. अशावेळी क्रेडिट स्कोअरच्या संबंधित सिबिल विवाद फॉर्म भरून या गोष्टी व्यवस्थित करता येतात.  

२. कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या बाबती चुकीची माहिती भरणे –

  • कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या बाबत अनेकदा क्रेडिट स्कोअरमध्ये काही चुकीची माहिती आढळते. याला सोप्या भाषेत कंपनी विवाद अस म्हटले जाते. 
  • अशा विवादांमध्ये मालकाचे चुकीचे तपशील, डुप्लिकेट बँक खाते, अयोग्य माहिती इत्यादींचा समावेश होतो. अशा विवादांपासून वाचण्यासाठी कंपनीची अधिकृत सही असणारा सिबिल फॉर्म आपल्याला भरावा लागतो. 

नक्की वाचा : या १० मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर 

३. सिबिल स्कोअरबाबत सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर विवाद मांडा –

  • सिबिल स्कोअरच्या बाबतीत माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास आपण ऑनलाईन प्रक्रियेचा आधार घेऊ शकतो. यासाठी https://myscore.cibil.com वर खाते उघडावे लागते. 
  • जर तुमचे पहिलेच खाते असेल तर तुम्हाला तुमच्या लॉगइन डिटेल्सचा उपयोग करावा लागतो. एकदा तुम्ही लॉगइन केले की पुढची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येते. 
  • यानंतर ‘क्रेडिट रिपोर्ट’ या ऑप्शनवर जाऊन करून ‘विवाद केंद्र'(Dispute Center) वर क्लिक करावे. 
  • यानंतर ‘विवाद एक आयटम'( Dispute an Item) वर क्लिक करून आपण फॉर्म भरण्यास सुरुवात करतो. आपल्या ओळखीचा तपशील देण्यासाठी आपल्याला आपल्याला दुरुस्तीसाठीचे आवश्यक दस्ताऐवज पर्याय निवडावा लागतो. 
  • तुमच्याकडे एकापेक्षा जास्त दुरुस्तीसाठी असणारे दस्ताऐवज असल्यास तुम्हाला ‘+’ या चिन्हावर क्लिक करावे. सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. 

नक्की वाचा : क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर त्याचा खरंच फायदा होतो का? 

४. सिबिल संदर्भातील कंपनी विवाद मिटवण्यासाठी केले जाते निराकरण –

  • सिबिल स्कोअर बाबतीत कंपनी संदर्भातील विवाद मिटवण्यासाठी TransUnion CIBIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यामध्ये कंपनी विवाद निराकरण या पोर्टलवर क्लिक करावे. 
  • यानंतर ‘Raise an online dispute’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक विवाद फॉर्म भरावा. शेवटी कॅप्चा टाकून फॉर्म सबमिट करून टाका. 

५. सिबिल स्कोअर संबंधित विवाद ऑफलाईन पद्धतीने हाताळण्यासाठी खालील पद्धती लक्षात ठेवा – 

  • ट्रान्सयुनियन सिबिलला पत्र लिहून ऑफलाइन सिबिल विवाद बाबत आपण फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. यासाठी ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड, वन इंडियाबुल्स सेंटर, टॉवर 2A, 19 वा मजला, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई – 400 013 या पत्त्यावर पत्र लिहून आपण प्रश्न विचारू शकता. 
  • सिबिल विवाद संबंधी ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म “विवाद अंतर्गत” मोडमध्ये जातो. 
  • यानंतर सिबिलकडून फॉर्मची पडताळणी केली जाते आणि विवादाचा प्रकार लक्षात घेऊन योग्य कर्जदाराकडे पाठवला जातो. 
  • यानंतर फॉर्म स्वीकारला जातो किंवा काही वेळेस त्यामध्ये त्रृटी असल्यास त्याचा स्वीकार केला जात नाही. CIBIL विवाद निराकरण प्रक्रियेचा एकूण टर्नअराउंड वेळ ३० दिवस इतका आहे. 

निष्कर्ष  –

  • क्रेडिट संस्था तुमच्या सिबिल अहवालात थेट कोणतेही बदल त्यांच्या मनाने करू शकत नाही. 
  • तुमचा सिबिल अहवाल संबंधित क्रेडिट संस्थेद्वारे अधिकृत आणि प्रदान केल्यानंतरच अपडेट केला जातो, त्यामुळे सिबिल स्कोअर व्यवस्थित व्यवस्थित ठेवा. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…