Reading Time: 3 minutes

क्लाउड किचन पद्धतीने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम केला आहे. अन्न उद्योगामध्ये नेहमीच नवीन संकल्पना येत असतात. उद्योग जगतामध्ये क्लाउड किचन पद्धतीमुळे रोजगाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही संकल्पना या लेखातून आपण समजून घेणार आहोत. 

क्लाउड किचन पद्धत म्हणजे काय?

 • क्लाउड किचन पद्धत म्हणजे मोठे हॉटेल नसते, झकपकित वेटर नसतात की सजवलेले फर्निचरही ठेवलेले नसते. या किचनमध्ये तुमच्या मागणीनुसार जेवण बनवून दिले जाते. क्लाउड किचनमध्ये  फक्त डिलिव्हरी ऑर्डर स्वीकारली जाते. 
 • ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप्स  किंवा संबंधित हॉटेलच्या ऑनलाईन अँपवरून जेवणाची डिलिव्हरी मागवू शकतात. 
 • ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यावर योग्य वेळेत अन्न बनवून त्याची ऑर्डर पोहोचवणे गरजेचे असते. सरासरी एका तासामध्ये क्लाउड किचन ६० ऑर्डर पूर्ण करून देते असा अभ्यास सांगतो. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार ऑर्डरचे प्रमाण वाढत आहे. 
 • क्लाउड किचनमध्ये एकाच ठिकाणी अनेक पदार्थ बनून डिलिव्हरी दिली जाते, त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. हॉटेलच्या तुलनेत क्लाउड किचनला लागणारा खर्च कमी असतो, त्यामुळे क्लाउड किचन चालवणाऱ्याला क्लाउड किचन व्यवसायातून चांगला नफा मिळतो. 

क्लाउड किचन व्यवसाय मॉडेल 

सर्वच क्लाउड किचन मध्ये सारख्याच प्रकारची मांडणी असते. ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर अन्न तयार केले जाते. त्यानंतर त्याची डिलिव्हरी दिली जाते. क्लाउड किचनच्या डिलिव्हरी पद्धतीनुसार वेगवेगळॆ व्यवसाय मॉडेल तयार करण्यात आलेले आहेत. 

क्लाउड किचन पद्धतीमध्ये प्रकार असून त्याबद्दलची माहिती समजून घेऊयात. 

१. स्टँडअलोन क्लाउड किचन 

 • स्टॅन्डअलोन क्लाउड किचन मध्ये स्वयंपाकघराची मालकी स्वतःची असते किंवा व्यवसायासाठी जागा भाड्याने दिली जाते. या प्रकारची किचन शक्यतो एकच प्रकारच्या अन्न पदार्थांवर लक्ष केंद्रित करत असतात. 

२. मल्टी-ब्रँड क्लाउड किचन 

 • मल्टी ब्रँड क्लाउड किचनच्या अंतर्गत अनेक ब्रँड एकाच छताखाली येऊन क्लाउड किचन चालू करतात.
 •  मल्टी ब्रँड क्लाउड किचन मध्ये ऑपरेशनल खर्च कमी ठेवतात, प्रत्येक ब्रँडचे पदार्थ वेगेवेगळे असतात. 

३. कमिशनरी क्लाउड किचन 

 • रिकाम्या जागा किंवा हॉटेल भाड्याने घेऊन कमिशन किचनची स्थापना केली जाते. 
 • अनेक लहान लहान क्लाउड किचन मोठ्या स्वयंपाकघरात एकत्र येऊन काम करू शकतात.

४. आउटसोर्स क्लाउड किचन 

 • आउटसोर्स क्लाउड किचन मध्ये सर्व पदार्थ आउटसोर्स करून बनवून घेतले जातात.
 • बाकी सर्व ऑपरेशन्स अन्न तयार करण्यापासून ते बनवण्यापर्यंत आउटसोर्स करून घेतले जाते. 

५. को वर्किंग क्लाउड किचन 

 • को वर्किंग क्लाउड किचन पद्धत आहे. या पद्धतीमध्ये सुसज्ज स्वयंपाकघराला भाड्याने घेतले जाते.
 •  या स्वयंपाकघराच्या जागा मोक्याच्या ठिकाणी असून अनेक ब्रँडसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर बनवण्यात आली आहेत.

नक्की वाचा : तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकले नाहीत ना?

क्लाउड किचनचे फायदे  

 

१. कमी ऑपरेशनल खर्च

 • क्लाउड किचनचा प्रमुख फायदा म्हणजे त्यासाठी कमी ऑपरेशनल खर्च लागतो. 
 • या किचनमध्ये पारंपरिक किचनसाठी लागणाऱ्या सुविधा काढून टाकलेल्या असतात. त्यामुळे क्लाउड किचनचा खर्च परवडण्यासारखा असतो. 

२. कमी गुंतवणुकीमधील व्यवसाय 

 • अगदीच कमी गुंतवणुकीमध्ये क्लाउड किचनची सुरुवात करता येते. क्लाउड किचनमध्ये कमी कर्मचारी आणि पायाभूत सुविधांसह सुरुवात करावी लागते. 
 • याची सुरुवात करण्यासाठी गुंतवणूक अतिशय कमी लागते. 

३. कमी वेळ आणि मानवी संसाधनांची गरज 

 • पारंपरिक किचन किंवा हॉटेलपेक्षा क्लाउड किचन कमी जागेत उभारले जाऊ शकते. त्यामुळे कमी वेळ लागतो. 
 • क्लाउड किचनमध्ये ऑर्डरप्रमाणे अन्न बनवले जात असल्यामुळे तिथे संसाधनांची गरज अतिशय कमी लागते. कमी माणसांमध्ये व्यवस्थित चालू शकते. 

४. जास्त नफ्याचा उद्योग 

 • क्लाउड किचन सुरु करताना अतिशय कमी गुंतवणूक करावी लागते. जास्त सजावट नाही, कर्मचाऱ्यांचा खर्च नाही आणि फर्निचरची गरजच लागत नाही. 
 • त्यामुळे कमी पैशांमध्ये चांगल्या नफ्याचा क्लाउड किचन हा पर्याय आहे. गरजेपुरत्या साधनांमध्ये त्याची सुरुवात करता येते. 

५. विस्तार वाढवण्याची शक्यता 

 • क्लाउड किचन मध्ये किचन असणे सर्वात महत्वाचे असते. यामध्ये व्यवसाय विस्तार करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. 
 • मोठ्या हॉटेलपेक्षा क्लाउड किचनमधील सेवा सुविधा देताना खर्च कमी येतो. 
 • कमी खर्चामध्ये क्लाउड किचनचा विस्तार वाढवून त्याच्यामार्फत काम केले जाते. 

क्लाउड किचनचे तोटे 

१. ब्रँड उभा करणे 

 • मर्यादित ग्राहकांसोबत ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे क्लाउड किचनला ब्रँड उभा करताना अडचणी येतात. ऑनलाईन मार्केटपुरतेच क्लाउड किचनचा ब्रँड तयार होत आहे.
 •  ग्राहक नियमित राहतील का नाही याची शाश्वती नसते. 

२.ऑनलाई अँप्सचे कमिशन 

 • क्लाउड किचन मध्ये ऑनलाईन माध्यमातून अन्नाचे वितरण करत असताना झोमॅटो किंवा स्विगी अँप्सचा वापर केला जातो. त्या अँप्सच्या माध्यमातून विक्री करताना १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत कमिशन आकारले जाते. 
 • प्रत्येक वेळी कमिशन द्यावे लागत असल्यामुळे जास्त कालावधीकरता या ऑनलाईन अँप्सच्या माध्यमातून विक्री करणे जमेल का नाही याबाबत शाश्वती वाटत नाही. 

३. ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावरील डेटा 

 • क्लाउड किचनच्या ऑनलाईन अन्नाच्या डिलिव्हरी शक्यतो स्विगी आणि झोमॅटो या अँप्सच्या  माध्यमातून विक्री केले जाते. त्यामुळे ग्राहकांच्या माहितीचा डेटा हा या अँप्सकडेच राहतो. 
 • खरे ग्राहक कोण आहेत हे न समजल्यामुळे त्याचा विक्रीवर परिणाम होतो. त्यामुळे कमीत कमी ग्राहक टिकवून ठेवले जातात.

क्लाउड किचन पद्धतीमुळे अनेक महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून स्वतःचे ऑनलाईन नेटवर्क तयार करून त्यामाध्यमातून व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक जणांनी एकत्र येऊन स्विगी , झोमॅटो सारखे फूड डिलिव्हरी अँप्लिकेशन्स तयार केले तर चांगल्या प्रकारे उद्योगाची वाढ होऊ शकते. 

नक्की वाचा : तुमचे आर्थिक बजेट कोलमडण्याची ही आहेत ६ कारणे 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.