ITR
https://bit.ly/2XjBez2
Reading Time: 2 minutes

आयटीआर (ITR) 

दरवर्षी 31 जुलैपर्यंत भराव्या लागणाऱ्या आयकर रिटर्नसाठी (ITR) यावेळी  मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधी 30 नोव्हेंबर त्यानंतर  31 डिसेंबर आणि आता 10 जानेवारीपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. पण आता अजून मुदतवाढ मिळेल या आशेवर राहून ही “डेडलाईन” चुकवू नका. कारण 10 जानेवारीपर्यंत आयकर रिटर्न न भरल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट दंड भरावा लागेल. नागरिकांनी आपला आयटीआर वेळेवर दाखल करावा यासाठी यासंदर्भातील तरतूद 2017 च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

आयकर कायदा 1961, कलम 234 एफ

  • आयकर कायदा 1961,  कलम 234 एफ नुसार, मुदतीनंतर परंतु, 31 डिसेंबरपूर्वी आयकर रिटर्न (ITR) भरल्यास 5 हजार रुपये आणि त्यानंतर आयटीआर दाखल केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावला जातो. 
  • यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुळातच 31 डिसेंबरपर्यंत आणि आता १० जानेवारीपर्यंत मुदत वाढ  देण्यात आलेली  असल्याने, दिलेल्या मुदतीत आयकर रिटर्न न भरल्यास आधीच्या दुप्पट म्हणजेच  १० हजार रुपये दंड भरावा लागेल. 
  • कलम 23 एफ नुसार, ज्यांचे वित्तीय वर्षातील उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी मुदतीच्या कालावधीमध्ये आयकर रिटर्न दाखल न केल्यास १०,००० रुपये शुल्क आकारले जाईल. ज्यांचे उत्पन्न  रु. 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना रु.1000  पर्यंत दंड आकारण्यात येईल. 

हे नक्की वाचा: ITR: आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

ITR: कसा भराल आयटीआर?

  • आयटीआर भरण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आयटीआर भरणे. 
  • यासाठी सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा. आगोदर रजिस्टर केलेले असल्यास युजरनेम आणि पासवर्डच्या साहाय्याने लॉग इन करा. 
  • यांनतर e filing चा फॉर्म ओपन होईल. जर नोकरदार असाल तर तुमच्या ऑफिसकडून मिळालेल्या फॉर्म 16 नुसार फॉर्म भरा.
  • फॉर्ममधील माहिती व्यवस्थित असल्याची खात्री करून फॉर्म सबमिट करा.
  • केवळ फॉर्म भरून झाला म्हणजे आयटीआर भरून झाला असा अर्थ होत नाही. यासाठी तुम्हाला आयटीआर व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
  • तुमचा मोबाईल आधार कार्डला जोडला गेलेला असल्यास आधार कार्डच्या आधारे तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता.
  • यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी वरून तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण होते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: ITR deadline Marathi, Section 234 F Marathi, ITR Deadline and Fine Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…