Reading Time: 3 minutes

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. अर्थखात्याच्या सचिवांनी ट्विट करून त्यास मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे जाहीर केल्याने आजचा दिवस 28 जुलै धरून शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. यापूर्वींच्या वर्षी, सरकारने विविध कारणांनी ते भरण्यास मुदतवाढ दिली. यावर्षीही सनदी लेखपालांच्या संघटनेने मुदतवाढीची मागणी केली असून ती रास्तच आहे, कारण शेवटच्या तिमाहीत मुळातून कापून घेतलेला कर हा फॉर्म 26 AS मध्ये किंवा AIS मध्ये पूर्णपणे दिसण्यासाठी मे अखेरपर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात आपण तांत्रिकदृष्ट्या विवरणपत्र भरू शकत असलो तरी अनेकांना ते भरता येत नाही. अनेक नामवंत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करत असलेला फॉर्म 16 जूनमध्येच देतात. हा फॉर्म मिळाल्यावर विवरणपत्र भरण्याच्या हालचालींना सुरुवात होते. अनेकजण सुरुवातीस संथ असतात मग अखेरच्या क्षणी त्यांची धावाधाव सुरू होते.

सुरुवातीपासूनच आपण आपल्याला सर्व मार्गानी मिळणाऱ्या पैशांची व्यवस्थित नोंद वेळच्या वेळी करून ठेवली तर यातील तपशिलाचे वर्गीकरण करून बेरीज करून ठेवणे एवढेच काम शिल्लख राहते. त्यामुळे आपण तणावरहित राहतो. तेव्हा आपण मागील वर्षी ही सूचना विचारात घेतली नसेल तर नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन केवळ चारच महिने होत असल्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या नोंदी आद्ययावत कराव्यात आणि पुढील वर्षी त्यापासून मिळू शकणाऱ्या आनंदाचा लाभ घ्यावा. आयकर विवरणपत्र स्वतःचे स्वतः भरावे की तज्ञाकडून भरून घ्यावे हा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यासाठी आपले सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याच्यप्रमाणे करात सवलत मिळवायची असल्यास अनेक कागदपत्रे लागतात. यातील कोणतेही कागदपत्र दाखवावे लागत नसतील तरी आयकर विभागाकडून काही चौकशी झाल्यास त्याचा खरेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी करदात्यावर असते अन्यथा आपण दंड अथवा शिक्षा किंवा दोन्हींस पात्र ठरतो तेव्हा कोणतीही माहिती दडवून ठेवू नये. यात काही चुकीची माहिती भरल्यास अंतिम जबाबदारी करदात्याची असते त्यामुळेच जर दुसऱ्याने विवरणपत्र भरले असले तरी ते कसे भरले हे नीट समजून घ्यावे.

हे ही वाचा – ITR 5 : जाणून घ्या आयटीआर फॉर्म-५ बद्दल सविस्तर माहिती

मी माझे विवरणपत्र स्वतः भरत नाही, अनेकजण ते भरतात. आपले विवरणपत्र आपणच भरणे कधीही चांगले. ते भरणे सोपे आहे असे म्हटले जात असले तरी विभागाची त्यासाठी दिलेली यंत्रणा वापरकर्त्याच्या सोयीची नाही असे माझे मत आहे. भविष्यात सर्व तपशील भरलेलाच फॉर्म देण्याची विभागाची योजना असून त्यास यश आल्यास ते करदात्यांच्या नक्कीच सोयीचे होईल. सध्यातरी विवरणपत्र भरणे ही गुंतागुंतीची तांत्रिक प्रक्रिया असल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने हे एक आव्हान आहे असे वाटते. अगदी शेवटच्या क्षणी ते भरताना काही चुका होण्याची शक्यता आहे त्याचे दडपण येऊ नये म्हणून कोणत्या तयारीत असावे याचा आपण विचार करूया –

★विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी करणे- आयकर विवरणपत्र भरताना आपले उत्पन्नचा करपात्र/ करमुक्त अशी विभागणी केलेला तपशील आणि बचत गुंतवणूक तपशील आवश्यक आहे. याशिवाय काही किमान गोष्टी आवश्यक आहेत त्या म्हणजे- पॅन, लॉग इन पासवर्ड (हा पासवर्ड माहिती नसेल तर पुन्हा निर्माण करता येईल पण त्यात काही वेळ जाणार), इ मेल, मोबाईल तो आधारशी संलग्न मोबाईल असल्यास अधिक चांगले, बँक खाते तपशील इ.

★आवश्यक कागदपत्रे हाताशी ठेवणे- आयकर विभागास कोणतेही कागदपत्र द्यावे लागत नसल्याचे मी यापूर्वी सांगितले आहेच परंतू त्यातील तपशीलची पुन्हा एकवार खात्री करण्याच्या दृष्टीने सर्व कागदपत्रे एकत्रित हाताशी असावीत. यातील महत्वाची कागदपत्रे म्हणजे – फॉर्म 16, फॉर्म 16A, फॉर्म 26AS, AIS, बँक स्टेटमेंट, कॅपिटल गेन स्टेटमेंट (आजकाल आपल्या ब्रोकरेज फर्म कडून तयार स्टेटमेंट मिळत असल्याने ते सुखकारक झाले आहे) अग्रीम कर भरल्याची चलने इ या सर्वांची सॉफ्ट कॉपी असेल तरी चालेल.

★सहज होणाऱ्या चुका टाळणे- शेवटच्या क्षणी घाईगडबडीत घरापासून मिळणारे भाड्याचे उत्पन्न किंवा काही उत्पन्नाना मिळणारी वजावट, काही उत्पन्न काही बचत गुंतवणूक अनावधानाने  जाहीर करण्याचे राहून जाण्याची शक्यता असते त्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी.

★करपात्र उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजावे- याबद्दल साशंकता असल्यास तज्ञांची मदत घ्यावी जरी मालकाने जुन्या पद्धतीने करमोजणी केली असली तरी करदात्यास नवीन पद्धतीने करमोजणी करून विवरणपत्र भरता येईल. जुन्या पद्धतीने अनेक करसवलती उपलब्ध असल्याने शक्यतो त्यात अखेरच्या क्षणी बदल करण्यापूर्वी भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करावा.

★योग्य फॉर्मची निवड- विवरणपत्र भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म उपलब्ध असून ते कोणास लागू आहेत त्याचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर दिला असून त्याप्रमाणे योग्य फॉर्मची निवड करावी. दरवर्षी या फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असल्याने असे काय बदल झाले आहेत ते समजून घ्यावे.

हे ही वाचा – ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा

आपल्या उत्पन्नाची त्यावर मिळणाऱ्या सवलतींची अचूक मोजणी करूनच योग्य करभरणा करावा अथवा परताव्याची मागणी करावी. 26 AS किंवा AIS मधील तपशिलात फरक असल्यास आपली हरकत घ्यावी. विवरणपत्र वेळेत भरून दंड टाळावा. तरिही अनावधानाने काही उत्पन्न, बचत, गुंतवणूक तपशील जाहीर करायचे राहिल्यास सुधारित विवरणपत्र भरण्याची सवलत काही अटींवर सर्व करदात्यांना आहे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.