मार्च महिना सुरू झाला आहे. नविन वर्षातला तिसराच महिना असला तरी चालू आर्थिक वर्षातला हा शेवटचा महिना आहे. ३१ मार्च आयकर विवरण पात्र दाखल करायचे आहे. अशात आपण देणे लागत असलेल्या कराचं गणित मांडायचं म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात त्या गुंतवणुकी आणि वजावटी. आपल्या उत्पन्नानुसार आपण करपात्रतेच्या कोणत्या गटात मोडतो आणि किती गुंतवणूक करू शकतो हे तर प्रत्येकाला माहितीच असतं. पण त्या गुंतवणुकींच्या पर्यायांची मात्र संपूर्ण माहिती नसते. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत असे कोणकोणते पर्याय आपल्याला गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत, जाणून घेऊ या.
कलम- ८० सी
पात्रता– स्वतंत्र व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब
प्रकार– बचत व गुंतवणूक
वजावटीची रक्कम- जास्तीत जास्त रू. १,५०,००० (८०सीसीसी व ८० सीसीडी(१) सहित)
बचत व गुंतवणुकीचे पर्याय-
-
प्रॉव्हिडंट फंड(ई.पी.एफ. व व्ही.पी.एफ.)
-
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.)
-
सुकन्या समृद्धी योजना खाते
-
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एन.एस.सी.)
-
सिनीयर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम(एस.सी.एस.एस.)
ई.पी.एफ.(एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड)-
-
फक्त नोकरदार व्यक्ती पात्र
-
२०पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपनीतील पगारदारांसाठी अनिवार्य
-
बेसिक पगाराच्या १२% + महागाई भत्ता गुंतवणे गरजेचे.
-
निवृत्तीनंतर फायद्याची स्कीम
-
पात्रता- दरमहा रू.१५,००० पेक्षा अधिक पगार असणे गरजेचे
-
तरलता(लिक्विडीटी)- नोकरी सोडल्यानंतर २ महिन्यांनी रकमेचा ताबा.
-
व्याजदर– ८.८%
-
करपात्रता– व्याजासहित संपूर्ण फंड रक्कम करमुक्त(सलग ५ वर्षांच्या नोकरीनंतर काढल्यास)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.)-
-
पोस्ट ऑफिस, आय.सी.आय.सी.आय. व २४ राष्ट्रीय बँकामध्ये सुविधा उपलब्ध
-
ठेवीची मुदत कमीत कमी मुदत १५ वर्षांसाठी; त्यानंतर प्रत्येकवेळी ५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवता येतो,
-
जास्तीत जास्त रू. १,५०,००० इतकी रक्कम प्रतिवर्षी जमा केली जाऊ शकते.
-
कमीत कमी रू.५०० इतकी रक्कम प्रतिवर्ष जमा करणे अनिवार्य
-
पात्रता– भारतीय नागरिक असणारी कोणतही स्वतंत्र व्यक्ती असे खाते उघडू शकते. हिंदू अविभक्त कुटुंबाला ही सुविधा उपलब्ध नाही.
-
तरलता(लिक्विडीटी)- कमीत कमी १५ वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते. त्यांनतर ५-५ वर्षांसाठी
-
व्याजदर– ८.१%
-
करपात्रता– व्याजासहित संपूर्ण रक्कम करमुक्त
सुकन्या समृद्धी योजना खाते-
-
लहान मुलींसाठी भारत सरकारने २०१५ मध्ये जाहिर केलेली योजना
-
मुलींच्या हितावर भर देण्यासाठी प्रयत्न
-
वय वर्षे १० खालील मुलींसाठी ह्या योजने अंतर्गत खाते उघडले जाऊ शकते.
-
जास्तीत जास्त २ मुलींसाठी ह्या योजनेचा लाभ घेता येतो.
-
नविन नियमांनुसार दत्तक घेतलेल्या मुलींसाठीही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
-
जास्तीत जास्त १४ वर्षे रक्कम जमा करता येते.
-
प्रतिवर्ष जास्तीत जास्त रू.१,५०,००० इतकी रक्कम जमा करता येते.
-
प्रतिवर्ष कमीत कमी रू.१,००० जमा करणे अनिवार्य; अथवा रू.५० इतका दंड लागू.
-
ह्या खात्याचा कालावधी उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांपर्यंत इतका असतो.
-
मुलीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण जमा रक्कम काढता येऊ शकते.
-
मुलीचे लग्न असल्यास २१ वर्षांच्या आधी हे खाते बंद करता येऊ शकते.
-
पात्रता– भारतीय नागरिक असलेले पालक आपल्या वय वर्षे १० च्या खालील जास्तीत जास्त २ मुलींच्या नावे खाते उघडू शकतात.
-
तरलता(लिक्विडीटी)– मुलीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर किंवा मुलगी इयत्ता दहावीची पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जमा रकमेच्या ५०% इतकी रक्कम काढता येऊ शकते.
-
व्याजदर– ८.६%
-
करपात्रता– व्याजासहित संपूर्ण रक्कम करमुक्त
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एन.एस.सी.)-
-
करमुक्त मुदत ठेवीचा प्रकार
-
मुदत कालावधी- ५ वर्षे
-
मुदतपूर्व पैसे काढण्यास परवानगी नाही (आपवाद- मृत्यूची घटना)
-
कमीत कमी रू. १०० इतक्या रकमेची गुंतवणूक अनिवार्य.
-
जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवली जाऊ शकते; परंतु फक्त रू. १,५०,००० इतकीच रक्कम करमुक्त
-
उद्गम (टी.डी.एस.) करकपात नाही.
-
रू. १००, ५००, १०००, ५,००० व १०,००० अशा पटीत रक्कम गुंतवून एन.एस.सी.घेता येते.
-
एन.एस.सी. तारण ठेवून सुरक्षित कर्ज घेता येऊ शकते.
-
पात्रता- भारतीय नागरिक असणारी प्रत्येक व्यक्ती (ट्रस्ट आणि हिंदू अविभक्त कुटुंब सोडून); वयोमर्यादा नाही.
-
तरलता(लिक्विडीटी)– पाच वर्षांनतर म्हणजेच मुदत कालावधी संपल्यानंतर रक्कम काढता येते.
-
व्याजदर– ७.९%
-
करपात्रता– व्याजासहित गुंतवलेली (रू.१,५०,००० इतकी) रक्कम करमुक्त
सिनीयर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम(एस.सी.एस.एस.)-
-
ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष योजना
-
खाते उघडण्याच्या तारखेला व्यक्तीचे वय वर्षे ६० पूर्ण असणे आवश्यक
-
वय वर्षे ५५ पूर्ण असलेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती (व्ही.आर.एस.) स्विकारलेल्या व्यक्ती निवृत्तीनंतर ३ महिन्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
-
कमीत कमी रू. १,००० इतकी रक्कम गुंतवणे अनिवार्य
-
जास्तीत जास्त रू.१५,००,००० इतकी रक्कम गुंतवणे शक्य.
-
जोडीदाराबरोबर संयुक्त खाते(जॉईंट अकाऊंट ) उघडण्याची सोय. संयुक्त खात्यासाठी जोडीदाराला वयोमर्यादा नाही.
-
पात्रता– वय वर्षे ६० पूर्ण असलेला कोणताही भारतीय नागरिक
-
व्याजदर– ८.६%
-
करपात्रता– गुंतवलेली संपूर्ण रक्कम करमुक्त मात्र मिळणारे व्याज करपात्र.