Nomination नॉमिनेशन नियम अटी
https://bit.ly/2QDSE68
Reading Time: 3 minutes

नॉमिनेशन – नियम व अटी

नॉमिनेशन (Nomination) म्हणजे आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेची जबाबदारी घेण्यासाठी एखाद्या खात्रीशीर व्यक्तीची नेमणूक करणे. प्रत्येक दस्तावेजाचे नॉमिनेशन प्रक्रियेसाठीचे नियम व अटी वेगवेगळे असू शकतात. आजच्या लेखात आपण कोणकोणत्या दस्तावेजांसाठी नॉमिनेशन करावे लागते, त्याची गरज व त्यासंदर्भातील नियम व अटींची माहिती घेणार आहोत. 

संबंधित लेख : Nomination: नॉमिनेशन म्हणजे काय असतं रे भाऊ?

Nomination: विविध दस्तावेजांसाठीची नॉमिनेशन प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील नियम व अटी

१. आयुर्विमा पॉलिसी (Life Insurance Policy):

  • आयुर्विमा पॉलिसी खरेदी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांच्या भवितव्याची आर्थिक तरतूद करणे. 
  • यामध्ये पॉलिसी खरेदीच्या वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींची नॉमिनी म्हणून नोंद करता येते. प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर त्याचा शेअर (उदा. ५०%, २५%) लिहिणे आवश्यक असते. 
  • विमा धारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसीची रक्कम संबंधित नॉमिनी व्यक्तींना निश्चित केलेल्या शेअर नुसार मिळते. यासाठी त्यांना विमाधारकाचे वारसदार असल्याचा कोणताही पुरावा द्यावा लागत नाही. 
  • आयुर्विमा पॉलिसीसाठी अज्ञान व्यक्तीला नॉमिनी करता येते, परंतु पण त्याच्या पालकांची माहिती लिहिणे आवश्यक असते.
  • पॉलिसीधारकाच्या आधी नॉमिनीचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीधारकाचे वारस, कायदेशीर प्रतिनिधी किंवा वारस प्रमाणपत्र असणार्‍यास देय रक्कम दिली जाते.

२. बँक खाते:

  • बँक खाते वैयक्तिक असो व संयुक्तिक, प्रत्येक बँक खात्यासाठी केवळ एका व्यक्तीला नॉमिनी करता येते. 
  • बँकेमधील लॉकर खाते जर संयुक्तिक खाते (joint account) असेल तर, एकापेक्षा जास्त व्यक्तींना (जास्तीत जास्त २) नॉमिनी करता येते. 
  • तसेच, एकाच बँक खात्यात एफ.डी., बचत आणि आरडी खाती असतील, तर प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र नॉमिनी नेमता येतो. 
  • अज्ञान व्यक्तीला नॉमिनी करता येते, परंतु त्याच्या पालकांची सर्व माहिती लिहिणे बंधनकारक आहे.

हे नक्की वाचा: मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

३. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF )

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) खात्यासाठी अर्ज भरताना अनुक्रमे फॉर्म ई आणि फॉर्म एफ (Form E and Form F) भरून नॉमिनेशन करता येते. 
  • एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या पीपीएफ खात्यासाठी मात्र नॉमिनेशन करता येत नाही.
  • पीपीएफ खात्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी करता येते. तसेच प्रत्येक नॉमिनीसाठी शेअरदेखील निश्चित करता येतो. 

४. म्युच्युअल फंड

  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त तीन जणांना नॉमिनी करता येते. 
  • फंड हाऊसकडून फोलिओ स्तरावर नॉमिनी निश्चित करावा लागतो.
  • जर विविध गुंतवणूक योजना एकाच फोलिओ अंतर्गत केलेल्या असतील तर, प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे नॉमिनी ठेवायची आवश्यकता नाही.
  • सोसायटी, ट्रस्ट, कॉर्पोरेट संस्था, हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता आणि पॉवर ऑफ अटर्नी इत्यादींना नॉमिनी करता येत  नाही. 
  • अज्ञान व्यक्तीला नॉमिनी करता येते, परंतु त्याच्या पालकांची सर्व माहिती लिहिणे बंधनकारक आहे.

५. डिमॅट अकाउंट

  • वैयक्तिक किंवा संयुक्त डिमॅट खात्यासाठी नॉमिनेशन करता येते. परंतु, नॉमिनेशन हे केवळ  व्यक्तीच्या  नावेच  करता  येते. 
  • सोसायटी, ट्रस्ट, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता, पॉवर ऑफ अटर्नी, इत्यादींना नॉमिनी करू शकत नाही.
  • एका खात्यासाठी केवळ एकाच व्यक्तीला नॉमिनी करता येते. तसेच अज्ञान व्यक्तीच्या नावे नॉमिनेशन करता येत नाही.
  • प्रत्येक खात्यासाठी वेगळे नॉमिनेशन करता येते, मात्र प्रत्येक सिक्युरिटीसाठी वेगळे नॉमिनेशन करता येत नाही.
  • शेअर्स गुंतवणूकदाराच्या बाबतीत, डिपॉझिटरी पार्टीसिपंट करतेवेळीच नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे.

हे नक्की वाचा: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

नॉमिनेशन बदलता येते का? 

हो. नॉमिनेशन प्रक्रियेबद्दल असणारा सर्वात मोठा  गैरसमज म्हणजे, अनेकांना असं वाटतं की एकदा केलेले नॉमिनेशन बदलता येत नाही. परंतु, तुम्ही कधीही तुमच्या पॉलिसी, बँक खाते, गुंतवणूक, इत्यादी सर्व गोष्टींसाठीचे नॉमिनेशन आवश्यक त्या प्रक्रियेची पूर्तता करून बदलू शकता. 

अज्ञान व्यक्तीला नॉमिनी करता येते का? 

हो. नॉमिनेशन प्रक्रियेचा मूळ उद्देश पश्चात आपली जमापुंजी आपल्या प्रिय व्यक्तीला मिळावी हा असतो. त्यामुळे संबंधित खात्याच्या नियम व अटींची पूर्तता करून, तसेच अज्ञान व्यक्तीच्या पालकांची संपूर्ण माहिती देऊन अज्ञान व्यक्तीच्या नवे नॉमिनेशन करता येते. 

नॉमिनेशन (Nomination) हा तुमच्या प्रत्येक जमापुंजीच्या दस्तावेजाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नॉमिनेशन करताना सर्व नियम व अटी समजून घेऊन त्यांचे पालन करा. कारण तुम्ही केलेली एखादी चूक तुमच्या प्रियजनांसाठी त्रासदायक ठरू शकते. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Nomination – Rules and Regulations Marathi Mahiti, LIC nomination Marathi Mahiti, Terms & conditions of Nomination Marathi Mahiti, Nomination in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.