Personal Loan वैयक्तिक कर्ज
https://bit.ly/2LwpUIW
Reading Time: 3 minutes

Personal Loan: वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे आजच्या काळातील एक महत्वाचं बँकेचं ‘प्रॉडक्ट’ ठरतंय. जवळपास दररोज कुठल्या ना कुठल्या बँकेकडून या कर्जासाठीचा फोन किंवा एसएमएस अनेकांना येत असेल. वैयक्तिक कर्ज म्हणजे वाईट अशी अनेक सर्वसामान्यांची धारणा असते. पण हे कर्ज अगदीच काही वाईट नाही. या कर्जाचीही अनेक वैशिष्ट्ये आहेत, फायदे आहेत.

Personal Loan: वैयक्तिक कर्ज 

  • वैयक्तिक कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे, इतर कर्ज घेताना लागणाऱ्या कागदपत्रांपेक्षा कमी असतात.
  • वैयक्तिक कर्ज हे आजच्या काळात बरेच नोकरदार लोक घेतात. त्यांच्यासाठी हे कर्ज म्हणजे बरेचदा वरदान ठरतं. वैयक्तिक कर्ज म्हणजे काय हे समजून घेताना इतर कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांच्यातला फरक समजणे आवश्यक आहे.

हे नक्की वाचा: Personal Loan FAQ : पर्सनल लोन विषयी सर्व काही

गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तीक कर्ज (Personal Loan)

गृहकर्ज आणि वाहन कर्ज

  • गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेताना बँकेकडे सर्व कागदपत्रे सुपूर्द करावी लागतात. बँक संपूर्ण कागदपत्रे बघते, बरीच चौकशी केली जाते.
  • गृहकर्ज मंजूर होताना घरासंबंधीत सर्व कागदपत्रे बँकेकडेच ठेवली जातात. त्याचप्रमाणे वाहन कर्ज घेतानाही बँक वाहनाची कागदपत्रे स्वतःकडे राखून ठेवते. कर्जाचे सर्व हप्ते भरल्यानंतर ती कागदपत्रे व्यक्तीला परत मिळतात.
  • येथे घरासंबंधीत किंवा वाहनासंबंधित कागदपत्रे ही बँकेकडे एक सुरक्षितता , गॅरंटी म्हणून ठेवली जातात. समजा व्यक्तीने कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते भरले नाहीत किंवा बँकेला कर्ज परत केले नाही तर बँक त्या वाहनावर किंवा घरावर जप्ती आणते. त्यानंतर त्या वाहनाचा किंवा घराचा बँकेकडून लिलाव केला जातो. यातून बँक कर्जाची  रक्कम वसूल करते.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan)

  • वैयक्तिक कर्ज मात्र यामध्ये वेगळं ठरतं. वैयक्तिक कर्ज हे ‘कोलॅटरल फ्री’ असतं. कोलॅटरल फ्री म्हणजे यासाठी बँकेकडे कोणतीही कागदपत्रे  सुरक्षितता म्हणून ठेवावी लागत नाहीत. कुठलीही स्थावर मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही.
  • पर्सनल लोनमध्ये कागदपत्रे कमी लागतात. इतर कर्ज घेताना बँकेला ते कर्ज कशासाठी हवं आहे हे सांगावं लागतं. बँक त्यावर विचार विनिमय करून कर्ज मंजुर करायचं की नाही ठरवतं. पण वैयक्तिक कर्ज घेताना बँकेला ते कशासाठी घेतोय हे सांगण्याची गरज नसते.
  • वैयक्तिक कर्ज हवं असल्यास बँकेकडे त्यासाठी अर्ज करावा लागतो. बँक व्यक्तीची विश्वासार्हता बघते. त्यांच्या नियमावलीप्रमाणे बँक त्यांची आखणी सांगते, म्हणजे  कर्ज फेडण्याचे हप्ते किती व कसे असणार हे सांगते. व्यक्तीला ती पटली त्याने होकार दिला की बँक व्यक्तीच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करते.
  • त्यानंतर बँकेने दिलेल्या मासिक हप्त्यांच्या आराखड्यानुसार सर्व हप्ते चुकवावे लागतात.

विशेष लेख: कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Personal Loan: वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?

  • वैयक्तिक कर्ज कशासाठीही घेता येते. सहलीचा खर्च करण्यासाठी, लग्नासाठी खरेदी किंवा हनिमून साजरा करण्यासाठी, मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी, बाजारात आलेला नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्यासाठी, गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कशाहीसाठी वैयक्तिक कर्ज घेता येतं. बँक तुम्ही कशावर खर्च करताय यांत लक्ष घालणार नाही.
  • आजच्या काळात वैयक्तिक कर्ज घेण्याचं एक साधारण कारण दिसतं ते म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल चुकवणे. क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर चुकवलं नाही तर त्याचा व्याजदर अधिकच वाढत जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर खराब होतो ते वेगळंच. अशावेळी बरेच लोक क्रेडिट कार्डचं बिल चुकवण्यासाठी बँकेकडून पर्सनल लोन घेतात आणि त्यातून क्रेडिट कार्ड्सचं बिल किंवा इतर बाकी कर्ज चुकवतात.
  • एक लोन (कर्ज) चुकवण्यासाठी दुसरं लोन घेणं हे ‘लोण’ आजकाल पसरलं आहे. हे सारं खूप शांतचित्ताने, विचारपूर्वक केलं पाहिजे. नाहीतर कर्ज आणि व्याजाच्या साखळीत, चक्रव्यूहात व्यक्ती अडकत जातो आणि त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं.
  • त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेताना सुद्धा सारासार विचार करायला हवा. आपली कर्ज चुकवायची पात्रता जोखून बघावी, त्यानंतरच वैयक्तिक कर्ज लोनसाठी बँकेची पायरी ओलांडावी.

Personal Loan: वैयक्तिक कर्ज –  दुसरी एक बाजू:-

  • वैयक्तिक कर्जाची दुसरी एक बाजूही आहे, ती म्हणजे व्याजदर. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे गृहकर्ज किंवा वाहन कर्जापेक्षा जास्त असतात. बहुतांश वेळा पर्सनल लोन घेताना फायनान्स कंपनी किंवा पतसंस्थांना पसंती दिली जाते. कारण तिथून आपल्याला हव्या त्या रकमेचे कर्ज भरमसाट व्याजदराने दिले जाते; जे नामांकित खाजगी बँका किंवा सरकारी बँकांकडून दिले जात नाही.
  • “गरजवंताला अक्कल नसते” अशी एक म्हण आहे. फायनान्स कंपनी किंवा पतसंस्थांकडून भरमसाठ व्याजदराने कर्ज घेणाऱ्यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते.
  • सुरवातीला पाहिजे त्या रकमेचे कर्ज चुटकीसरशी मिळाल्यामुळे खुश झालेला कर्जदार व्याजाची रक्कम भरताना मात्र हवालदिल होतो.

हे नक्की वाचा: Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताना लक्षात ठेवा हे ११ नियम

तेव्हा वैयक्तिक कर्ज घेताना पूर्ण विचार करूनच घ्यावे. जास्त रकमेचे कर्ज फेडताना कर्जाच्या रकमेच्या तिप्पट किंवा त्याहूनही जास्त रक्कम  व्याजाच्या रूपाने आपल्या खिशातून जाते. त्यामुळे अगदीच नाईलाज असेल तेव्हाच हा पर्याय स्वीकारावा. “अंथरुण पाहून पाय पसरावेत”, आपल्या गरजा मर्यादित ठेवणाऱ्यावर शक्यतो वैयक्तिक कर्ज घ्यायची वेळ येत नाही.

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Personal Loan Marathi Mahiti, Personal Loan in Marathi, Personal Loan Marathi, पर्सनल लोन मराठी माहिती, पर्सनल लोन मराठी 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…